इच्छामरणासाठी स्वित्झर्लंडमध्ये सुसाईड पॉड तयार करण्यात आले आहेत. स्वेच्छेने जीवन संपवणार्यांना स्वित्झर्लंडमध्ये असिस्टेड सुसाईड म्हटले जाते. सुसाईड पॉडचा वापर पहिल्यांदा २३ सप्टेंबर रोजी एका ६४ वर्षीय महिलेने केला आणि आपले जीवन संपवले. या घटनेनंतर अनेकांना अटकही करण्यात आली. आता महिलेच्या मानेवर गळा दाबल्याच्या खुणा आढळून आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ही आत्महत्याच होती की हत्या, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेमके हे प्रकरण काय? ही खरंच आत्महत्या आहे का? त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नक्की काय घडलं?
सुसाईड पॉड म्हणजेच सार्को पॉडमध्ये अगदी काही मिनिटांत वेदनारहित मृत्यू होतो. 3D-प्रिंट केलेल्या शवपेटीसारख्या या कॅप्सूलमध्ये नायट्रोजन असते आणि एकदा आतून बटण दाबल्यास हे मशीन सक्रिय झाल्यानंतर नायट्रोजन वायू सोडल्या जातो आणि ऑक्सिजनची पातळी वेगाने कमी होते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे व्यक्ती आपली चेतना गमावते आणि त्याचा मृत्यू होतो. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, जर्मन सीमेजवळील शॅफहॉसेन प्रदेशात असलेल्या मेरिशॉसेनमधील फॉरेस्ट केबिनजवळ उभारलेल्या कॅप्सूलमध्ये महिलेचा मृत्यू झाला. राईट-टू-डाय ॲक्टिव्हिझममधील अग्रगण्य असलेले डॉ. फिलिप नित्शके यांनी शोधलेल्या पॉडमध्ये नायट्रोजन वायूचे इंजेक्शन देणारे बटण दाबल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला. नेदरलँड्समधील सहाय्यक आत्महत्या गट ‘एक्झिट इंटरनॅशनल’ने नमूद केले की, हे मशीन विकसित करण्यासाठी एक दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च आला आहे.
हेही वाचा : सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, पॉड चालवणारी कंपनी द लास्ट रिसॉर्टचे अध्यक्ष फ्लोरियन विलेट आणि आपले जीवन संपवू इच्छिणाऱ्या महिलेने एकमेकांशी संपर्क साधला. दोन प्रौढ मुलांची आई असलेली ही महिला दोन वर्षांपासून सहाय्यक आत्महत्येचा विचार करत होती. बेस ऑस्टियोमायलिटिस या आजाराचे निदान झालेल्या या महिलेने मृत्यूपूर्वी सांगितले, “हा माझा निर्णय आहे, माझी मुले यावर पूर्णपणे सहमत आहेत आणि ती शंभर टक्के माझ्या मागे आहेत.” पॉडमध्ये गेल्यावर बटण दाबल्यानंतर अर्ध्या तासांत महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
एक्झिट इंटरनॅशनलने एका निवेदनात म्हटले आहे की, जर्मन सीमेजवळ सार्को डिव्हाइस वापरून तिचा मृत्यू झाला. एक्झिट इंटरनॅशनलच्या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, स्विस संलग्न द लास्ट रिसॉर्टचे सह-अध्यक्ष विलेट, ही एकमेव व्यक्ती होती; ज्यांनी महिलेच्या मृत्यूचे वर्णन शांततापूर्ण आणि सन्माननीय असे केले. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर विलेटसह अनेकांना अटक करण्यात आली. एका लॉ फर्मने शाफहौसेन कॅन्टनमधील सरकारी वकिलांना कळवले की, सार्कोचा समावेश असलेली महिलेची आत्महत्या मेरीशौसेन येथील फॉरेस्ट केबिनजवळ घडली. पोलिसांनी सांगितलं की, फिर्यादींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त केला असून तपास सुरू केला आहे.
गळा दाबून हत्या?
आता या वादाला एक नवे वळण आले आहे. स्विस वृत्तपत्र ‘Neue Zürcher Zeitung’ आणि डच वृत्तपत्र ‘डी वोल्क्सक्राँट’च्या वृत्तात असे नमूद करण्यात आले आहे की, शवविच्छेदनात महिलेच्या मानेवर गळा दाबण्याच्या खुणा आढळून आल्या. ‘न्यूजवीक’ने वृत्त दिले की, शाफहॉसेनमधील सरकारी वकील पीटर स्टिचर यांनी हत्येची शक्यता वर्तवली असून या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढवली आहे. डी वोल्क्सक्रांट यांनी कागदपत्रांचादेखील उल्लेख केला. २३ सप्टेंबरच्या फोन नोटवर आधारित संभाषणात फिर्यादीने फॉरेन्सिक डॉक्टरांकडून ऐकले की, महिलेच्या मानेला इतर गोष्टींबरोबरच गंभीर जखमा झाल्या आहेत, असे ‘डच वृत्तपत्रा’मध्ये नोंदवण्यात आले आहे. परंतु, ‘द टाईम्स’ने वृत्त दिले आहे की, फिर्यादीने वृत्तांची पुष्टी करण्यास नकार दिला आहे. स्विस वृत्तपत्र ‘Neue Zürcher Zeitung’ने द लास्ट रिसॉर्टच्या जवळच्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारावर म्हटले की, मानेवरील खुणा महिलेला असणार्या बेस ऑस्टियोमायलिटिस या आजारामुळे झाल्या असतील. ‘द लास्ट रिसॉर्ट’ने हत्येचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
ऑस्ट्रेलियन वंशाचे प्रशिक्षित डॉक्टर नित्शके यांनी पूर्वी सांगितले होते की, त्यांच्या संस्थेला स्वित्झर्लंडमधील वकिलांकडून सांगण्यात आले होते की, सार्कोचा वापर देशात कायदेशीर असेल. एक्झिट इंटरनॅशनल स्टेटमेंटमध्ये नित्शके म्हणाले की, सार्कोला जसे डिझाइन केले होते, त्याच पद्धतीची कामगिरी या मशीनने केली. मरणाच्या प्रक्रियेत होणार्या वेदना आणि अस्वस्थता दूर करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे आणि ते पूर्ण झाल्याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : विमान कंपन्यांना १०० हून अधिक धमक्या पाठविणारा जगदीश उईके कोण?
“संपूर्ण शवविच्छेदन अहवालाशिवाय पहिल्या सार्को वापरकर्त्याच्या मानेवर जखम असल्याच्या संशयावर टिप्पणी करू शकत नाही,” असे ‘द लास्ट रिसॉर्ट’ संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे. “शाफहौसेन फिर्यादीने २३ सप्टेंबर २०२४ रोजी शवविच्छेदन केल्याचे गत मीडियामध्ये नोंदवले आहे. पाच आठवड्यांनंतरही, शवविच्छेदन अहवाल ‘द लास्ट रिसॉर्ट’ आणि एक्झिट इंटरनॅशनलच्या वकिलांपासून आणि संबंधित व्यक्तींपासून लपवून ठेवण्यात आला.” द लास्ट रिसॉर्ट आणि एक्झिट इंटरनॅशनल असे सांगतात की, सार्कोने नियोजितप्रमाणे काम केले आणि वापरकर्त्याचा नायट्रोजन हायपोक्सियामुळे शांततेत मृत्यू झाला. हेतुपुरस्सर हत्येचे आरोप हास्यास्पद आहेत. द लास्ट रिसॉर्ट आणि एक्झिट इंटरनॅशनल हे आरोप ठामपणे फेटाळून लावतात, असेही ते म्हणाले.