FIFA World Cup 2022 Football Charging: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं यंदाचं पर्व अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरत आहे. विशेष म्हणजे उप-उपांत्यपूर्व फेरीमध्ये म्हणजेच राऊंड ऑफ १६ मध्ये पहिल्यांदाच सर्व खंडांमधील सर पात्र ठरले आहेत. कतारमधील यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमधील अंतिम आठ संघ कोणते असतील हे निश्चित झालं आहे. मात्र अव्वल १६ संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या संघांनी मजल मारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र स्पर्धेमधील आणखीन एक चर्चेची गोष्ट ठरत आहे ती म्हणजे चार्जिंग केले जाणारे फुटबॉल. होय हे खरं आहे या स्पर्धेमधील प्रत्येक सामन्याआधी सामन्यात वापरले जाणारे फुटबॉल हे खरोखरच एखाद्या फोन किंवा गॅजेटप्रमाणे चर्ज केले जतात. मात्र हे चार्ज होणारे फुटबॉल नेमके आहेत कसे, ते चार्ज कशासाठी करतात, यासाठी काय वापरण्यात आलं आहे यासारखे अनेक प्रश्न आता तुम्हाला पडले असतील. याच प्रश्नांची उत्तर आपण या लेखातून जाणून घेऊयात…

मागील ५० वर्षांपासून ही कंपनी पुरवतेय फुटबॉल

कतारमधील विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याच्या आधीच ‘आदिदास’ या खेळाचं सामान बनवणाऱ्या कंपनीने ‘फिफा’बरोबर स्पर्धेसाठी फुटबॉल पुरवण्याचं कंत्राट केलं. यंदाच्या फुटबॉल विश्वचषकामधील बॉलचं अधिकृत नामकरण ‘अल् रिहला’ असं ठेवण्यात आलं आहे. अरेबिक भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ प्रवास असा होतो. मागील ५० वर्षांपासून ‘आदिदास’ कंपनी ‘फिफा’शी संलग्न आहे. १९७० साली पहिल्यांदा ‘आदिदास’ने ‘फिफा’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी चेंडू पुरवण्यासंदर्भातील कंत्राट केलं होतं.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
flights affected by bomb threat
वाढत्या विमान धमक्यांचा ५१० उड्डाणांवर परिणाम…धमकीखोरांच्या बंदोबस्तासाठी कोणत्या उपाययोजना? किती परिणामकारक?
Virat Kohli and Yashavi Jaiswal dominated Australian newspaper front pages
Virat Kohli : ‘नव्या युगाचा मुकाबला…’, विराट-यशस्वी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकल्याने चाहत्यांचे वेधले लक्ष, PHOTOS व्हायरल

आतापर्यंतचा सर्वात हाय-टेक फुटबॉल वर्ल्डकप

जेव्हा आपण फुटबॉलबद्दल बोलतो तेव्हा आपण उच्च तंत्रज्ञानाचा या अगदी साध्या वाटणाऱ्या आणि किमान साहित्याची आश्यकता असलेल्या खेळात वापर होत असेल असा विचार करत नाही. मात्र ही स्पर्धा पाहणाऱ्या अनेकांनी मैदानाच्या बाजूला असलेल्या भागामध्ये फुटबॉल चार्ज होताना पाहिले असतील. एखादा फुटबॉल चार्ज केला जातोय हे पाहायला फार विचित्र वाटत असलं तरी यामागील कारणंही तितकीच खास आहे. यंदाची विश्वचषक स्पर्धा ही आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांपैकी सर्वात हाय-टेक म्हणजेच उच्च प्रतीचं तंत्रज्ञान वापरण्यात आलेली स्पर्धा आहे.

फुटबॉलमधील हे नेमकं तंत्रज्ञान आहे तरी काय?

‘आदिदास’ कंपनीकडून पुरवल्या जाणाऱ्या या फुटबॉलमध्ये सेन्सर्स आहेत. या सेन्सर्सच्या माध्यमातून चेंडूचा वेग किती आहे, तो कोणत्या दिशेने गेला यासारखी माहिती गोळा केली जाते. बॉल ट्रकिंग तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाला व्हीएआर असं म्हणतात. या सेन्सर्स असलेल्या फुटबॉलमध्ये छोट्या आकाराची बॅटरी असते. ही बॅटरी चेंडू वापरला जात असताना सलग सहा तास कार्यरत राहते. तसेच चेंडू वापरता नसेल तर ही बॅटरी १८ दिवस काम करते. सामान्यपणे ९० मिनिटांचा खेळ आणि अतिरिक्त वाढीव वेळ गृहित धरला तरी सहा तासांची बॅटरी लाइफ ही पुरेशी ठरते.

नक्की वाचा >> विश्लेषण: FIFA वर्ल्ड कपवर करोनापेक्षाही घातक अशा ‘कॅमल फ्लू’चं संकट, WHO चा इशारा; मात्र या आजाराची लक्षणं काय?

फोटो सौजन्य- ‘रेडइट’वरुन साभार

‘त्या’ सामन्यामुळे या हाय-टेक चेंडूने वेधलं लक्ष

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमधील या खास हाय-टेक फुटबॉलची सर्वात आधी चर्चा त्यावेळी झाली तेव्हा पोर्तुगाल विरुद्ध ऊराग्वे सामन्यामध्ये ब्रुनो फर्नांडिसने गोल केला की ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोल केला याबद्दल संभ्रम निर्माण झाला. प्रथमदर्शनी रोनाल्डोने गोल नोंदवल्यासारखं वाटत होतं तरी हा गोल ब्रुनोचा असल्याचं या चेंडूमधील आधुनिक तंत्रज्ञानामुळे कळलं. या सामन्यापूर्वी कोणालाही या चेंडूमधील आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल कल्पना नव्हती. या सामन्यानंतर हा चेंडू आणि त्यामध्ये वापरलं जाणारं तंत्रज्ञान जगभरात चर्चेत आहे.

काय फायदा होतो या चेंडूमुळे?

‘रेडइट’वर एका युझरने अपलोड केलेल्या फोटोमध्ये विश्वचषक फुटबॉल सामन्याआधी चार चेंडू मोबाईलप्रमाणे चार्ज केले जात असल्याचं दिसत आहे. या चेंडूंमधील सेन्सर्स हे १४ ग्राम वजनाचे असतात. या सेन्सर्सच्या मदतीने सामन्यादरम्यान चेंडूंच्या हलचालींचा वेध घेता येतो. मैदानाच्या चहुबाजूंनी मैदानातील घडामोडींवर कॅमेराची नजर असतानाच या चेंडूंमधील तंत्रज्ञानामुळे मैदानावरील पंचांना ऑफसाइड आणि खेळासंदर्भातील इतर निर्णय घेण्यास मदत होते.

फोटो सौजन्य – डेलीमेल/सोशल मीडियावरुन साभार

कोणी तयार केला आहे हा चेंडू आणि कशी गोळा केली जाते माहिती?

‘कीनेक्सॉन’ नावाच्या कंपनीचे हे सेन्सर्स आहेत. या कंपनीने सहा वर्षांच्या संशोधनानंतर यशस्वीरित्या हे सेन्सॉर्स बनवाले आणि त्यांच्या चाचण्या पूर्व केल्या. यंदाच्या विश्वचषकात वापरल्या जाणाऱ्या फुटबॉलमध्ये खरं तर एक छोटं यंत्र असून त्यामध्ये दोन सेन्सॉर्स आहेत. दोन्ही सेन्सॉर्सचा वापर वेगवगेळ्या कारणासाठी केला जातो. यापैकी एक सेन्सर हे अल्ट्रा-वाईडबॅण्ड (यूडब्लूबी) म्हणून ओळखलं जातं. या यूडब्लूबी हे जीपीएस किंवा ब्यूटूथपेक्षा अधिक संवेदनशील आणि अचूक तंत्रज्ञान आहे. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हे सेन्सर वापरलं जातं. दुसरा सेन्सर हा इंटरनल मेजरमेंट युनीट (आयएमयू) म्हणून ओळखला जातो. या सेन्सरच्या माध्यमातून चेंडूच्या हालचालींबद्दलची आकडेवारी गोळा केली जाते.

मैदानाच्या सीमेजवळ माहिती गोळा करणारे ‘एलपीएस’

सामनादरम्यान जेव्हा जेव्हा चेंडूला लाथ मारली जाते किंवा स्पर्श केला जातो तेव्हा हे सेन्सॉर्स सक्रीय होतात. हे सेन्सॉर्स प्रती सेकंद ५०० फ्रेम्सच्या वेगाने माहिती गोळा करतात. ही माहिती लगेच लोकल पोजिशनिंग सिस्टीम म्हणजेच ‘एलपीएस’कडे पाठवली जाते. हे माहिती गोळा करणारे ‘एलपीएस’ मैदानाच्या बाहेरील बाजूला लावलेले असतात. ‘एलपीएस’ चेंडूच्या हलचालींसंदर्भातील माहिती गोळा करुन पुढे त्यावर आधारित विश्लेषण करण्यासाठी पाठवतं.

नक्की वाचा >> विश्लेषण: कतार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भरपाई वेळ का वाढतोय?

मेड इन पाकिस्तान

समोर आलेल्या माहितीनुसार ‘आदिदास’ कंपनीला फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ मध्ये वापरले जाणारे फुटबॉल बनवण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागली. जगभरामध्ये बनवल्या जाणाऱ्या फुटबॉलपैकी ७० टक्क्यांहून अधिक फुटबॉल हे पाकिस्तानमधील सियालकोट येथे बनवले जातात. याच ठिकाणी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठीचे फुटबॉल बनवण्यात आले आहेत.

१८ डिसेंबर रोजी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये क्रोशिया, ब्राझील, नेदर्लण्डस्, अर्जेंटिना, पोर्तुगाल, मोरक्को, इंग्लंड, फ्रान्स हे संघ पात्र ठरले असून शुक्रवारपासून उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे.