सीएनजीवरील वाहने ही पेट्रोल इंधन पर्यायापेक्षा परडवणारी ठरतात. आधी तीनचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये सीएनजी इंधन पर्याय उपलब्ध झाले. या वाहनांमुळे इंधन खर्च कमी होत असल्याने त्यांच्याकडे ग्राहकांचा ओढा वाढला. आता जगातील पहिली सीएनजी दुचाकी किंवा बाईक दाखल झाली आहे. यामुळे आगामी काळात पेट्रोलऐवजी सीएनजी दुचाकीकडे ग्राहक वळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नव्वदच्या दशकात लोकप्रिय असलेल्या स्कूटरकडून ग्राहक गीअर असलेल्या दुचाकीकडे वळला होता. त्या वेळी झालेल्या या बदलामुळे नंतर स्कूटर नामशेष झाल्या आहे. आता नव्वदच्या दशकाप्रमाणे सीएनजी पर्यायामुळे पेट्रोलवरील दुचाकी कालबाह्य ठरून मोठे स्थित्यंतर घडेल, असा दावा केला जात आहे.

दुचाकीची क्षमता किती आहे?

बजाज ऑटोने सीएनजीवरील फ्रीडम १२५ ही १२५ सीसी क्षमतेची सिंगल सिलिंडर इंजिन दुचाकी सादर केली आहे. ही दुचाकी तीन श्रेणींमध्ये सादर करण्यात आली आहे. ती सीएनजी सोबतच पेट्रोलवर धावू शकते. या दुचाकीमध्ये दोन किलो सीएनजी क्षमतेच्या टाकीसोबत दोन लिटर पेट्रोलची टाकीही आहे. सीएनजीवर प्रामुख्याने ही दुचाकी चालविणे अपेक्षित आहे. सीएनजी उपलब्ध न झाल्यास पर्याय म्हणून पेट्रोलची टाकी कंपनीने दिलेली आहे. केवळ सीएनजीवर दुचाकी चालविण्यापेक्षा अधूनमधून ती पेट्रोलवरही चालवावी, असे कंपनीचे म्हणणे आहे.

Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?

हे ही वाचा… विश्लेषण : पॅरिसमधील ‘अस्वच्छ’ सीन नदी ऑलिम्पिकसाठी कितपत सज्ज? गेल्या १०० वर्षांपासून वापरासाठी का बंदी होती?

इंधन पर्याय कसा निवडता येतो?

फ्रीडम दुचाकी सीएनजीवर चालू होते आणि ती सीएनजीवर धावू शकते. इंधन पर्याय बदलण्यासाठी दुचाकीच्या हँडलला एक स्वीच देण्यात आला आहे. या स्वीचचा वापर करून सीएनजी आणि पेट्रोल पर्याय निवडता येतो. या दुचाकीची टाकी २ किलो सीएनजी क्षमतेची असली तरी तिचे वजन १५ किलो आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव टाकी मजबूत करण्यासाठी तिचे वजन वाढविण्यात आले आहे. ही टाकी दुचाकीच्या आसनाचा काही भाग आणि इतर भाग दुचाकीच्या पेट्रोल टाकीच्या ठिकाणी आहे. तिच्याच शेजारी २ लिटर क्षमतेची पेट्रोलची टाकी देण्यात आली आहे.

इंधन बचत नेमकी किती?

बजाजने ही दुचाकी एक किलो सीएनजीवर १०२ किलोमीटर आणि एक लिटर पेट्रोलवर ६५ किलोमीटर धावू शकते, असा दावा केला आहे. म्हणजेच ही दुचाकी एकदा पूर्ण इंधन भरल्यानंतर एकूण ३३० किलोमीटरवर धावू शकेल. सीएनजीवर या दुचाकीचा इंधन खर्च प्रतिकिलोमीटर १ रुपयांहूनही कमी आहे. या दुचाकीमुळे दैनंदिन इंधन खर्चात ५० टक्के बचत होईल. यामुळे ५ वर्षांत दुचाकीमुळे सर्वसाधारणपणे ७५ हजार रुपयांची बचत होईल, असा कंपनीचा दावा आहे.

हे ही वाचा… वाघांच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात का होतात?

प्रदूषणात घट किती?

पेट्रोलवरील दुचाकीपेक्षा सीएनजीवरील दुचाकीमुळे प्रदूषणात मोठी घट होते. हरित वायू उत्सर्जन कमी होण्यास यामुळे मदत होते. सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकीमुळे कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन पेट्रोलवरील दुचाकीच्या तुलनेत २६.७ टक्के आहे. याच वेळी या दुचाकीमुळे नॉन-मिथेन हायड्रोकार्बन्सचे उत्सर्जन ८५ टक्के कमी आणि नायट्रोजन ऑक्साइडचे उत्सर्जन ४३ टक्के कमी होते.

कितपत सुरक्षित?

या दुचाकीमध्ये सीएनजी टाकी हा महत्त्वाचा घटक आहे. पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा संस्थेने (पीईएसओ) या टाकीवर शिक्कामोर्तब केले आहे. ही टाकी आसनाच्या खाली असून, उच्च दाब पडूनही ती सुरक्षित राहू शकते. या दुचाकीच्या सुरक्षा चाचण्यांमध्ये टाकीच्या सुरक्षिततेवर अधिक भर देण्यात आला. या दुचाकीच्या टाकीवरून मालमोटार गेली तरी ती फुटत नाही. याचबरोबर समोरून अथवा पाठीमागून जोरात धडक बसली तरी टाकीला गळती लागत नाही. तसेच, तिचे नुकसान होत नाही.

हे ही वाचा… पर्यटकांनो परत जा… बार्सिलोनाचे लोण इतर युरोपियन शहरांत? अतिपर्यटकांचा फटका? 

जीएसटी कमी होणार?

सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर ५ टक्के जीएसटी आकारला जातो. प्रदूषण न करणारी आणि पर्यावरणपूरक असल्याने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून ही सवलत दिली जाते. याच वेळी पेट्रोलसह सीएनजी दुचाकीवर २८ टक्के जीएसटी आकारला जातो. सीएनजी हा इंधन पर्याय पर्यावरणपूरक असल्याने त्यावर धावणाऱ्या दुचाकींवरील जीएसटी १२ टक्क्यांपर्यंत खाली आणावा, अशी मागणी केली जात आहे. बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी पर्यावरणपूरक वाहनांना अंशदान देण्याऐवजी त्यांच्यावरील कर कमी करावा, अशी भूमिका मांडली आहे. सरकारने या दुचाकीवरील कर कमी केल्यास आणि इतर कंपन्यांनी बजाजचे अनुकरण केल्यास आगामी काळात सीएनजी दुचाकीमुळे या क्षेत्रात अमूलाग्र बदल घडण्याची चिन्हे आहेत.

sanjay.jadhav@expressindia.com