– पुशान महापात्रा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या विनाशकारी विषाणूचा उद्रेक झाला असताना संशय येणार नाही अशा पद्धतीने भुरळ पडून वापरकर्त्यांना लिंकवर क्लिक करण्यासाठी आणि अटॅचमेंट उघडण्यासाठी इमेल व संदेशाद्वारे आमंत्रण देऊन घबराट निर्माण करणे सायबर गुन्हेगारांकरिता सोयीचे झाले आहे. अशाप्रकारचे सायबर- हल्ले/ फसवणूक टाळायची असल्यास जागरुकता आणि सावधगिरी सर्वात जास्त आवश्यक आहे. सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. विविध प्रकारचे मेल पाठवून तुमची फसवणूक होई शकते. त्यामुळे सहज समजून घेऊयात खरा आणि फसवणूक करणाऱ्या इमेलबद्दल
- इमेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा इमेल अॅड्रेस त्याच्या नावाहून निराळा आहे का हे तपासून पहा : तुम्हाला शंका आल्यास इमेल अॅड्रेस तपासा किंवा इमेलमध्ये नमूद मजकूर तुम्हाला शीघ्र कृती करण्यासाठी भाग पाडतो का ते पहावे
- इमेलला अटॅचमेंट आहे का आणि अधिक माहितीकरिता फाईल डाऊनलोड करण्याची विनंती केली आहे का हे तपासावे : लोकांना फसवण्यासाठी, फाईल डाऊनलोड करावी म्हणून मजकूर तयार केला जातो. ही पद्धत हमखास वापरली जाते. त्यामुळे अशा लिंक्स टाळा.
- इमेलमध्ये अनोळखी युआरएल नाही याची खातरजमा कर : तुमची संवेदनशील खासगी माहिती मिळविण्याच्या उद्देशाने हॅकर्स अस्सल साईटचा बनावट नमुना तयार करतात. या खोट्या युआरएल इतक्या अस्सल वाटतात की, त्यांच्यातील फरक ओळखणे कठीण असते.कोणत्याही युआरएलवर क्लिक करण्यापूर्वी तपासून घ्या.
- मेलमधील भाषा व्यावसायिक नसणे किंवा व्याकरणाची अशुद्धता तपासून घ्या : साधारणपणे, व्यावसायिक मेल हे भाषेतील जाणत्या कंटेंट रायटरकडून लिहून घेतलेले असतात. त्यामुळे त्यात व्याकरणाच्या चुका नसतात. जर तुम्हाला स्पेलिंग, विरामचिन्हे आणि भाषिक चुका आढळल्यास त्या बिनअनुभवी घोटाळेबाज किंवा फसवणूक करणाऱ्याने केल्याचे समजावे.
- ते कोणती खासगी माहिती विचारत आहेत का ते तपासा :संघटना कशीही ग्राहकाची वैयक्तिक माहिती सहजपणे इमेलवर किंवा बँकेच्या क्रेडीट/डेबिट कार्डची माहिती मेसजवर विचारत नाही. त्यामुळे अशाप्रकारचे मेल किंवा मेसेज धोक्याचा इशारा समजावेत.
- त्यांनी डेडलाईन नमूद केली आहे का ते तपासा : तुम्हालाहॅकर पॉलिसी नूतनीकरणाविषयी इमेल पाठवू शकतो किंवा खरेदीवर मर्यादित कालावधीकरिता सूट मिळत असल्याचे गाजर दाखवू शकतो. अशाप्रकारच्या इमेलकडे दुर्लक्ष करावे.
स्वत:ला फसवणुकीपासून दूर ठेवण्यासाठी अवलंबता येतील अशा काही सर्वोत्तम पद्धती:
- लिंक खरी आहे का ते पडताळण्याकरिता माऊस लिंकवर फिरवा. संशय आल्यास क्लिक करू नका
- वैयक्तिक/ संवेदनशील माहितीची विचारणा करणाऱ्या कोणत्याही इमेलला प्रतिसाद देऊ नका
- पॉलिसी नूतनीकरण/प्रीमियम भरणा याकरिता आलेल्या कोणत्याही संशयित/ फिशिंग इमेलबाबत सावधगिरी राखा
- प्रख्यात आरोग्य संघटना जसे की डब्ल्यूएचओकडून आलेल्या इमेलपासून सावध रहा. ताज्या सल्ल्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट दया
- इशारा/धमकी देणारा मेल आल्यास घाबरून जाऊ नका. काळजीपूर्वक वाचा आणि कृती करा.
- वेगवेगळ्या साईटकरिता निराळे पासवर्ड वापरा
- विशेष फाईल आणि डेटा एनक्रप्ट करा
- पॉप-अप्समध्ये वैयक्तिक माहिती देऊ नका
- अनपेक्षित अटॅचमेंट उघडू नका
- तुमची सिस्टीम पॅचेस आणि अँटी व्हायरसने अपडेट ठेवा
(लेखक एमडी आणि सीईओ, एसबीआय जनरल इन्श्युरन्स आहेत )