अबुधाबीमधील BAPS हिंदू मंदिराच्या भव्य उद्घाटनाची वेळ आता जवळ आली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी युएईच्या दौऱ्यावर असून, १४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुधाबीमधील या प्रमुख मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. BAPS मंदिर हे संयुक्त अरब अमिराती (UAE)मधील राजधानीच्या अबू मुरेखाह शेजारील पहिले हिंदू मंदिर आहे. UAE मधील दुबईमध्ये आणखी तीन हिंदू मंदिरे आहेत. दगडी वास्तुकलेने तयार करण्यात आलेले BAPS मंदिर आखाती प्रदेशातील सर्वांत मोठे मंदिर ठरणार आहे.

अबुधाबीतील BAPS मंदिराबद्दल जाणून घ्या

२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या भेटीदरम्यान UAE ने अबुधाबीमध्ये मंदिर बांधण्यासाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला. ३४ वर्षांत इंदिरा गांधींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या महत्त्वाच्या आखाती देशाला भेट दिली. त्यामुळे पंतप्रधानांची भेट राजनैतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात होती. पंतप्रधानांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये मंदिर प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि डिसेंबर २०१९ मध्ये त्याचे बांधकाम सुरू झाले. मंदिराचा अभिषेक सोहळा १४ फेब्रुवारी २०२४ रोजी नियोजित आहे, जो पवित्र वसंत पंचमीच्या दिवशी आहे.

Science Technology Budget 2025 Nuclear Energy
विज्ञान तंत्रज्ञान: हवेतले इमले
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
an innovative container style aquarium Dubai Alibaug bhumi pujan
अलिबाग मध्ये दुबईच्या धर्तीवर मत्स्यालयाची उभारणी होणार, इनोव्हेटिव्ह कंटेनर पद्धतीच्या मत्स्यालयाची भारतात पहिल्यांदाच उभारणी
simhastha kumbh mela
साधुग्राम अतिरिक्त जागेसाठी मेरीच्या जागेचा विचार; गोदाकाठावर पाच नवीन पूल, सिंहस्थ कुंभमेळा बैठक
Chandrashekhar Bawankule , Chandrashekhar Bawankule Amravati ,
चंद्रशेखर बावनकुळे यांना सोनेरी मुकूट? चर्चेला उधाण…
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
mauni amavasya at mahakumbh
मौनी अमावस्या म्हणजे काय? महाकुंभात त्याचे महत्त्व काय?
mahacon 2025 news update
भारतीय वास्तुविशारद संस्थेच्या महाकॉन ला सुरुवात

मंदिराच्या बांधकाम अन् वास्तुकलेत काय विशेष?

अबुधाबीच्या वाळवंटातील वाळूमध्ये भव्यपणे निर्माण करण्यात आलेले BAPS हिंदू मंदिर सध्या अंतिम टप्प्यात आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, दुबई-अबू धाबी शेख झायेद महामार्गालगत अल रहबाजवळील अबू मुरेखाह येथे २७ एकर जागेवर पसरलेले हे मंदिर ७०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. हे मंदिर १०८ फूट उंच, २६२ फूट लांब आणि १८० फूट रुंद आहे. मंदिर परिसरात एक मोठे ॲम्फीथिएटर, प्रार्थना कक्ष, एक गॅलरी, एक ग्रंथालय, थिमॅटिक गार्डन्स, एक फूड कोर्ट, गिफ्ट शॉप, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, एक मजली इमारत आणि ५ हजार लोक सामावून घेऊ शकतील, असे दोन कम्युनिटी हॉल आहेत.

५० अंश सेल्सिअसपर्यंतच्या तीव्र तापमानातही टिकाऊपणा जपणाऱ्या या मंदिराच्या दगडांची निवड यूएईकडून करण्यात आली आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक धोरणाचा भाग म्हणून फाऊंडेशनच्या काँक्रिट मिक्समध्ये फ्लाय ॲशचा समावेश करण्यात आला. फायनान्शिअल एक्सप्रेसनुसार, व्यापक डिजिटल मॉडेलिंग आणि सिस्मीक सिम्युलेशन घेणारे हे पहिले पारंपरिक हिंदू मंदिर असल्याने हा प्रकल्प वेगळा आहे हे येथे नमूद करण्यात आले आहे. मंदिराच्या फाउंडेशनमध्ये १०० सेन्सर्स समाविष्ट आहेत, तर ३५० हून अधिक सेन्सर्स संपूर्ण संरचनेत धोरणात्मकरीत्या बसवलेले आहेत, जे सतत भूकंप हालचाली, तापमान चढउतार आणि वातावरणातील बदलांविषयी माहिती गोळा करीत आहेत.

२५ हजारांपेक्षा जास्त दगडांचे तुकडे वापरून संगमरवरी नक्षीकाम वाळूच्या दगडाच्या पार्श्वभूमीवर तयार केले गेले आहे. मंदिरात दोन घुमट, सात शिखर आहेत. मंदिराची रचना वैदिक वास्तुकला आणि शिल्पकलेतून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. पीटीआयनुसार, प्रत्येक शिखरावर रामायण, शिवपुराण, भागवत आणि महाभारतातील कथा तसेच भगवान जगन्नाथ, भगवान स्वामीनारायण, भगवान व्यंकटेश्वर आणि भगवान अयप्पा यांच्या कथांचे वर्णन करणारी कोरीवकामं आहेत.

चिकाटी, बांधिलकी आणि सहनशीलतेचे प्रतिनिधित्व करणारे उंटसुद्धा शिल्पांमध्ये कोरले गेले आहेत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पाच नैसर्गिक घटकांच्या सुसंवादाचे एक अद्वितीय चित्रण म्हणून “डोम ऑफ हार्मोनी” बनवण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम व्यवस्थापक मधुसूदन पटेल यांनी पीटीआयला सांगितले की, “आमचा बांधकामादरम्यानचा प्रवास नावीन्यपूर्ण आणि आव्हानांवर मात करणारा आहे.

संस्थेची स्थापना कोणी केली?

BAPS स्वामीनारायण हिंदू धार्मिक संस्थेची स्थापना ही १९ व्या शतकात स्वामीनारायण यांना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आली आहे. संस्थेचे मुख्यालय भारतातील अहमदाबाद येथे असून, जगभरात १००० हून अधिक मंदिरे आणि केंद्रे आहेत. BAPS स्वामीनारायण संस्था तिच्या मोफत शाळा आणि रुग्णालयांसह शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी ओळखली जाते. बोचासणवासी श्रीअक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था BAPS या संक्षिप्त नावाने ओळखली जाते. १७०० च्या दशकाच्या उत्तरार्धात धर्मगुरू भगवान स्वामीनारायण हे संस्थेच्या नावामागील प्रेरणास्थान आहेत.

हेही वाचाः बहुमत चाचणी म्हणजे काय? नितीश कुमारांना बहुमत चाचणी का द्यावी लागली?

BAPS वेबसाइटनुसार, हा एक सामाजिक आध्यात्मिक हिंदू धर्म आहे, ज्याची उत्पत्ती वेदांमध्ये झाली आहे, ज्याची स्थापना १९०७ मध्ये शास्त्रीजी महाराज (१८६५-१९५१) यांनी केली होती आणि १८व्या शतकाच्या उत्तरार्धात भगवान स्वामीनारायण (१७८१-१८३०) यांनी केल्याचं म्हटलं जातं. जागतिक स्तरावर ११०० मंदिरे आणि ३८५० युनिट्सचे व्यवस्थापन BAPS करते. BAPS गुजरात आणि दिल्लीतील अक्षरधाम मंदिरांचाही प्रभारी आहे. न्यूयॉर्क शहरातही या संस्थेच्या माध्यमातून अक्षरधाम मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. न्यूयॉर्क शहराच्या दक्षिणेस ९९ मैलांवर अक्षरधाम महामंदिर स्थित असून, न्यू जर्सीमध्ये १८५ एकर क्षेत्रात व्यापलेले आहे आणि १९१ फूट उंचीवर आहे. मंदिर बांधण्यासाठी १.९ दशलक्ष घनफूट दगड वापरण्यात आला आणि जगभरातील २९ हून अधिक विविध ठिकाणांहून त्याची वाहतूक करण्यात आली, ज्यात बल्गेरिया, इटली, ग्रीस, तुर्की आणि भारत यांचा समावेश आहे.

हेही वाचाः विश्लेषण : राष्ट्रीय लोक दलाच्या ‘इंडिया आघाडी’तून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा ‘एनडीए’ आणि ‘यूपीए’वर कसा परिणाम होईल?

दुबईमधील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट २०२४ मध्ये मोदी सहभागी होणार

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. दोन्ही नेते देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल, विस्तारित आणि मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा करतील आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. दुबई येथे होणाऱ्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट २०२४ मध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून पंतप्रधान सहभागी होतील आणि विशेष मुख्य भाषण देतील.


Story img Loader