इच्छामरणासाठी स्वित्झर्लंडमध्ये सुसाईड पॉड तयार करण्यात आले आहेत. स्वेच्छेने जीवन संपवणार्‍यांना स्वित्झर्लंडमध्ये असिस्टेड सुसाईड म्हटले जाते. सुसाईड पॉडचा वापर २३ सप्टेंबर रोजी एका ६४ वर्षीय महिलेने केला आणि आपले जीवन संपवले. या घटनेनंतर अनेकांना अटकही करण्यात आली. आता महिलेच्या गळ्यावर गळा दाबल्याच्या खुणा आढळून आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ही आत्महत्याच होती की हत्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेमके हे प्रकरण काय? ही खरंच आत्महत्या आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.

नक्की काय घडलं?

सार्को पॉडमध्ये अगदी काही मिनिटांत वेदनारहित मृत्यू होतो. 3D-प्रिंट केलेले शवपेटीसारख्या या कॅप्सूलमध्ये नायट्रोजन असते आणि एकदा आतून बटण दाबल्यास हे मशीन सक्रिय झाल्यानंतर ऑक्सिजनची पातळी वेगाने कमी होते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे व्यक्ती आपली चेतना गमावते आणि १० मिनिटात त्याचा मृत्यू होतो. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, जर्मन सीमेजवळील शॅफहॉसेन प्रदेशात असलेल्या मेरिशॉसेनमधील फॉरेस्ट केबिनजवळ उभारलेल्या कॅप्सूलमध्ये महिलेचा मृत्यू झाला. राईट-टू-डाय ॲक्टिव्हिझममधील अग्रगण्य जागतिक व्यक्ती डॉ. फिलिप नित्शके यांनी शोधलेल्या पॉडमध्ये नायट्रोजन वायूचे इंजेक्शन देणारे बटण दाबल्यानंतर घातक हायपोक्सियामुळे महिलेचा मृत्यू झाला. नेदरलँड्समधील सहाय्यक आत्महत्या गट ‘एक्झिट इंटरनॅशनल’ने नमूद केले की, हे मशीन विकसित करण्यासाठी एक दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च आला आहे.

woman tries suicide on railway station man helped her viral video on social media
माणुसकीला सलाम! तिचा जीव वाचवण्यासाठी त्यानं स्वत:चा जीव धोक्यात टाकला; पुढच्याच क्षणी ट्रेन आली अन…थरारक VIDEO
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Gujarat diamond factory manager dies during rape bid of 14-yr-old girl
Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना ४१ वर्षीय माणसाचा मुंबईत मृत्यू, पीडितेला करत होता ब्लॅकमेल
Mithun Chakraborty first wife Helena Luke passed away
मिथुन चक्रवर्तींच्या पहिल्या पत्नीचं निधन, शेवटची पोस्ट व्हायरल, हेलेना यांनी बिग बींबरोबर केलेला ‘हा’ चित्रपट
Two Suspended in Hospital After video Shows Pregnant Woman Cleans Husband Bed After his Death
Woman Cleaning Husband Bed : धक्कादायक! पतीचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने गरोदर पत्नीला स्वच्छ करायला लावले रक्ताचे डाग, कुठे घडली घटना?
Kanpur Crime News
Kanpur : धक्कादायक! महिलेची हत्या करून मृतदेह ‘व्हिआयपी’ परिसरात पुरला; चार महिन्यांनी ‘असं’ उलगडलं घटनेचं रहस्य
Yogi Adityanath Death Threat
Yogi Adityanath Death Threat: ‘योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या २४ वर्षीय तरुणीला ठाण्यातून अटक
Indian fashion designer rohit bal passed away
प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचे निधन, बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक

हेही वाचा : सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?

‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, पॉड चालवणारी कंपनी द लास्ट रिसॉर्टचे अध्यक्ष फ्लोरियन विलेट आणि आपले जीवन संपवू इच्छिणाऱ्या महिलेने एकमेकांशी संपर्क साधला. दोन प्रौढ मुलांची आई असलेली ही महिला दोन वर्षांपासून सहाय्यक आत्महत्येचा विचार करत होती. बेस ऑस्टियोमायलिटिस या आजाराचे निदान झालेल्या महिलेने मृत्यूपूर्वी सांगितले, “हा माझा निर्णय आहे, माझी मुले यावर पूर्णपणे सहमत आहेत आणि ती शंभर टक्के माझ्या मागे आहेत.” पॉडमध्ये गेल्यावर बटण दाबल्यानंतर अर्ध्या तासांत महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

सार्को पॉडमध्ये अगदी काही मिनिटांत वेदनारहित मृत्यू होतो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

एक्झिट इंटरनॅशनलने एका निवेदनात म्हटले आहे की, जर्मन सीमेजवळ सार्को डिव्हाइस वापरून तिचा मृत्यू झाला. एक्झिट इंटरनॅशनलच्या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, स्विस संलग्न द लास्ट रिसॉर्टचे सह-अध्यक्ष विलेट, ही एकमेव व्यक्ती होती; ज्यांनी महिलेच्या मृत्यूचे वर्णन शांततापूर्ण आणि सन्माननीय असे केले. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर विलेटसह अनेकांना अटक करण्यात आली. एका लॉ फर्मने शाफहौसेन कॅन्टनमधील सरकारी वकिलांना कळवले की, सारकोचा समावेश असलेली आत्महत्या मेरीशौसेन येथील फॉरेस्ट केबिनजवळ घडली होती. पोलिसांनी सांगितलं की, फिर्यादींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून तपास सुरू केला आहे.

गळा दाबून हत्या?

मात्र, आता या वादाला एक नवे वळण आले आहे. स्विस वृत्तपत्र ‘Neue Zürcher Zeitung’ आणि डच वृत्तपत्र ‘डी वोल्क्सक्राँट’च्या वृत्तात असे नमूद करण्यात आले आहे की, शवविच्छेदनात महिलेच्या मानेवर गळा दाबण्याच्या खुणा आढळून आल्या. ‘न्यूजवीक’ने वृत्त दिले की, शाफहॉसेनमधील सरकारी वकील पीटर स्टिचर यांनी हत्येची शक्यता वर्तवली असून या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढवली आहे. डी वोल्क्सक्रांट यांनी कागदपत्रांचादेखील उल्लेख केला. २३ सप्टेंबरच्या फोन नोटवर आधारित संभाषणात फिर्यादीने फॉरेन्सिक डॉक्टरांकडून ऐकले की, महिलेच्या मानेला इतर गोष्टींबरोबरच गंभीर जखमा झाल्या आहेत, असे ‘डच वृत्तपत्रा’मध्ये नोंदवण्यात आले आहे. परंतु, ‘द टाईम्स’ने वृत्त दिले आहे की, फिर्यादीने वृत्तांची पुष्टी करण्यास नकार दिला आहे. स्विस वृत्तपत्र ‘Neue Zürcher Zeitung’ने द लास्ट रिसॉर्टच्या जवळच्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारावर म्हटले की, मानेवरील खुणा महिलेला असणार्‍या बेस ऑस्टियोमायलिटिस या आजारामुळे झाल्या असतील. ‘द लास्ट रिसॉर्ट’ने हत्येचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

ऑस्ट्रेलियन वंशाचे प्रशिक्षित डॉक्टर नित्शके यांनी पूर्वी सांगितले होते की, त्यांच्या संस्थेला स्वित्झर्लंडमधील वकिलांकडून सांगण्यात आले होते की, सार्कोचा वापर देशात कायदेशीर असेल. एक्झिट इंटरनॅशनल स्टेटमेंटमध्ये नित्शके म्हणाले की, सार्कोला जसे डिझाइन केले होते, त्याच पद्धतीची कामगिरी या मशीनने केली. मरणाच्या प्रक्रियेत होणार्‍या वेदना आणि अस्वस्थता दूर करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे आणि ते पूर्ण झाल्याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : विमान कंपन्यांना १०० हून अधिक धमक्या पाठविणारा जगदीश उईके कोण?

“संपूर्ण शवविच्छेदन अहवालाशिवाय पहिल्या सार्को वापरकर्त्याच्या मानेवर जखम असल्याच्या संशयावर टिप्पणी करू शकत नाही,” असे ‘द लास्ट रिसॉर्ट’ संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे. “शाफहौसेन फिर्यादीने २३ सप्टेंबर २०२४ रोजी शवविच्छेदन केल्याचे गत मीडियामध्ये नोंदवले आहे. पाच आठवड्यांनंतरही, शवविच्छेदन अहवाल ‘द लास्ट रिसॉर्ट’ आणि एक्झिट इंटरनॅशनलच्या वकिलांपासून आणि संबंधित व्यक्तींपासून लपवून ठेवण्यात आला.” द लास्ट रिसॉर्ट आणि एक्झिट इंटरनॅशनल असे सांगतात की, सार्कोने नियोजितप्रमाणे काम केले आणि वापरकर्त्याचा नायट्रोजन हायपोक्सियामुळे शांततेत मृत्यू झाला. हेतुपुरस्सर हत्येचे आरोप हास्यास्पद आहेत. द लास्ट रिसॉर्ट आणि एक्झिट इंटरनॅशनल हे आरोप ठामपणे फेटाळून लावतात, असेही ते म्हणाले.