संजय जाधव

मागील काही काळात फिनफ्लुएन्सरचे पीक फार वेगाने वाढले आहे. समाजमाध्यमांत त्यांचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात दिसतो. सामान्य नागरिकांना गुंतवणुकीचा सल्ला देण्याचे काम ते करतात. त्यातील अनेक जण गुंतवणुकीवर अवाच्या सवा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवितात. त्याला भुलून अनेक जण गुंतवणूक करतात आणि फसतात. भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीने नुकताच ‘बाप ऑफ चार्ट’ या नावाने समाजमाध्यमांवर चॅनल चालविणाऱ्या मोहम्मद नासीर या फिनफ्लुएन्सरवर कारवाईचा दंडुका उगारला..

Reliance Industries Q3 results,
रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही नफा वाढून १८,५४० कोटींवर; शेअरच्या भाव वाढेल काय, विश्लेषकांचे अंदाज काय?  
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

कोण आहे बाप ऑफ चार्ट?

मोहम्मद नसीरुद्दीन अन्सारी हा ‘बाप ऑफ चार्ट’चा मालक आहे. तो समाजमाध्यमांवर स्वत:ला भांडवली बाजारातील तज्ज्ञ म्हणवून घेतो. त्याचे यूटय़ूबवर ४ लाख ४३ हजार सबस्क्रायबर आणि एक्सवर ८३ हजार फॉलोअर आहेत. तो भांडवली बाजारातील व्यवहारांसंदर्भात सल्ला देण्याबरोबरच त्याबद्दलचे अभ्यासक्रम चालवत होता. ग्राहकांना गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करत असल्याचा त्याचा दावा होता. ग्राहकांनी नोंदणी शुल्क भरल्यानंतर तो वैयक्तिक मार्गदर्शनाची हमी देत असे. त्याचबरोबर फोन कॉलवरही मार्गदर्शन करण्याचे आश्वासन देत असे. त्याने गुंतवणुकीवर २०० ते ३०० पट परतावा देण्याचे जाहीर केले होते. 

हेही वाचा >>> अजित जोगी ते भूपेश बघेल, जाणून घ्या छत्तीसगड राज्याचा राजकीय इतिहास!

नेमकी कार्यपद्धती कशी?

‘बाप ऑफ चार्ट’च्या माध्यमातून यूटय़ूब, एक्स, इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम या समाजमाध्यमांवर गुंतवणुकीबाबत सल्ला देण्यात येत होता. याचबरोबर अनेक अभ्यासक्रम चालविले जात होते. शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या नावाखाली भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत होता आणि यासाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जात होते. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन ग्राहकांना भुलवण्यात आल्याचा आरोप मोहम्मद नसीरुद्दीन अन्सारीवर आहे. सेबीने केलेल्या तपासानुसार, अन्सारी हा ग्राहकांना अनेक पटीने नफा कमावून देण्याचे आश्वासन देत होता. प्रत्यक्षात जानेवारी २०२१ ते जुलै २०२३ या कालावधीत त्याला भांडवली बाजारात २.८९ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे समोर आले आहे. त्याच वेळी तो २०० ते ३०० टक्के नफा मिळवून देण्याचे आणि त्याचा सल्ला ९५ टक्के बरोबर असल्याचे दावे करत होता.

सेबीची नेमकी कारवाई काय?

अन्सारी याला सेबीने दणका देत १७.२ कोटी रुपयांचा दंड केला आहे. सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर ‘बाप ऑफ चार्ट’ची समाजमाध्यमांवरील खाती वापरण्यास बंदी घातली आहे. भांडवली बाजारातही त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. सेबीने अन्सारी आणि इतर दोघांना दंडाची रक्कम १५ दिवसांत भरण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, त्याला गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे अन्यत्र वळविण्यास मनाईही केली आहे. त्याच्या सर्व प्रकारच्या जाहिराती समाजमाध्यमांवरून काढून टाकण्यास सेबीने सांगितले आहे.

हेही वाचा >>> रश्मिका मंदानाचा ‘डीपफेक’ व्हिडीओ व्हायरल; पण डीपफेक तंत्रज्ञान आहे तरी काय?

आतापर्यंत किती जणांवर कारवाई?

सेबीच्या आकडेवारीनुसार, मागील वर्षभराच्या कालावधीत नोंदणीकृत नसलेल्या १५ गुंतवणूक सल्लागारांवर कारवाई करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना अनेक पटींनी परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या अशा गुंतवणूक सल्लागारांचे पीक फोफावल्याने सेबीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सेबीने यातील सर्वात मोठी कारवाई मे महिन्यात केली होती. त्या वेळी पी. आर. सुंदर या फिनफ्लुएन्सरवर कारवाई करण्यात आली होती. तो आघाडीचा फिनफ्लुएन्सर होता आणि त्याचे यूटय़ूबवर १० लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. भांडवली बाजारात व्यवहार करण्यास त्याला एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तो नोंदणी नसतानाही भांडवली बाजाराबाबत दैनंदिन सल्ला आणि इतर सेवा देत होता. याचबरोबर ‘बोर्स इंडिया इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजर’, गुंजन वर्मा, ‘रॉकेट टिप्स’, ‘कुबेर कॅपिटल’, ‘शुअर शॉट फ्यूचर अ‍ॅडव्हायजरी सव्‍‌र्हिसेस’ आणि ‘क्रूड ऑइल टिप्सवाला’ यांच्यासह अशा अनेक सल्लागारांवर कारवाई करण्यात आली आहे.

सेबीचे पाऊल महत्त्वाचे का?

फिनफ्लुएन्सर असल्याचे दावे करत नोंदणी न करता गुंतवणूक सल्ला देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची पावले आता सेबीने उचलली आहेत. कारवाईत कुचराई केली जाणार नाही, असा संदेश सेबीने दिला आहे. गुंतवणूकदारांचे हित जपताना त्यांची दिशाभूल करणाऱ्या घटकांना वेळीच रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे सेबीने उचललेले हे पाऊल अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातून नवीन गुंतवणूकदारांची फसवणूक टाळेल आणि बाजारातील गुंतवणुकीची द्वारे त्यांच्यासाठी आश्वासकरीत्या खुली होतील.

sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader