टेस्ला, स्पेसेक्स आणि आता एक्स (ट्विटर)चा अब्जाधीश मालक इलॉन मस्क यास आता नवा नाद लागल्याचे चित्र आहे. अमेरिकेमध्ये ट्रम्प यांना सक्रिय पाठिंबा देऊन निवडून आणल्यानंतर आता अन्य देशांमधील अतिउजव्यांची भलामण मस्कने सुरू केली आहे. त्यासाठी आपल्या ‘एक्स’ समाजमाध्यमाचा तो पुरेपूर वापर करून घेत आहेत. तो केवळ एक अमेरिकन उद्योगपती नाही, तर लवकरच अमेरिकेच्या भावी प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचा मंत्री असणार आहे. त्यामुळे त्याच्या या टोकाच्या भूमिकांमुळे भविष्यात अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धोरणांबाबत अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे…

ब्रिटनमध्ये पुन्हा निवडणुका घेण्याचा ‘सल्ला’

ब्रिटनमध्ये गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर पंतप्रधान झालेले मजूर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांच्याविरोधात मस्क याने ‘एक्स’वर एकापाठोपाठ एक २३ संदेश टाकले. मँचेस्टरमधील टोळ्यांचा बंदोबस्त करण्यात स्टार्मर यांच्या आदेशाने दिरंगाई होत असल्याचा त्याचा आरोप आहे. २००८ ते २०१३ या काळात सरकारी वकील असताना असताना स्टार्मर यांनी बलात्काराच्या आरोपींवर योग्य कारवाई केली नव्हती. महिला सुरक्षा खात्याच्या मंत्री जेस फिलिप्स या स्टार्मर यांच्या आदेशामुळेच टोळ्यांवर कारवाई करत नसल्याचे मस्कचे म्हणणे आहे. एवढ्यावरच न थांबता त्याने ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनी पार्लमेंट बरखास्त करावी आणि पुन्हा निवडणूका घ्याव्यात, असा सल्लाही देऊन टाकला आहे. काहीसे डावीकडे झुकलेल्या मजूर पक्षाचे सरकार मस्क याच्या डोळ्यात खुपत असल्याचे उघड आहे. आठवडाभरात आंतरराष्ट्रीय राजकारणात तोंड खुपसण्याची त्याची आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे.

wakahan corridor afghanistan
अफगाणिस्तानच्या ‘चिकन नेक’वर पाकिस्तानचा ताबा? काय आहे वाखान कॉरिडॉर?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
India redflags Chinas 2 new counties
चीनच्या कुरापती सुरूच; लडाखमधील भाग गिळंकृत करण्याचा प्रयत्न, नेमके प्रकरण काय?
Loksatta explained Why insist on the post of Guardian Minister of a specific district
विश्लेषण : पालकमंत्रीपदासाठी एवढा अट्टहास का ?
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
indictable case filed against Manoj Jarange Patil over statement on Minister Dhananjay Mundes
धनंजय मुंडेंवरील विधानावरून मनोज जरांगेंविरुद्ध परळीत अदखलपात्र गुन्हा, बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने
oyo unmarried couples rules
OYO रुमध्ये आता अविवाहित जोडप्यांना ‘नो एंट्री’; नव्या वर्षात नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या

हेही वाचा >>> वाखान कॉरिडॉर काय आहे? पाकिस्तानला त्यावर ताबा का मिळवायचा आहे?

जर्मनीत अतिउजव्यांना जाहीर पाठिंबा

चान्सेलर ओलाफ शोल्झ यांचे सरकार अल्पमतात आल्यामुळे जर्मनीत पुढल्या महिन्यात मध्यावधी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. अशा वेळी मस्क याने आपला मोर्चा युरोपातील सर्वांत मोठी आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या या देशाकडे वळविला आहे. अलिकडे त्याने शोल्झ यांच्यावर टोकाची टीका केली. शोल्झ हे मध्यममार्गी डावी विचारसणी असलेल्या सोशल डेमोक्रेटिक पार्टीचे (एसपीडी) नेते आहेत. त्यापुढे एक पाऊल टाकत नॅशनलिस्ट अल्टर्नेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या पक्षाला त्याने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यासाठी एका जर्मन वृत्तपत्रात विशेष लेख लिहिलाच, पण ९ जानेवारीला तो एएफडीचे नेते ॲलिस विडेल यांची ‘एक्स’वर मुलाखतही घेणार आहे. मस्कच्या या आक्रमक हस्तक्षेपामुळे जर्मनीतील मध्यममार्गी नेते अस्वस्थ झाले नाहीत, तरच नवल. ‘मला माझ्यावर केलेल्या टीकेचे काही वाटत नाही, मात्र मस्क यांनी एएफडीला जाहीर पाठिंबा देणे ही चिंतेची बाब आहे,’ ही शोल्झ यांची यावरील प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे मस्क आपल्या मालकीच्या ‘एक्स’चा या प्रचारासाठी गैरवापर करत आहे.

हेही वाचा >>> चीनच्या कुरापती सुरूच; लडाखमधील भाग गिळंकृत करण्याचा प्रयत्न, नेमके प्रकरण काय?

मालकाकडूनच ‘एक्स’चा राजकीय दुरुपयोग

इलॉन मस्कने ‘ट्विटर’ विकत घेतल्यानंतर आणि त्याचे नामांतर ‘एक्स’ केल्यानंतर या नाममुद्रेचे मूल्यांकन (ब्रँड व्हॅल्यू) ८० टक्क्यांनी घसरले. मात्र जगभरातील अतिउजव्या विचारसरणीच्या नेत्यांना अपप्रचार करण्यासाठी हे जणू नंदनवनच मिळाले आहे. अमेरिकेमध्ये प्रचार ऐन रंगात असताना स्वत: मस्क याने अनेक चुकीचे संदेश टाकून जनतेची दिशाभूल केली. आताही एखाद्या अतिउजव्याने भडक पोस्ट केली की मस्क त्याला ‘रिट्विट’ करतो किंवा त्यावर ‘इमोजी’ टाकतो. धक्कादायक म्हणजे मस्कने ‘एक्स’चा अल्गोरिदम अशा प्रकारे केला आहे की त्याचा कोणताही संदेश हा त्याच्या २१० अब्ज फॉलोअर्सना सर्वांत वरती दिसतो. ‘एक्स’ हेच आता खऱ्या अर्थाने प्रसारमाध्यम आहे, अशी बतावणीही त्याने अलिकडे केली होती. जगभरात अतिउजव्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वत: मालकानेच असा मुक्तहस्त दिल्याचे दुष्परिणाम आगामी काळात दिसतील, असे मानले जात आहे. मात्र त्यापेक्षा धोकादायक आहे ते अमेरिकेच्या प्रशासनात मस्क याच्यासाठी मांडले गेलेले मानाचे पान…

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धोरणांवर परिणाम?

युक्रेन युद्धाला पुतिन नव्हे, तर अमेरिका आणि बायडेनच अधिक जबाबदार आहेत, असा सनसनाटी आरोप महिनाभरापूर्वी मस्कने ‘एक्स’वरील एका दृकश्राव्य संदेशांमधून केला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, ‘नेटो’च्या आक्रमक विस्तार धोरणांमुळेच युक्रेनवर हल्ला करणे पुतिन यांना भाग पडले. हाच मस्क अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘उजवा हात’ बनला आहे. ‘ट्विटर’वर एक विनोद म्हणून सुरू झालेले ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ (डॉज) हे मंत्रालय आता खरोखरच अस्तित्वात येणार असून विवेक रामस्वामी यांच्यासह मस्क या खात्याचे सारथ्य करणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या प्रशासनावर त्याचा संपूर्ण वचक असेल. त्याच वेळी ट्रम्प स्वत:च मस्क याच्या सल्ल्याने चालतील, अशी भीती आतापासूनच व्यक्त होत आहे. त्यामुळे आगामी काळात अमेरिकेची आंतरराष्ट्रीय धोरणे ही देशादेशांतील अतिउजव्यांना धार्जिणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. amol.paranjpe@expressindia.com

Story img Loader