Aus Vs SA Boxing Day Test: जगभरात २५ डिसेंबरला ‘ख्रिसमस’ म्हणजेच ‘नाताळ’ हा सण साजरा केला जातो. त्याचवेळी क्रिकेटचा हंगाम देखील शिगेला पोचलेला दिसून येतो. यावर्षीही ख्रिसमसच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीही कसोटी सामने खेळले जाणार आहेत. दरवर्षी २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी म्हणतात, मग ती जगात कुठेही खेळली जात असली तरीही. पण, प्रश्न असा आहे की बॉक्सिंग डे म्हणजे काय? २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे का म्हणतात? सध्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणारा कसोटी सामनाही बॉक्सिंग डे आहे, पण त्याचा इतिहास काय आहे?

बॉक्सिंग डे म्हणजे काय?

ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवसाला जगभरात बॉक्सिंग डे म्हणून ओळखले जाते. या बॉक्सिंग डेच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे, ख्रिसमसच्या सुट्टीनंतर कामगार ज्यावेळी कामावर जात त्यावेळी मालक त्यांना भेटवस्तूचे बॉक्स देत. त्यामुळे या दिवसाला बॉक्सिंग डे म्हटले गेले. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार, ख्रिसमसवेळी चर्चमध्ये ठेवलेल्या बॉक्समधील भेटवस्तू गरजूंना वाटप करण्याचा दिवस म्हणजे बॉक्सिंग डे. अशा आणखी काही आख्यायिका सांगितल्या जातात.

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
ICC test Rankings Harry Brook Becomes No 1 Ranked Test Batter Virat Rohit Suffer Massive Dip
ICC Test Rankings: विराट-रोहितला कसोटी क्रमवारीत धक्का, जो रूटला मागे टाकत ‘हा’ खेळाडू पहिल्या स्थानी, टॉप-१० मध्ये भारताचे किती खेळाडू?
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
Mohammed Siraj Travis Head May Face ICC Disciplinary Action After Heated Argument
Siraj-Head Fight: सिराज-हेडला भर मैदानात वाद घालणं पडणार महागात, ICC कारवाई करण्याच्या तयारीत

बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास काय?

खूप वर्षांआधी ख्रिसमस आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियातील स्थानिक संघ व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यादरम्यान मॅच होत असे. १९५०-५१ अॅशेस मालिकेत मेलबर्न कसोटी २२ ते २७ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. १९५३ ते १९६७ दरम्यान बॉक्सिंग डे दिनी टेस्ट मॅचचं आयोजन करण्यात आलं नाही. १९८० मध्ये मेलबर्न क्रिकेट क्लब आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम यांच्यात बॉक्सिंग डे दिवसापासून कसोटी सामन्यांच आयोजन करण्याचे हक्क रीतसर विकत घेतले. त्यामुळे तेव्हापासून दरवर्षी मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटी होते.

हेही वाचा: IND vs BAN: “हे अजिबातच मान्य करण्यासारखे नाही…”, विराटला घडवणाऱ्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला संताप

तसे पाहिल्यास, १९५० साली मेलबर्न येथे पहिली बॉक्सिंग डे कसोटी खेळली गेली होती. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेदरम्यान हा सामना झाला. जरी हा सामना २२ डिसेंबरपासून सुरू झाला आणि सामन्याचा ५वा दिवस बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) रोजी होता. १९८० पासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ऑस्ट्रेलियन संघ सतत बॉक्सिंग डे कसोटी खेळत आहे. (टीप- १९८९ मध्ये मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डेवर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय सामना झाला होता). ऑस्ट्रेलियाशिवाय दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या संघांनाही बॉक्सिंग डे वर सामने खेळायला आवडतात.

१८९२ मध्ये बॉक्सिंग डे ला पहिला सामना

क्रिकेटशिवाय इतर अनेक खेळांमध्ये बॉक्सिंग डे ला सामने खेळवले जातात. काही देशांमध्ये, बॉक्सिंग-डे कसोटी व्यतिरिक्त, देशांतर्गत स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. यासोबतच बॉक्सिंग डे वर इंग्लिश प्रीमियर लीग, स्कॉटिश प्रीमियर लीगचे सामनेही अनेकदा झाले आहेत. क्रिकेटमध्ये प्रथमच बॉक्सिंग डे सामना १८९२ साली ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत स्पर्धेत खेळला गेला. हा सामना शेफिल्ड शिल्ड या ऑस्ट्रेलियन देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धेसाठी खेळला गेला.

बॉक्सिंग डे कसोटीमध्ये टीम इंडियाची कामगिरी

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने पहिल्यांदा कसोटी विजय साकारला तो मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरच. त्यामुळे भारतासाठी हे मैदान खूपच जिव्हाळ्याचं आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण ९ बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळले आहेत. हे नऊ कसोटी सामने १९८५, १९९१, १९९९, २००३, २००७, २०११, २०१४, २०१८ आणि २०२० मध्ये खेळले गेले. यादरम्यान भारतीय संघाने केवळ दोनच सामने जिंकले आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने पाच सामने जिंकले तर दोन सामने अनिर्णित राहिले. याशिवाय भारताने वेस्ट इंडिज (१९८७), दक्षिण आफ्रिका (१९९२, १९९६, २००६, २०१०, २०१३, २०२१) आणि न्यूझीलंड (१९९८) विरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळले आहेत.

कपिल देव, गावसकर आणि चंद्रशेखर यांचे बॉक्सिंग डे ला शानदार प्रदर्शन

मेलबर्न, ३० डिसेंबर १९७७ – ४ जानेवारी १९७८ या बॉक्सिंग डे कसोटीत भारताने २२२ धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. भारताच्या ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या विजयाचं श्रेय चंद्रशेखर आणि गावसकर या जोडीला जातं. चंद्रशेखर यांनी पटकावलेल्या १२ बळी आणि गावसकर यांनी झळकावलेलं शतक यांच्या बळावर भारतीय संघानं ऑस्ट्रेलियातला पहिलावहिला विजय मिळवला. बिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा ऐतिहासिक विजय साकारला. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीइतकंच केरी पॅकर लीगला या विजयाचं श्रेय जातं. आताच्या घडीला टी२० लीगचं जगभर पेव फुटलं आहे. मात्र ८०च्या दशकात केरी पॅकर यांनी पहिल्यांदा अशी संकल्पना राबवली.

मेलबर्न, ७ ते ११ फेब्रुवारी १९८१ साली ५९ धावांनी टीम इंडिया गुंडप्पा विश्वनाथ यांच्या शतकाच्या बळावर विजयी झाली होती. भारतीय संघाने २३७ धावा केल्या. मात्र दुसऱ्या बाजूने त्यांना कोणाही साथ दिली नाही. ऑस्ट्रेलियाकडून डेनिस लिली यांनी ४ बळी घेतले होते. ऑस्ट्रेलियाने ४१९ धावा करत मोठी आघाडी मिळवली होती. अॅलन बॉर्डर यांनी १२४ धावांची शतकी खेळी साकारली, भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी त्या कसोटीत ७६ तर डग वॉल्टर्स यांनी ७८ धावांची खेळी केली.

हेही वाचा: IND vs BAN: “बॅट घुमावो, ट्रॉफी की थोडी पप्पी लो…!” मोहम्मद कैफने पुजाराची खेचली, Video व्हायरल

भारतीय संघाने प्रत्युतरात ३२४ धावा केल्या. चेतन चौहान यांनी ८५ तर सुनील गावसकर यांनी ७० धावांची खेळी केली. गावसकर यांना पायचीत देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. बाद नसल्याचं वाटल्याने गावसकर यांनी चौहान यांच्या साथीने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता. गावसकर यांनी डाव आहे त्या स्थितीत सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र व्यवस्थापक सलीम दुर्रानी यांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती हाताळली. ऑस्ट्रेलियाला १४३ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र कपिल देव यांनी ५ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला मोठे भगदाड पाडलं. ऑस्ट्रेलियाच्या ८ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. विश्वनाथ यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

अन्य कुठल्या देशात बॉक्सिंग डे कसोटी होते?

न्यूझीलंडमध्ये वेलिंग्टन शहरातल्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी होते. न्यूझीलंडचा संघ पाहुण्या संघाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी खेळतो. गेल्या काही वर्षांमध्ये बॉक्सिंग डे दिनी एकदिवसीय किंवा टी२० सामने आयोजित करण्यात येत होते. मात्र २०१४ पासून हेगले ओव्हल, ख्राइस्टचर्च इथं बॉक्सिंग कसोटी होते. दक्षिण आफ्रिकेत बॉक्सिंग डे दिनापासून कसोटीला सुरुवात होते. गेली अनेक वर्षं सहारा स्टेडियम किंग्समीड, दरबान इथं ही कसोटी होते. गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिका संघ बॉक्सिंग दिनी सुरू झालेल्या चारदिवसीय कसोटीत सहभागी झाला होता.

Story img Loader