संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक हवामान संस्थेने जागतिक तापमान बदलाबाबतचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. हिमनद्या वाचिवण्यात आपण अपयशी ठरलो असल्याचे या अहवालात म्हटले आहे. हिमनद्या वेगाने वितळत असल्यामुळे मागच्या दशकात समुद्राची जलपातळी सरासरी ४.६२ मिलिमीटरने वाढली असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. शुक्रवारी (२२ एप्रिल) संपूर्ण जगाने वसुंधरा दिन साजरा केला. या दिनानिमित्त संयुक्त राष्ट्राच्या वतीने हवामान अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ज्यामध्ये हिमनद्यांचे वितळणे आणि समुद्राची पातळी वाढण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक हवामान संस्थेने (WMO) प्रकाशित केलेल्या या अहवालानुसार २०१५ ते २०२२ ही आठ वर्षे सर्वात उष्ण वर्षे म्हणून नोंदविण्यात आली. ज्यामुळे युरोपमध्ये २०२२ या एकाच वर्षात १५ हजारांहून अधिक लोकांचा उष्माघातामुळे बळी गेला. युरोपमधील हिमनद्या वितळण्याचा वेगही सामान्य पातळीपेक्षा अधिक आहे. अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान युरोपमधील काही हिमनद्यांची जाडी १.३ मीटर (४.३ फूट) वरून कमी झाली आहे.

possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
It is picture of never ending natural calamities Farmers injured by heavy rains are now in a new crisis
नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल

जागतिक हवामान संस्थेचे सरचिटणीस पेट्टेरी तलास (Petteri Taalas) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हिमनद्यांचे वितळणे आणि समुद्राची जलपातळी वाढण्याचे प्रमाण कमी करण्यात आपण आधीच अपयशी ठरलो आहोत. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात प्रचंड वाढ होत असल्यामुळे हजारो वर्षांपेक्षाही अधिक प्रमाणात समुद्राची पाणी पातळी वाढत आहे.

हे वाचा >> युरोपमध्ये उष्माघातामुळे २०२२ मध्ये तब्बल १५ हजार नागरिकांचा मृत्यू; जागतिक हवामान संस्थेने दिला इशारा

उच्च तापमानाची नोंद

तापमानवाढ कमी करण्यात ‘ला नीना’ सपशेल अपयशी ठरला आहे. ‘ला नीना’च्या प्रभावामुळे खरेतर थंड वातावरण असायला हवे होते. मात्र मागच्या आठ वर्षांत जगातील अनेक देशांमध्ये उच्च तापमानाची नोंद झाली. २०२१ साली हरितगृह वायूंचे उत्सर्जन सर्वोच्च पातळीवर पोहोचले. जागतिक स्तरावर कार्बन डायऑक्साईडमध्ये ४१५.७ पीपीएमची वाढ झाली. पूर्वऔद्योगिक काळाच्या तुलनेत ही वाढ १४९ टक्क्यांनी अधिक आहे. दरम्यान मिथेनमध्ये २६२ टक्के आणि नायट्रस ऑक्साईडमध्ये १२४ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे.

२०२२ मध्ये ही आकडेवारी आणखी वाढण्याची चिंता

जागतिक हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार समुद्राचे तापमान कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. काही ठिकाणी समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान ५८ टक्क्यांनी वाढले असून सागरी उष्णतेची लाट अनुभवायला मिळत आहे. हरितगृह वायूंमुळे हवामानप्रणालीमध्ये अडकून पडलेली सुमारे ९० टक्के ऊर्जा समुद्रात जाते. ज्यामुळे समुद्राचे तापमान वाढले असून त्याचा सागरी परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे.

२०६० च्या दशकात हवामानाची पातळी कळस गाठणार असल्याचा अंदाज तलास यांनी वर्तविला आहे. आपण यशस्वी उपाययोजना जरी राबविल्या तरी याअगोदरच पर्यावरणाला मोठी हानी पोहोचली आहे, त्याचे परिणाम दीर्घकाळ जाणवतील. मात्र आताच पुरेसे प्रयत्न केले तर नंतरची परिस्थिती सुधारू शकते, असेही ते म्हणाले आहेत.

Story img Loader