संजय जाधव

अमेरिकेतील बुडणाऱ्या मोठ्या बँकांमध्ये आणखी एका बँकेची भर पडली आहे. ही बँक आहे फर्स्ट रिपब्लिक बँक. या बँकेसमोरील संकट मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू झाले. अचानक बँकेचे श्रीमंत ग्राहक ठेवी काढून घेऊ लागले अन् बँक अडचणीत सापडली. बँक बुडताच नियामकांनी पुढाकार घेऊन ती ताब्यात घेतली. आता ही बँक जेपीमॉर्गन अँड चेसने विकत घेतली आहे. बँकेतून पहिल्या तिमाहीत तब्बल १०० अब्ज डॉलरच्या ठेवी काढून घेण्यात आल्या. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या दोन बँकानंतर तिसरी मोठी बँक बुडाली असून, केवळ दोन महिन्यांत हे घडले आहे. ही बँक बुडण्यामागील नेमकी कारणे काय आणि हे संकट वाढणार का?

government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार

फर्स्ट रिपब्लिक बँकेची सुरुवात कशी झाली?

ओहायोतील जेम्स हर्बर्टने १९८५ मध्ये ही बँक स्थापन केली. मोठी कर्जे कमी व्याजदराने देण्यास बँकेने सुरुवात केली. नंतर २००७मध्ये ही बँक मेरिल लिंचने ताब्यात घेतली. मेरिल लिंचची मालकी नंतर बँक ऑफ अमेरिकाकडे गेली. त्यामुळे फर्स्ट रिपब्लिक बँकेचीही २०१० मध्ये विक्री झाली. त्यानंतर ही बँक भांडवली बाजारात सूचिबद्ध झाली. या बँकेची व्यावसायिक पद्धती गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी होती. अतिश्रीमंतांना तारण अथवा कर्जासाठी कमी व्याजदर बँकेकडून आकारले जात होते. बँकेच्या ग्राहक वर्गात इन्स्टाकार्टचे संस्थापक अपूर्व मेहता, गुंतवणूकदार चमथ पालिहापिटिया आणि विकासक स्टीफन एम. रॉस यांचा समावेश होता. बँकेने स्वत:च या नावांचा उल्लेख केला होता. याचबरोबर शाळा आणि विनानफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थांना बँकेने एकूण व्यावसायिक कर्जापैकी २२ टक्के कर्ज दिले होते.

विश्लेषण : हॉलीवूडचे लेखक संपावर का गेले?

बँकेच्या संकटाची सुरुवात कोठून?

फर्स्ट रिपब्लिक बँकेने जानेवारी महिन्यात दिलेल्या माहितीनुसार, भागधारकांना बँकेने वार्षिक १९.५ टक्के परतावा दिला. हा परतावा प्रतिस्पर्धी बँकांपेक्षा दुप्पट होता. परंतु, बँकेतील विमासंरक्षण असलेल्या ठेवींची संख्या इतर बँकांपेक्षा कमी होती. अमेरिकेत एका बचत खात्यातील अडीच लाख डॉलरच्या ठेवींवर सरकारी विमा संरक्षण असते. फर्स्ट रिपब्लिक बँकेतील विमा संरक्षण नसलेल्या ठेवींचे प्रमाण खूप मोठे होते. यातच अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ सुरू केली. यामुळे बँकेची कर्जे आणि गुंतवणुकीचे मूल्य आपोआप कमी झाले. तेथूनच बँकेच्या संकटाची सुरुवात झाली.

व्याजदर वाढीच्या चक्राचा नेमका परिणाम काय?

फेडकडून मागील वर्षी महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदरात वाढ सुरू होताच बँकेने तोटा दाखवण्यास सुरुवात केली. बँकेचे गुंतवणूकदार पैसे काढून दुसरीकडे गुंतवू लागले. यामुळे बँकेला मागील वर्षी डिसेंबरअखेर ४.८ अब्ज डॉलरचा एकूण तोटा झाला. त्यात मुदत पूर्ण झालेली गुंतवणूक आणि सरकारी रोख्यांमध्ये झालेल्या तोट्याचा प्रामुख्याने समावेश होता. त्याआधीच्या वर्षात बँकेला केवळ ५.३ कोटी डॉलरचा तोटा झाला होता. बँकेचा तोटा वाढत जाऊन यंदा मार्चअखेर तो ९.४ ते १३.५ अब्ज डॉलरदरम्यान पोहोचला. हा गुंतवणूकदार आणि विश्लेषकांनी मांडलेला अंदाज होता. फेडच्या व्याजदर वाढीच्या चक्रानंतर सुरू झालेली घसरण बँकेला रोखता आली नसल्याचे यातून समोर आले.

माऊंट एव्हरेस्टवर रात्री येतो गूढ आवाज, नेमके कारण काय? शास्त्रज्ञांनी लावला शोध; जाणून घ्या…

जेपीमॉर्गनकडे ताबा गेल्याने काय होणार?

अमेरिकेतील नियामकांच्या पुढाकाराने जेपीमॉर्गन अँड चेसने फर्स्ट रिपब्लिक बँकेचा ताबा घेतला आहे. अमेरिकेतील आठ राज्यांत असलेल्या बँकेची ८४ कार्यालये आता जेपीमॉर्गन चेस बँकेची शाखा म्हणून पुन्हा उघडली जातील. त्यामुळे फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या ग्राहकांना जेपीमॉर्गनची सेवा मिळेल. याचबरोबर आधीच मोठी असलेली जेपीमॉर्गन ही बँक आणखी मोठी झाली आहे. या व्यवहारांतर्गत जेपीमॉर्गन चेसकडून अमेरिकेतील फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनला १०.६ अब्ज डॉलर दिले जाणार आहेत. याचबरोबर फर्स्ट रिपब्लिकचा तोटा विभागून घेण्याबाबत जेपीमॉर्गन आणि फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन यांच्यात करार झाला आहे. जेपीमॉर्गनने फर्स्ट रिपब्लिकची एककुटुंब, गृह आणि व्यावसायिक कर्जे विकत घेतली असली तरी कंपनी कर्जे विकत घेतलेली नाहीत.

फर्स्ट रिपब्लिक बँकेनंतर कोण?

अमेरिकेत दोन महिन्यांत तीन बँका बुडाल्या आहेत. या निमित्ताने तिन्ही बँकांच्या व्यवसाय पद्धतीमध्ये असलेले साम्य समोर आले आहे. या बँकांच्या बुडण्यामुळे अमेरिकेतील अनेक मध्यम आकाराच्या बँकांवर दबाव येत आहेत. त्यांचे ठेवीदार पैसे काढून घेत आहेत आणि या बँकांना फेडकडून कर्जाऊ पैसे घ्यावे लागत आहेत. एवढ्यावरच हा परिणाम मर्यादित न राहता मध्यम आकाराच्या बँकांच्या समभागात भांडवली बाजारात घसरण सुरू आहे. यामुळे बँकिंग संकट अजूनही बिकट होत असल्याचे चित्र आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader