कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल हा माणसांसाठी कायमच उत्सुकतेचा आणि एक गूढ विषय राहिला आहे. अंतराळातील सर्वांत गूढ वस्तू म्हणजे ब्लॅक होल. आता एका नवीन अभ्यासात शास्त्रज्ञांनी प्रथमच अंतराळात ‘ब्लॅक होल ट्रिपल’ शोधले असल्याचे सांगितले आहे. या प्रणालीमध्ये मध्यभागी एक कृष्णविवर आहे. सध्या त्याच्या अगदी जवळ फिरत असलेला एक लहान तारा आहे. तसेच एका कृष्णविवराभोवती फिरणारा एक दुसरा तारादेखील आहे; मात्र तो प्रत्यक्षात तुलनेने लांब आहे. शास्त्रज्ञांच्या या शोधाचे महत्त्व काय? कृष्णविवर म्हणजे नक्की काय? ब्लॅक होल ट्रिपल नक्की काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पृथ्वीपासून सुमारे आठ हजार प्रकाशवर्षे दूर असलेल्या ब्लॅक होल ट्रिपलच्या शोधामुळे कृष्णविवर कसे तयार होते, याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. कृष्णविवर हा अंतराळातील एक असा प्रदेश आहे; ज्या क्षेत्रात गुरुत्वाकर्षण इतके तीव्र असते की, त्या कृष्णविवराभोवती एका ठरावीक अंतराच्या आत एखादी जरी वस्तू आली तरी ती अतिप्रचंड वेगाने त्याच्याकडे खेचली जाते. कृष्णविवर तयार होते तेव्हा त्याचे प्रचंड आकुंचन होते. प्रचंड वस्तुमान छोटय़ा आकारमानात सामावते. केवळ वस्तूच नाही तर प्रकाशही त्याकडे खेचला जातो.
हेही वाचा : ‘कोदो मिलेट’च्या सेवनाने तीन दिवसांत १० हत्तींचा मृत्यू; कारण काय? काय आहे कोदो मिलेट?
खगोलशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, कृष्णविवर म्हणजे मरण पावलेल्या ताऱ्याची एक अवस्था आहे. म्हणजे एका स्फोटानंतर कृष्णविवर तयार होते; ज्याला सुपरनोव्हा, असे म्हणतात. परंतु, ब्लॅक होल ट्रिपल एक सौम्य प्रक्रिया सूचित करते. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी ‘ब्लॅक होल लो-मास एक्स-रे बायनरी V404 सिग्नी इज अ पार्ट ऑफ वाईड ट्रिपल’ हा अभ्यास केला आणि गेल्या महिन्यात ‘नेचर’मध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला.
‘ब्लॅक होल ट्रिपल’ काय आहे?
आतापर्यंत शोधलेली अनेक कृष्णविवरे ही बायनरी सिस्टीमचा भाग आहेत; ज्यात कृष्णविवर आणि दुय्यम वस्तू (जसे की तारा किंवा दुसरे कृष्णविवर) यांचा समावेश होतो. परंतु ‘ब्लॅक होल ट्रिपल’मध्ये दर ६.५ दिवसांनी कृष्णविवराभोवती फिरणारा तारा आहे आणि त्याबरोबरच ७० हजार वर्षांनी त्याच्याभोवती फिरणारा दूरचा ताराही आहे. या प्रणालीमध्ये सर्वांत जुने ज्ञात कृष्णविवर आहे; ज्याचे नाव ‘V404 सिग्नी’ आहे. हे कृष्णविवर आपल्या सूर्यमालेतील सूर्यापेक्षा नऊ पट मोठे आहे. दुर्बिणीद्वारे घेतलेली खगोलशास्त्रीय निरीक्षणे पाहताना संशोधकांना अचानक दूरचा ताराही सापडला आहे. ‘एमआयटी’च्या भौतिकशास्त्र विभागातील संशोधन सहकारी व अभ्यास लेखकांपैकी एक केविन बर्ज यांनी ‘एमआयटी न्यूज’ला सांगितले, “हे ब्लॅक होल ट्रिपल निश्चितपणे योगायोग किंवा अपघात नाही. आम्ही दोन तारे पाहत आहोत, जे एकमेकांचा पाठलाग करीत आहेत. कारण- ते गुरुत्वाकर्षणाने जोडले गेले आहेत. त्यामुळे हे ब्लॅक होल ट्रिपल असावे असा अंदाज आहे,” असे त्यांचे सांगणे आहे.
हेही वाचा : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा सुगावा मुंबई पोलिसांना लागला; अनमोल बिश्नोई कोण?
डायरेक्ट कोलॅप्स प्रक्रिया काय आहे?
बर्ज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रस्तावित केले आहे की, ‘V404 सिग्नी’च्या सभोवताली दोन तारे आहेत. कारण- हे कृष्णविवर सुपर नोव्हामधून उद्भवलेले नाही. सुपर नोव्हा प्रक्रियेत स्फोट होतो; ज्यामुळे बाहेरील तारे अजून दुरावतात. हे कृष्णविवर ‘डायरेक्ट कोलॅप्स’ नावाच्या दुसऱ्या प्रक्रियेद्वारे तयार झाली आहे. या प्रक्रियेत तार्याचा स्फोट होत नाही. “आम्ही या घटनांना ‘फेल सुपर नोव्हा’ म्हणतो,” असे बर्ज यांनी सांगितले. परंतु, ‘ब्लॅक होल ट्रिपल’मध्ये कायमचे तीन घटक नसतील; परंतु असे असले तरी हे लक्षात येते की, आधी शोध लावण्यात आलेली बायनरी सिस्टीम ही कधीतरी ब्लॅक होल ट्रिपल सिस्टम असावी.