AC Blast and Sbsequent Fire एसीला आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. तापमान वाढीमुळे घरोघरी एसी हा पर्याय निवडला जात आहे. परंतु, एसीमधील स्फोटाच्या घटनांनी लोकांची चिंताही वाढली आहे. एअर कंडिशनरच्या इनडोअर युनिटमध्ये स्फोट झाल्यानंतर गुरुवारी (३० मे) पहाटे नोएडा हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅटमध्ये आग लागली. गौतम बुद्ध नगरचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रदीप कुमार यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, निवासी, व्यवसाय आणि औद्योगिक इमारतींमध्ये गेल्या १० ते १२ दिवसांत अशीच प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अशा आगीच्या घटना कशा घडतात? याचे कारण काय? काय खबरदारी घ्यायला हवी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसीमध्ये स्फोट का होतो?

उन्हाळ्याच्या हंगामात भारतात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वाढत्या तापमानामुळे विद्युत उपकरणे सतत वापरली जातात, ज्यामुळे या विद्युत उपकरणांवर ताण येतो आणि उपकरणे अधिक गरम झाल्यामुळे आग लागते. आणखी एक प्रमुख कारण म्हणजे शॉर्ट सर्किटिंग किंवा जेव्हा सर्किटमधील विद्युत प्रवाह विरुद्ध दिशेने जातो. शॉर्ट सर्किटिंग झाल्यास नेहमीच धोकादायक परिस्थिती उद्भवत नाही, परंतु जेव्हा मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह असतो तेव्हा शॉर्ट सर्किट झाल्यास तारा वितळू शकतात आणि आग लागू शकते.

हेही वाचा : Exit Poll: ‘एक्झिट पोल’ म्हणजे काय? निकालाचा अंदाज कसा लावला जातो?

साधारणपणे, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मिनिएचर सर्किट ब्रेकर्स (एमसीबी) बसवले जातात. त्यामुळे उपकरणांवर अधिक ताण आल्यास सर्किटला सिग्नल मिळते. ‘श्नाइडर’ या इलेक्ट्रिक कंपनीच्या वेबसाइटनुसार, “मिनिएचर सर्किट ब्रेकर्समध्ये बीमेटलीक स्ट्रिप म्हणजेच दोन धातूंनी तयार झालेल्या पट्ट्या असतात. जर सर्किटमधून जास्त प्रमाणात विद्युतप्रवाह वाहत असेल, तर मिनिएचर सर्किट ब्रेकर्समधील बीमेटलीक स्ट्रिप गरम होतात आणि आपली जागा सोडतात. अशावेळी मिनिएचर सर्किट ब्रेकर्सवर दिलेले बटण बंद होते आणि सर्किट डिस्कनेक्ट करून विद्युत प्रवाह रोखते. त्यानंतर बटण चालू करून पुन्हा विजेचा प्रवाह सामान्यपणे सुरू केला जाऊ शकतो.”

बऱ्याचदा, मिनिएचर सर्किट ब्रेकर्समध्ये दोष असतो; ज्यामुळे ही यंत्रणा अपयशी ठरते, परिणामी आग लागते. दिल्ली सरकारच्या अग्निशमन सेवा विभागाचे म्हणणे आहे की, “सुमारे ६० टक्के आगीच्या घटना इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट, उपकरणांवर जास्त ताण आल्यास, ओव्हरलोडिंग, चांगल्या क्वालिटीची उपकरणे न वापरल्यामुळे घडतात.

कोणती खबरदारी घेतली जाऊ शकते?

स्प्लिट एसीच्या बाबतीत, आगीच्या संभाव्य धोक्यांसाठी आतील आणि बाहेरील दोन्ही युनिट्सकडे लक्ष देणे गरजेचे असते. सहसा, आतील युनिटमध्ये बाष्पीभवक (जे हवेतून उष्णता काढून टाकते), ब्लोअर आणि फिल्टर नेट्स असतात. बाहेरील युनिटमध्ये कॉम्प्रेसरचा समावेश असतो, जो घरामध्ये वाहणारी हवा थंड होण्यास मदत करतो. बाहेर सोडल्या जाणाऱ्या गरम हवेचे विघटन करण्यासाठी पंखा असतो.

काय करायचे आणि काय करू नये:

-एसीच्या एलजी मॅन्युअलमध्ये असे म्हटले आहे की, दोन्ही इनडोअर/आउटडोअर वायरिंग कनेक्शन सुरक्षित असले पाहिजे. वायर योग्यरित्या लावले गेले पाहिजे, जेणेकरून कनेक्शन टर्मिनल्समधून हे वायर ओढले जाऊ नये. कनेक्शन व्यवस्थित नसल्यास उष्णता निर्माण होऊ शकते किंवा आग लागू शकते.

-वापरकर्त्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की सर्किट ब्रेकर आणि फ्यूज चांगल्या स्थितीत आहेत.

-एसीच्या सेटअपमध्ये कोणतेही बदल किंवा अधिकृत दुरुस्ती ही सर्व्हिस सेंटरच्या मदतीनेच केली पाहिजे. एसीची सर्व्हिसिंग नियमित केली गेली पाहिजे.

-इनडोअर युनिट पाण्याच्या संपर्कात यायला येऊ नये, याची खबरदारी घेतली पाहिजे.

हेही वाचा : Potency Test for Prajwal Revanna: लैंगिक अत्याचार प्रकरणात का केली जाते पौरुषत्व चाचणी?

-कोणत्याही वस्तू बाहेरील युनिटच्या जवळ ठेवू नका. युनिटच्या आजूबाजूला पाने आणि इतर कचरा जमा करणे धोकादायक असू शकते. अशा कचर्‍यामुळे लहान प्राणीदेखील आकर्षित होऊ शकतात आणि युनिटमध्ये प्रवेश करू शकतात. हे प्राणी युनिटच्या आत गेल्यावर युनिटमध्ये बिघाड होऊ शकतो आणि जेव्हा त्यांचा संपर्क विजेच्या भागांशी होतो, तेव्हा धूर निघू शकतो किंवा आग लागू शकते.

-उपकरण सतत चालू ठेवू नका. मुख्य पॉवरची बटणं काम झाल्यास आवर्जून बंद ठेवा.

-कॉम्प्रेसरमध्ये रेफ्रिजरेंट गॅसच्या गळतीमुळेदेखील स्फोट होऊ शकतो. त्यामुळे गॅस गळती होत आहे का, हे सातत्याने तपासा.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire breaks out in ac precautions rac
Show comments