तमिळनाडूच्या राजकारणावर सिनेसृष्टीत वावरणारे बडे अभिनेते, अभिनेत्रींचे वर्चस्व राहिलेले आहे. या राज्यात आतापर्यंत असे पाच मुख्यमंत्री होऊन गेले आहेत की, ज्यांचा चित्रपटसृष्टीशी थेट संबंध राहिलेला आहे. त्यानंतर आता तमीळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय यानेदेखील तमिझगा वेत्री कळघम या नावाने आपला नवा पक्ष काढत, राजकारणात उडी घेतली आहे. त्याचा पक्ष २०२६ सालची तमिळनाडूतील विधानसभा निवडणूक लढविणार आहे. याच पार्श्वभूमीवर तमिळनाडूत आतापर्यंत असे किती राजकारणी होऊन गेले; जे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते? तमिळनाडूच्या राजकारणावर सिनेसृष्टीचा कसा प्रभाव राहिलेला आहे? ते जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अण्णादुराई तमिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री
थलपती विजय हा पहिलाच असा अभिनेता नाही की, ज्याने तमिळनाडूच्या राजकारणात उडी घेतली आहे. तमिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री अण्णादुराई हेदेखील सिनेसृष्टीशीच निगडित होते. ते द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाशी संबंधित होते. त्यांनी आपली राजकीय विचारधारा लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी चित्रपट या माध्यमाचा खुबीने वापर केला. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. नल्लाथांबी (१९४८) व वेल्लईकारी (१९४९) यांसारख्या चित्रपटांद्वारे त्यांनी ब्राह्मणवादावर टीका केली.
रॉबर्ट एल. हार्डग्रेव्ह ज्युनियर यांनी ‘पॉलिटिक्स अॅण्ड द फिल्म इन तमिळनाडू’ नावाचा एक प्रबंध लिहिलेला आहे. या प्रबंधात त्यांनी तमिळनाडूच्या राजकारणावर चित्रपटांचा कसा प्रभाव होता, याबाबत सविस्तर सांगितले आहे. “द्रविड मुन्नेत्र कळघमचे पुरस्कर्ते म्हणून अण्णादुराई यांनी सामाजिक सुधारणा आणि ब्राह्मणेतर स्वाभिमान जागविण्यासाठी अनेक नाटकं लिहिली. डीएमके पक्षाची स्थापना झाल्यानंतर अण्णादुराई, ई. व्ही. के संपत, के. आर. रामास्वामी या तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेते आणि कलाकारांनी पक्षवाढीसाठी वेगवेगळी नाटकं सादर केली,” असे या प्रबंधात नमूद करण्यात आले आहे.
‘याच काळात द्रविडियन अस्मिता आणि स्वाभिमान म्हणून तमीळ भाषेतून संस्कृत शब्द काढून टाकण्यात आले. चित्रपटांतून तमिळनाडूतील चोल साम्राज्याचा सुवर्णकाळ दाखवला जाऊ लागला. चित्रपटात ब्राह्मण पात्रांना खलनायक किंवा वेंधळे असल्याचे दाखवले जाऊ लागले,’ असेही रॉबर्ट एल. हार्डग्रेव्ह ज्युनियर यांनी आपल्या प्रबंधात नमूद केलेले आहे.
अण्णादुराई यांच्यानंतर एम. करुणानिधींकडे नेतृत्व
अण्णादुराई यांच्यानंतर एम. करुणानिधी हे डीएमके पक्षाचे प्रमुख झाले. पुढे त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपदही भूषवले. त्यांनी अण्णादुराई यांचा वैचारिक वारसा पुढे चालू ठेवला. करुणानिधी यांनी शिवाजी गानसेन यांची भूमिका असलेल्या पराशक्ती (१९५२) चित्रपटासाठी पटकथा लिहिली. एस. थिओडोर बास्करन यांच्या ‘द आय ऑफ द सर्पेंट : अॅन इंट्रोडक्शन टू तमीळ सिनेमा’ (१९९६) या पुस्तकात तमीळ चित्रपटसृष्टीतील सर्वांत वादग्रस्त चित्रपट, असा चित्रपटाचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
द्रविडियन विचारधारेसाठी चित्रपटाचा वापर
या चित्रपटात मंदिराचा पुजारी एका महिलेवर बलात्कार करतो. त्यानंतर नायकाच्या तोंडी जे संवाद टाकण्यात आले होते, ते वादग्रस्त ठरले होते. चित्रपटात एका प्रसंगात ‘नावाचा जप केला आणि दगडाला फुले वाहिली म्हणजे दगडाचा देव हेईल का,’ असा प्रश्न नायक देवाची प्रार्थना करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला विचारताना दिसतो. चित्रपटातील याच संवादावर आक्षेप घेण्यात आले होते. सुरुवातीला तर या चित्रपटावर बंदीदेखील घालण्यात आली होती. या चित्रपटाबाबत करुणानिधी यांनी एका मुलाखतीत भाष्य केले होते. “मला न्याय आणि सामाजिक सुधारणेचे धोरण याचा लोकांना परिचय करून द्यायचा होता. तसेच डीएमके पक्षाच्या धोरणानुसार मला तमीळ भाषेचा दर्जा वाढवायचा होता,” असे करुणानिधी त्या मुलाखतीत म्हणाले होते.
नागसेन यांचा डीएमके पक्षाचा त्याग
पराशक्ती चित्रपटात गानसेन हे प्रमुख भूमिकेत होते. गानसेन हे डीएमके पक्षाचे संस्थापक सदस्य होते. मात्र, पुढे तिरुपती मंदिराला भेट दिल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. द्रविडीयन सिद्धांताच्या हे विरुद्ध असल्याचे म्हणत त्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे १९५६ साली त्यांनी डीएमके पक्षाचा त्याग केला. त्यांनी पुढे काँग्रेस, जनता दल अशा पक्षांत प्रवेश केला. त्यांनी स्वत:चा पक्षही स्थापन केला होता. मात्र, सिनेसृष्टीत जेवढे यश मिळाले, तेवढे यश त्यांना राजकारणात मिळू शकले नाही. १९९३ साली त्यांनी राजकीय संन्यास घेतला.
एमजीआर, जयललिता व एआयएडीएमके
एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) हे तमीळ सिनेसृष्टीतील सर्वांत मोठे स्टार होते. डीएमके पक्षाचे ते खजिनदार होते. त्यांच्या प्रचंड चाहत्यांमुळे डीएमके पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश मिळायचे. अभिनयाशिवाय ते समाजसेवेचेही काम करायचे. ते अनाथाश्रमांना देणगी द्यायचे, आपत्ती निवारण मोहिमेत सहभागी व्हायचे.
“कला व राजकारण नाण्याच्या दोन बाजू”
हार्डग्रेव्ह यांनी एमजीआर यांच्याविषयीही आपली निरीक्षणे नोंदवलेली आहेत. “एमजीआर हे स्वत:कडे सामान्य माणसाचा रक्षक म्हणून पाहायचे. सामान्य माणसाने कसे जगायला पाहिजे, कशावर विश्वास ठेवला पाहिजे हे मी माझ्या भूमिकेतून सांगण्याचा प्रयत्न करतो”, असे एमजीआर म्हणतात, असे हार्डग्रेव्ह यांनी नमूद केले आहे. “कला आणि राजकारण या नाण्याच्या दोन बाजू आहेत. सिनेमा हा सामाजिक आणि राजकीय प्रभाव टाकू शकतो,” असे एमजीआर १९६७ सालच्या एका मुलाखतीत म्हणाले होते.
एमजीआर यांच्याकडून नव्या पक्षाची स्थापना
एमजीआर यांची १९७२ मध्ये डीएमके पक्षातून हकालपट्टी झाली होती. करुणानिधी यांच्याशी मतभेद झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर एमजीआर यांनी ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांनी नेत्रू इंद्रू नलाई (१९७४) व इधायकानी (१९७५) असे चित्रपट काढले. या चित्रपटांतून त्यांनी पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. १९७७ साली एमजीआर यांनी विधानसभा निवडणुकीत विजयी कामगिरी केली आणि ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. पुढे ते निधनापर्यंत म्हणजेच १९८७ सालापर्यंत मुख्यमंत्री होते.
व्ही. एन. जानकी रामचंद्रन आणि जे. जयललिता यांच्यात संघर्ष
एमजीआर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी व्ही. एन. जानकी रामचंद्रन आणि जे. जयललिता यांच्यात उत्तराधिकारासाठी संघर्ष चालू झाले. जयललिता या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी एमजीआर यांच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केले होते. पुढे जयललिता यांचा गट खरा एआयएडीएमके पक्ष म्हणून उदयास आला. त्या १९९१ साली मुख्यमंत्री झाल्या. पुढे पाच वेळा निवडणूक जिंकत, त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद यशस्वीपणे सांभाळले.
जयललिता यांचा मोठा चाहतावर्ग
जयललिता यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे संवर्धन करण्यासाठी सिनेसृष्टीचा फारसा उपयोग झाला नाही. मात्र, एमजीआर यांच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केल्यामुळे जयललिता यांचाही मोठा चाहतावर्ग होता. त्यांनी एमजीआर यांच्यासह आयराथिल ओरुवन (१९६५), नाम नाडू (१९६९) यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले.
विजयकांत आणि कमल हसन
जयललिता यांच्यानंतर साधारणत: तीन दशकांनी ‘कॅप्टन’ विजयकांत यांनी राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (DMDK) नावाचा पक्ष स्थापन केला. ज्याप्रमाणे एमजीआर निळ्या कारमधून प्रचारासाठी येत असत, अगदी तशाच पद्धतीने एकदा विजयकांतदेखील निळ्या कारमधून लोकांशी संवाद साधण्यासाठी आले होते. चित्रपटांत त्यांना उपेक्षित लोकांचे प्रतिनिधित्व करणारा नायक म्हणून दाखवण्यात आले; ज्यामुळे ते लोकनेता म्हणून ते ओळखले जाऊ लागले. २००६ सालच्या पहिल्या निवडणुकीत विजयकांत यांच्या पक्षाला एकूण आठ टक्के मते मिळाली. या निवडणुकीत विजयकांत यांचा विजय झाला होता. तर २०११ सालच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने ४१ पैकी २९ जागांवर विजय मिळवला होता.
कमल हसन यांची राजकारणात उडी
तमीळ चित्रपटसृष्टीतील आणखी एक सुपरस्टार कमल हसन यांनीदेखील २०१८ साली मक्कल नीधी मैयम नावाने नवा पक्ष स्थापन केला. त्यांच्या पक्षाने २०१९ सालच्या निवडणुकीत एकूण ३९ जागा लढविल्या होत्या; मात्र एकाही जागेवर त्यांचा विजय झाला नाही. २०२१ सालच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पक्ष एकही जागा जिंकू शकला नाही. या निवडणुकीत खुद्द कमल हसन यांचादेखील पराभव झाला.
थलपती विजय राजकारणात यशस्वी होणार का?
तमीळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता थलपती विजय राजकारणात आला आहे. त्याने स्वत:चा तमिझगा वेत्री कळघम या नावाचा पक्ष काढला आहे. २०२६ साली होणाऱ्या तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणावर नेहमी द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) या दोनच पक्षांचा प्रभाव राहिलेला आहे. मतांच्या दृष्टीने विचार करायचा झाला, तर तमिळनाडूतील साधारण ७० ते ८० टक्के मतदार या दोन्ही पक्षांच्या मागे उभे असतात. उर्वरित २० ते ३० टक्के मते मिळविण्यासाठी इतर पक्षांची धडपड असते. थलपती विजयच्या पक्षाचाही तोच प्रयत्न असणार आहे.
जात, धर्म, वर्ग व प्रदेशापलीकडे जाऊन जनसंपर्क?
थलपती विजय हा तमिळनाडूमध्ये अभिनेता म्हणून खूप प्रसिद्ध आहे. हीच बाब त्याला राजकारणात आपले बस्तान बसवण्यासाठी महत्त्वाची आणि मदतीची ठरणार आहे. थलपती विजय हा मूळचा ख्रिश्चन धर्मीय आहे. त्यामुळे तो तमिळनाडूतील उदयार या मागास समाजाला मतं मागू शकतो. मात्र, तमिळनाडूतील राजकीय जाणकारांनुसार थलपती विजय जात, धर्म, वर्ग व प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे.
“सध्या विभाजनवादी राजकारणाची संस्कृती”
थलपती विजयने जारी केलेल्या निवेदनात त्याने आपला नवा पक्ष, तसेच आगामी राजकारण याबद्दल भाष्य केले आहे. “सध्याच्या राजकारणाशी तुम्ही सगळेच परिचित आहातच. एकीकडे भ्रष्टाचार आणि कलंकित राजकारणाची संस्कृती आहे; तर दुसरीकडे विभाजनवादी राजकारणाची संस्कृती पाहायला मिळतेय. या माध्यमातून लोकांचे जात आणि धर्माच्या नावावर विभाजन करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपली प्रगती आणि एकता यांच्यात हे सर्व अडथळे आहेत,” असे विजयने आपल्या निवेदनात म्हटले आहे.