जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातील शास्त्रज्ञ, तापमानवाढ रोखण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून मागील अनेक दशकांपासून चिंता व्यक्त केली जाते. मात्र इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने (आयईए) प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल ट्रॅक रिपोर्टमुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. या रिपोर्टमध्ये जीवाश्म इंधनानिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी २०२२ या एका वर्षात तब्बल १२० अब्ज मेट्रिक टन मिथेनचे उत्सर्जन केले असे सांगण्यात आले आहे. तसेच या कंपन्यांकडून मिथेन वायूची गळती, उत्सर्जन रोखण्यासाठीच्या प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले नसल्याचे म्हटले आहे. आयईएच्या या रिपोर्टमुळे मिथेन वायूमुळे होणाऱ्या तापमानवाढीच्या मुद्द्याने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : कर्नाटकचे कन्नड भाषा विधेयक काय आहे? माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना विधेयक कठोर का वाटते?

Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Mumbai citizens suffer from cold and cough due to polluted air
प्रदुषित हवेमुळे मुंबईकर सर्दी, खोकल्याने त्रस्त
Palm oil shortage will lead to increase in edible oil prices
पामतेलाच्या तुटवड्यामुळे खाद्यतेलाची दरवाढ होणार?
Image of Donald Trump
Donald Trump : “तेल आणि गॅस अमेरिकेकडूनच विकत घ्या, नाहीतर…” डोनाल्ड ट्रम्प यांची नवी धमकी कोणाला?
demand diesel SUV cars
विश्लेषण : डिझेल एसयूव्ही कार्सच्या मागणीत वाढ का होत आहे?

मिथेनचे उत्सर्जन रोखण्यासाठी कंपन्यांना खूप कमी खर्च लागतो, पण….

आयईएने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार मिथेनचे उत्सर्जन रोखण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अतिशय स्वस्त असलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर जीवाश्म इंधनाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी केला तर मिथेनचे उत्सर्जन जवळपास ७५ टक्के कमी होऊ शकेल. या कंपन्यांनी २०२२ या वर्षात जेवढे उत्तन्न मिळवले आहे, त्याच्या ३ टक्क्यांपेक्षाही कमी खर्च मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी लागतो. मात्र जीवाश्मइंधनाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून या उपायोजनांची अंमलबजावणी केली जात नाहीये. परिणामी मिथेनचे उत्सर्जन रोखण्यात म्हणावे तसे यश मिळालेले नाही आणि तापमानवाढीला तोंड द्यावे लागत आहे.

खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन क्षेत्रातील शेल, बीपी, एक्झॉमोबील अशा आघाडीच्या कंपन्यांनी मागील वर्षांत भरमसाट कमाई केलेली आहे. एकीकडे या कंपन्या भरपूर नफा मिळवत असताना आयईएने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : तडकाफडकी ४०० सीएनजी बस बंद करून बेस्टने काय साधले?

आयईएच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे?

उर्जा क्षेत्रातील कंपन्यांमुळे ४० टक्के मिथेन वायूचे उत्सर्जन होते. विशेषत: नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये मिथेन गॅसचे उत्सर्जन होते. मिथेनच्या उत्सर्जनामुळे जवळपास २६० अब्ज घनमीटर नैसर्गिक वायूची गळती होते. पूर्ण नैसर्गिक वायूची गळती रोखणे अशक्य असले तरी गळतीचे प्रमाण कमी करता येऊ शकते. जीवाश्म इंधन (खनिज तेल, वायू) निर्मिती क्षेत्रात होणारे वेगवेगळ्या हानीकारक घटकांचे ७५ टक्के उत्सर्जन रोखता येऊ शकते. मात्र या घटकांच्या गळतीचा शोध घेणे तसेच ही गळती रोखणे अशा उपायांची अमंलबजावणी करून ते शक्य आहे,’ असे या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे. तसेच बहुतांश कंपन्या मिथेन तसेच अन्य वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठीच्या उपायांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करत नाहीत, असे निरीक्षणही या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आले आहे. ७५ टक्के नैसर्गिक वायुची गळती रोखण्यात यश आले तर जागतिक तापमान वाढ ०.१ अंश सेल्सिअसने रोखता येऊ शकते.

हेही वाचा >>> विश्लेषण : ब्रिटनमध्ये भाजीपाल्याची टंचाई, टोमॅटोचा भाव चौपट; जाणून घ्या नेमकं काय घडतंय?

मिथेनच्या उत्सर्जनामुळे हवामानात काय बदल होतो?

मिथेन हा हरितगृह वायू असून तो ३५ टक्के तपामानवाढीला कारणीभूत आहे. मिथेननंतर कार्बन डायऑक्साईड हा वायूही काही प्रमाणात तापमानवाढीला कारणीभूत आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅमच्या अहवालानुसार मागील २० वर्षांमध्ये तापमानवाढीसाठी मिथेन वायू कार्बन डायऑक्साईडपेक्षा ८० टक्के अधिक जबाबदार आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: पंजाबच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांचा नकार, आप सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव; कायदा काय सांगतो?

मिथेनचे उत्सर्जन तापमानवाढीसाठी कारणीभूत

दरम्यान, NOAA संस्थेनुसार २०२१ साली २०२० सालाच्या तुलनेत मिथेनचे उत्सर्जन १७ पीपीएमने वाढले आहे. कार्बन डायऑक्साईड हा वायू मिथेनच्या तुलनेत जास्त काळ वातावरणात टिकतो. मात्र मिथेन वायू कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत शक्तिशाली असून तो २५ पटीने वातावरणातील उष्णता धरून ठेवतो. याच कारणामुळे मिथेनचे उत्सर्जन तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरणारा महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच मागील काही वर्षांपासून संशोधकांकडून मिथेनच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केलेली आहे.

Story img Loader