१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, त्यानंतर, 5Gसाठी आपल्याला मोबाईल फोन बदलावा लागेल का? 4G सीमकार्डचं काय होईल? सध्या वापरात असलेल्या स्मार्टफोनमध्ये 5Gचा अनुभव घेता येईल का? किंवा 5G सीमकार्ड 4G मोबाईलमध्ये वापता येईल का? असे असंख्य प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहेत. याच प्रश्नांची उत्तरे आज जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – विश्लेषण: ट्विटर खरेदी करण्याची मस्क यांची पुन्हा ऑफर, ट्विटरची भूमिका काय? व्यवहारात न्यायालयीन अडचण काय?

5G साठी नवीन फोन आवश्यक आहे का?

5G सेवांचा अनुभव घेण्यासाठी तुमच्या फोनमध्ये 5G साठी आवश्यक प्रणाली गरजेची आहे. त्यामुळे जर तुमचा मोबाईल फोन 4G प्रणालीचा असेल तर तुम्हाला नवीन मोबाईल फोन विकत घ्यावा लागेल. तुमचा स्मार्टफोनमध्ये 5Gसाठी लागणारी आवश्यक प्रणाली आहे का? हे जाणून घेण्यासाठी मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तपासता येईल. अँड्रॉइडमध्ये सेटिंग्ज > नेटवर्क आणि इंटरनेट > मोबाइल नेटवर्क > या क्रमाने उपलब्ध नेटवर्कचे तपशील तपासून घेता येतील. यात 5G चा समावेश असल्याची खात्री करून घ्या.

हेही वाचा – विश्लेषण: रशिया, चीनपेक्षा उत्तर कोरियापासून अणुयुद्धाचा जास्त धोका आहे? किम जोंग उन यांच्या क्षेपणास्त्र चाचण्यांचा परिणाम किती?

4G सीमकार्ड बदलावे लागेल का?

सध्यातरी तुम्हाला तुमचे 4G सीमकार्ड बदलवण्याची गरज नाही. टेलिकॉम कंपन्यांद्वारे तुमचे 4G सीमकार्ड 5Gमध्ये अपग्रेड करण्यात येईल. जीओने दिलेल्या माहिती नुसार 5Gसाठी मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि वाराणसी या चार शहरांत ‘जीओ वेलकम ऑफर’ सुरू करण्यात आली आहे. याद्वारे या चार शहरांत सीमकार्ड अपग्रेड करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच जीओकडून लवकरच 5G सपोर्ट मोबाईलसुद्धा बाजारात उपलब्ध होणार आहेत. तर एअरटेलनुसार, 4G मोबाईलमध्ये 5G सीमकार्ड वापरता येणार आहे. मात्र, तुम्हाला 5G सेवेचा पूर्णपणे आनंद घेता येणार नाही.

हेही वाचा – विश्लेषण : घरभाडे थकविणाऱ्या विकासकांना अटकाव कसा?

5G सीमकार्ड 4G मोबाईलमध्ये वापता येईल का?

5G सीमकार्ड 4G मोबाईलमध्ये वापता येईल का, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर याचं उत्तर होय असे आहे. जर तुम्ही 4G मोबाईलमध्ये 5G सीमकार्ड वापरत असाल, तर तुम्हाला 4G नेटवर्क मिळेल. मात्र, जर तुम्हाला 5G नेटवर्कचा पूर्णपणे आनंद घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 5G मोबाईलसह 5G सीमकार्ड असणे आवश्यक आहे.

5Gचा वेग किती असेल?

मोबाइल डेटाच्या बाबतीत, 5G नेटवर्क तुम्हाला 4G नेटवर्कपेक्षा दुप्पट गती देईल. व्हिडीओ आणि चित्रपट आता काही सेकंदात तुमच्या फोनवर डाउनलोड केले जातील. 4G मध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त 100mbps स्पीड मिळतो, पण 5G मध्ये हा स्पीड 10Gbps पर्यंत जाऊ शकतो.

5G कशाप्रकारे काम करेल?

5G फोनला सेल्युलर सेवा वितरित करण्यासाठी तीन प्रकारचे रेडिओ सिग्नल असतात. लो, मीड आणि हाय बँड फ्रिक्वेन्सी. हाय बँड फ्रिक्वेन्सी भरपूर गती देते आणि त्याची बँडविड्थ देखील मोठी असते, मात्र त्याची रेंज कमी असते. लो बँडला मोठी रेंज आहे, मात्र त्यात गती नाही. मात्र रेंज आणि स्पिडच्या बाबतीत मीड बँड सोयिस्कर आहे. याचा वापर करून दूरसंचार कंपन्या ग्राहकांना 5G सेवा पुरवणार आहेत. तसेच तज्ज्ञांच्या मते 5G केवळ स्मार्टफोन पुरतेच मार्यादित न राहता ते इतर तंत्रज्ञान लोकांपुढे आणण्यात मदत करेल. स्वयंचलित कार, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, क्लाऊड गेमिंग आणि स्मार्ट शहर, यामध्ये 5G सेवा मदत करेल.

१३ शहरांपासून सुरुवात!

5G सेवा येत्या दिवाळीपर्यंत एकूण १३ शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या नागरिकांचा मोबाईल 5G सेवेसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य अर्थात 5G Enabled असेल, अशा नागरिकांना ही सेवा वापरता येईल. अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल. त्यापैकी कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये आधी सेवा सुरू केली जाईल.