संदीप कदम

‘फिफा’ने यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ‘अर्ध-स्वयंचलित ऑफसाइड तंत्रज्ञान’ (सेमी ऑटोमेटड) वापरात आणले आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची ही सुधारित आवृत्ती असल्याचे मानले जात आहे. परंतु स्पर्धेच्या सुरुवातीलाच काही ऑफसाइड निर्णयांमुळे गोंधळ निर्माण झाला. वादाला तोंड फुटले. ऑफसाइड नियम नक्की काय आहे आणि विश्वचषकामध्ये वापरण्यात येणारे नवीन तंत्रज्ञान काय आहे, याचा घेतलेला आढावा.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Virat Kohli and Yashavi Jaiswal dominated Australian newspaper front pages
Virat Kohli : ‘नव्या युगाचा मुकाबला…’, विराट-यशस्वी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकल्याने चाहत्यांचे वेधले लक्ष, PHOTOS व्हायरल

फुटबॉलमध्ये ऑफसाइडचा नियम काय आहे?

ऑफसाइड नियमाबाबत बराच संभ्रम असला तरी खेळाला आकार देण्यासाठी हा नियम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हा नियम आक्रमण करणाऱ्या खेळाडूंना प्रतिस्पर्ध्याच्या लक्ष्यासमोर कायमचे तळ ठोकण्यापासून रोखण्यासाठी आहे. आक्रमण करत असलेल्या संघाचा सर्वात आघाडीचा खेळाडू हा त्याच्या सहकाऱ्याने पास देण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी संघाच्या अखेरच्या खेळाडूपुढे, पण गोलरक्षकाच्या पुढ्यात (म्हणजे प्रतिस्पर्धी गोलरक्षक आणि संबंधित आक्रमक यांच्यादरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडू नसणे) गेल्यास त्या खेळाडूला ऑफसाइड ठरवले जाते. ऑफसाइड नियमाचा भंग केल्यानंतर आक्रमण करणारा संघ चेंडू गमावतो आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळाडू ज्या ठिकाणी ऑफसाइड ठरला, तेथून फ्री किक मिळते. येथे लक्षात ठेवण्याची महत्त्वाची बाब म्हणजे, एखाद्या खेळाडूने त्याच्याच गोलरक्षकाकडे पास दिला आणि चेंडू गोलरक्षकाकडे पोहोचण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी खेळाडूने चेंडूचा ताबा घेतला तर हा ऑफसाइड ठरत नाही.

कसोटी दोन्ही संघांची…

आक्रमणकर्त्यांसाठी सर्वात महत्त्वपूर्ण कौशल्यांपैकी एक म्हणजे त्यांच्या आघाडीपटूंना अचूकपणे धावण्यासाठी वेळ देणे, जेणेकरून पास देताना ते एकतर समांतर किंवा बचावात्मक रेषेच्या मागे असतील. अशा प्रकारे, ऑफसाइड नियमामुळे बचावकर्त्यांकडून वेग, अचूकता आणि कौशल्य आपल्याला पाहण्यास मिळते. फुटबॉल नियम तयार करण्याची जबाबदारी असणाऱ्या आणि ते योग्य रीतीने पाळले जात आहेत यावर लक्ष देणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना मंडळानुसार (आयएफएबी), “ जर त्याच्या सहकाऱ्याने निर्णायक पास देण्यापूर्वी त्याचे डोके, शरीर किंवा पाय यांचा कोणताही भाग प्रतिस्पर्ध्याच्या भागात असेल (हाफवे लाईन वगळून) तर, तो खेळाडू ऑफसाइड स्थितीत असतो”.

सामना सुरू असतानाच आला हार्ट अटॅक, मृत्यूवर मात करून पुन्हा खेळायला उतरला! डॅनिश फुटबॉलपटूचा अविश्वसनीय संघर्ष!

या नियमाची गरज का?

ऑफसाइड नियमाशिवाय, फुटबॉल हा असा एक खेळ बनेल जिथे आक्रमण करणारा संघ शक्य तितक्या खेळाडूंना प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्रात ढकलू शकेल आणि त्यांच्याकडे सातत्याने चेंडू पास करू शकतील. यामुळे बचावातून बाहेर पडण्याकरता कोणतेही प्रोत्साहन मिळणार नाही आणि आक्रमण करणाऱ्या संघांना बचाव फळीवर दबाव निर्माण करण्याची संधी मिळेल. त्यामुळे, फुटबॉलचे रूप बदलून जाईल.

आतापर्यंत ऑफसाइड कसे निर्धारित केले गेले आहेत?

पारंपरिकपणे, ऑफसाइडविषयी कौल हे फुटबॉल मैदानाच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोन लाइनमन (पुरुष) किंवा लाइनवुमनचे (महिला) अधिकार क्षेत्र आहे. लाइनमन खेळात असताना आताच्या काळात त्यांना अधिक अचूक निर्णय घेण्यासाठी तंत्रज्ञानाद्वारे मदत केली जाते. शेवटी, नियमानुसार पास खेळल्याचा क्षण आणि आक्रमण करणाऱ्या खेळाडूची स्थिती दोन्ही पाहण्यासाठी लाइन रेफ्रीची (पंच) आवश्यकता असते. जेव्हा पास मैदानाच्या सखोल स्थानातून धाडला जातो आणि आघाडीपटू आपल्या योग्य जागी नसेल, तेव्हा निर्णय घेणे खूप आव्हानात्मक असू शकतो

अशा वेळी, चित्रफीत साहाय्यक सामनाधिकारी (व्हीएआर) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊ लागला. विशेषत: गोल करण्याची क्रिया घडून गेल्यानंतर ऑफसाइडच्या अचूक निर्णयासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते. अशा प्रकारे एखाद्या खेळाडूने ऑफसाइड स्थितीत चेंडू स्वीकारला आणि गोल केला तर, तो गोल रद्द केला जाईल. पुढे लाइन सामनाधिकारीला गोल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खेळाडूला ऑफसाइड न ठरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विश्लेषण: सौदीविरुद्ध अर्जेंटिनाला अतिआत्मविश्वास भोवला का? बाद फेरीचा मार्ग किती खडतर?

‘व्हीएआर’द्वारे ऑफसाइड देण्यासाठी वापरलेले जुने तंत्रज्ञान (इंग्लिश प्रीमियर लीगसह बहुतेक फुटबॉल स्पर्धांमध्ये अजूनही वापरले जाणारे तंत्रज्ञान) हे सामन्याचे क्षण पुन्हा पाहणे, पास देणाऱ्या खेळाडूच्या शेवटच्या संपर्काचा बिंदू निर्धारित करणे आणि फ्रेम गोठवणे यावर अवलंबून असते.

जर आक्रमणकर्त्याची रेषा बचावपटूपेक्षा गोलच्या जवळ असेल, तर तो खेळाडू ऑफसाइड असल्याचे मानले जाते. सुरुवातीला, या पद्धतीमध्ये काही स्पष्ट समस्या आहेत. ‘द्विमित’ (२ डी) प्रतिमेवर वास्तविक ‘त्रिमित’ (३ डी) जागा अचूकपणे चित्रित करणे अशक्य आहे. दुसरे म्हणजे, अंतिम पास देणाऱ्या खेळाडूसाठी संपर्काचा नेमका बिंदू निश्चित करणे कठीण आहे. दोन फ्रेम्समधील फरकावरून ऑफसाइड आहे की नाही हे समजते.

‘फिफा’चे नवीन तंत्रज्ञान कसे आहे?

‘फिफा’च्या माहितीनुसार, “नवीन तंत्रज्ञान चेंडूचा मागोवा घेण्यासाठी स्टेडियमच्या छताच्या खाली बसवलेले १२ ट्रॅकिंग कॅमेरे वापरते आणि मैदानावरील त्यांची नेमकी स्थिती मोजण्यासाठी प्रत्येक खेळाडूचे २९ डेटा पॉइंट्स (प्रत्येक सेकंदाला ५० वेळा) एकत्रित केले जातात. २९ संकलित डेटा पॉइंट्समध्ये ऑफसाइडचा निर्णय देण्यासाठी संबंधित सर्व अंगांचा समावेश असतो.

‘अल रिहला, अदिदास’ हा कतार विश्वचषकासाठीचा अधिकृत चेंडू आहे. या चेंडूच्या माध्यमातूनही ऑफसाइड शोधण्यास मदत मिळते. या चेंडूच्या आत एक इनर्शियल मापन युनिट (आयएमयू) सेन्सर आहे. हा सेन्सर, चेंडूच्या मध्यभागी स्थित असून तो सहायक रेफ्रींच्या खोलीत प्रति सेकंद ५०० वेळा माहिती पाठवतो, ज्यामुळे किक पॉइंट अगदी अचूकपणे ओळखता येतो.

मग वाद का निर्माण होत आहेत?

सोप्या भाषेत सांगायचे तर, तंत्रज्ञान अचूक असल्याचे दिसते. आतापर्यंत, विश्वचषकातील ऑफसाइडच्या भोवतीचा वाद हा ऑफसाइडमुळे नामंजूर केलेल्या गोलबद्दल होता. विशेष म्हणजे, मंगळवारी अर्जेंटिनाच्या लॉटारो मार्टिनेझचा गोल नामंजूर केला गेला. यामध्ये तो ऑफसाइड नियमाच्या कक्षेत असला तरीही तो गोल दिला जाऊ शकला असता. मार्टिनेझचा खांदा जिथे होता त्यापेक्षा एक इंच मागे असता तर, तो ऑफसाइड झाला नसता आणि गोल ग्राह्य धरला गेला असता. अर्जेंटिनाने ३०व्या मिनिटापूर्वी सौदी अरेबियाविरुद्ध २-० अशी आघाडी घेतली असती. ज्या सामन्यात ते अखेरीस सौदी अरेबियाकडून पराभूत झाले.

विश्लेषण: सौदीकडून मेसीच्या अर्जेंटिनाला धक्का! विश्वचषकात धक्कादायक निकाल वाढू लागले आहेत का?

यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये, मार्टिनेझला बहुधा ऑफसाइड म्हटले गेले नसते. उघड्या डोळ्यांनी पाहताना, तो बचावकर्त्याच्या ओळीत दिसत होता. पूर्वी वापरलेले ‘व्हीएआर’ तंत्रज्ञान असतानाही, अशा नजीकच्या निर्णयांमध्ये त्याला संशयाचा फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे. पण आता त्याला फायदा झाला नाही.

‘व्हीएआर’ पहिल्यांदा सादर करण्यात आला तेव्हा ही समस्या प्रत्यक्षात समोर आली होती. आर्सेनलचे माजी व्यवस्थापक आणि सध्याच्या ‘फिफा’च्या जागतिक विकास विभागाचे प्रमुख असलेल्या आर्सेन वेंगर यांच्या मते, आक्रमण आणि आकर्षक फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन ऑफसाइड नियम आणण्याची गरज आहे.