चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा

किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक समारंभ नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. या सोहळ्यादरम्यान श्रीमंतीचे वारेमाप प्रदर्शन करण्यात आले. दागिन्यांपासून ते राजमुकूटापर्यंत सर्वच बाबतीत समृद्धी झळकत होती. राजघराण्यातील प्रत्येक व्यक्ती खानदानी सौंदर्याचे प्रदर्शन करताना संपूर्ण जगाने पाहिले. प्रश्न फक्त इतकाच आहे की खरोखरच या साऱ्या वस्तू त्यांच्या खानदानी आहेत? की चोरीच्या? कदाचित. काहींना ब्रिटीशांना चोर म्हटलेले रूचणार नाही. तरीही राज्याभिषेक समारंभात मुकूटावर न दिसलेला भारतीय कोहिनूर आणि दक्षिण आफ्रिकेचा द ग्रेट कुलीनन डायमंड नक्की काय सांगू पाहतोय हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

राज्याभिषेक सोहळा व त्यावर निर्माण होणारे प्रश्न

ट्विटरच्या माध्यमातून अनेकांनी या चोरीच्या समृद्धीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यातील रमेश श्रीवत्स यांनी राजा चार्ल्स आणि राणी कॅमिला यांच्या राज्याभिषेकाच्या एक दिवस आधी केलेले ट्विट भलतेच गाजले. आपल्या ट्विटद्वारे त्यांनी उपाध्यक्ष जगदीप धनखर, सोनम कपूर आणि सौरभ फडके यांनी राजा चार्ल्स यांच्या राज्याभिषेकादरम्यान कोहिनूर परत मिळवण्यासाठी एक क्लिष्ट पण चतुर योजना तयार केली असेल, असा खोचक टोला लगावला होता. काहींनी तर सोहळा संपताच कोहिनूर भारतात परत आणण्याची मागणी केली होती. केवळ भारतीय वस्तूच नाही तर वसाहतवादाच्या नावाखाली ब्रिटिशांनी ज्या देशांच्या वस्तू स्वतःच्या म्हणून हक्काने मायदेशी नेल्या; त्या सर्वच वस्तूंच्या बाबतीत चर्चा होताना दिसत आहे.

Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
maharashtra assembly election 2024, raosaheb danve,
रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
Peshwa Maratha sacking of the Sringeri math
Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?
keir starmer diwali party hindu angry
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीवरून हिंदूंमध्ये संताप; नेमके प्रकरण काय?
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी

राज्याभिषेक समारंभात प्रदर्शित केलेल्या अनमोल रेगॅलिया आणि दागिन्यांशी संबंधित इतिहास हा रक्तरंजीत आहे. असे असतानाही ब्रिटनच्या राजघराण्याने त्या वस्तू योग्य त्या मालकाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न आजतागायत केलेला नाही. त्यामुळे त्यांनी त्या वस्तू त्यांच्या हक्काच्या मालकांना परत कराव्यात की नाही, यावर पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.

आणखी वाचा : ‘Not my King’ किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाला ब्रिटिश नागरिक विरोध का करत आहेत? राजेशाहीबाबत ब्रिटनच्या जनतेचे मत काय?

ब्रिटिशांच्या लुटीत कोहिनूर आणि आफ्रिकेचा कुलीन

कोहिनूर राज्याभिषेकाला दिसला नाही. हा मूलतः क्वीन मेरीच्या मुकुटाचा एक भाग होता जो राणी कॅमिलाने या समारंभासाठी निवडला होता. कदाचित, तिच्या अंधुक भूतकाळामुळे आणि तो भारतात परत करण्याच्या वाढत्या आवाहनांमुळे तिने हिऱ्यापासून दूर जाणे निवडले. आणि या हिऱ्याला जाणीवपूर्वक लोकांच्या नजरेपासून दूर ठेवण्यात आले. खरं तर, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राणी एलिझाबेथ दुसरी हीच्या निधनानंतर, ट्विटरवर अनेकांनी कोहिनूर परत करण्याचे आवाहन केले होते. कोहिनूर, ज्याचा अर्थ “प्रकाशाचा पर्वत” आहे, मूलतः सुमारे तो १८६ कॅरेटचा होता, परंतु त्याचे नेमके उगम स्थान अज्ञात आहे. तो हिरा १३ व्या शतकात दक्षिण भारतात पहिल्यांदा सापडल्याचे काही अभ्यासक सांगतात. ब्रिटनच्या शाही राजवाड्याच्या अधिकृत वेबसाइटनुसार, कोहिनूर १८४९ साली ब्रिटिशांच्या ताब्यात येण्यापूर्वी दक्षिण भारतातील गोलकोंडा खाणीत सापडला होता. १८४९ साली, १० वर्षीय महाराजा दुलीप सिंग यांच्याकडून ईस्ट इंडिया कंपनीने कोहिनूर ताब्यात घेतला होता.

कोहिनूर विषयी असलेल्या अफवा

कोहिनूर हा हिरा पुरुषांसाठी शापित असल्याची अफवा आहे. जो पुरुष हा हिरा परिधान करतो त्याच्याकडून राज्य जाते. राणी व्हिक्टोरियाने सुरुवातीच्या काळात हा हिरा ब्रोच म्हणून परिधान केला होता. नंतरच्या काळात हा हिरा राणी अलेक्झांड्रा आणि क्वीन मेरीच्या मुकुटाचा भाग झाला. आजही हा हिरा मुकूटाचाच भाग आहे. १९३७ सालामध्ये राणी एलिझाबेथ (मदर-आई) हिच्या राज्यअभिषेकाच्या वेळेस हा मुकुट तयार करण्यात आला होता. या राणीने १९५३ सालामध्ये आपल्या मुलीच्या म्हणजे एलिझाबेथ दुसरी हिच्या राज्यअभिषेकाच्या वेळेस परिधान केला होता. सध्या हा हिरा टॉवर ऑफ लंडन येथील ज्वेल हाऊसमध्ये आहे.

आणखी वाचा : ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्यात रत्नजडित मुकुटासह, राजदंड, गदा, कलश, कडी आणि चमचा का वापरतात?

कोहिनूरच्या मालकीविषयीचे वाद

हा हिरा भारतातील राजकीय आणि कायदेशीर वादाच्या केंद्रस्थानी नेहमीच राहिलेला आहे, त्याच्या मालकीवरील विवादांमध्ये, केवळ भारताकडूनच नव्हे तर पाकिस्तानकडूनही दावे होताना दिसतात. कोहिनूर आपल्या मालकीचा असल्याचा दावा पाकिस्तान नेहमीच करते. डॅनियल किन्से, या १९ व्या शतकातील ब्रिटन आणि साम्राज्याच्या इतिहासावर लक्ष केंद्रित करणार्‍या इतिहासाच्या सहाय्यक प्राध्यापक यांनी ओटावा, ओंटारियो येथील कार्लटन विद्यापीठात एनबीसी न्यूजशी बोलताना त्यांनी नमूद केले की कोहिनूर आत्मसमर्पण करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या मतानुसार ब्रिटिश राजघराण्याने संबंधितांची माफी मागून वसाहत वादाच्या नावाखाली गोळा केलेल्या वस्तू परत कराव्यात. द गार्डियनने म्हटल्याप्रमाणे कोहिनूर शिवाय भारतातून ब्रिटिशांनी विजयाचे प्रतीक म्हणून दागिनेही आणले होते. यात रुबिचा हार समाविष्ट होता. ते तैमूर रुबी म्हणून ओळखले जातात.

आणखी वाचा : ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना निमंत्रण; या दोघांमध्ये मैत्री कशी झाली?

दक्षिण आफ्रिकेचा कुलीन

कोहिनूर परत करण्यासाठी भारताकडून आलेल्या आवाहनांव्यतिरिक्त, ब्रिटीश राजेशाहीला दक्षिण आफ्रिकेकडून ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका किंवा कुलीनन पहिला हिरा परत करण्यासाठी आवाहनांचा सामना करावा लागत आहे. आफ्रिकेचा ग्रेट स्टार किंवा कुलीनन पहिला म्हणून ओळखला जाणारा, हा कुलीनन हिऱ्यापासून कापलेला सर्वात मोठा दगड आहे, जो दक्षिण आफ्रिकेत १९०५ सालामध्ये थॉमस कलिनन नावाच्या खाणीत सापडला होता आणि हा सर्वात मोठा रत्न-गुणवत्तेचा न कापलेला हिरा आहे. आफ्रिकेचा महान तारा सार्वभौम राजदंड विथ द क्रॉसमध्ये आरोहित आहे, जो राजा चार्ल्सने राज्याभिषेकाच्या वेळी नेला होता. ब्रिटीश राजघराण्याच्या रॉयल कलेक्शनवर देखरेख करणाऱ्या रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, दक्षिण आफ्रिकेतील जुन्या ट्रान्सवाल प्रांतातील एका खाजगी खाणीत हा हिरा सापडल्यानंतर दोन वर्षांनी कुलीनन हिरा १९०७ मध्ये राजा एडवर्ड सातवा (त्यावेळचा ब्रिटीश सम्राट) यांना सादर करण्यात आला होता. परंतु दक्षिण आफ्रिका विद्यापीठातील आफ्रिकन राजकारणाचे प्राध्यापक, एव्हरिस्टो बेनयेरा यांनी हे नाकारले आहे. त्यांच्या नुसार बेकायदेशीर मार्गाने हा हिरा ब्रिटनमध्ये नेण्यात आला होता.