Fossils of massive prehistoric snake found: प्रसंग होता समुद्रमंथनाचा देव- दानव समुद्राच्या तळाशी असलेल्या अमृताच्या प्रतीक्षेत होते. परंतु एवढ्या मोठ्या विशाल सागराला ढवळणे काही सोपे काम नव्हते. यावेळी देव आणि दानवांच्या मदतीला धावून आला तो ‘वासुकी’ नाग. हिंदू पौराणिक कथांमध्ये वासुकी नागाला मानाचे स्थान आहे. मंदारांचल पर्वताला वेटोळे घालून या भल्या मोठ्या नागाच्या दोन्ही बाजुंना दोरीसारखं पकडून समुद्रमंथन करण्यात आले. केवढा तो विशाल मदारांचल पर्वत आणि त्याला वेटोळे घालणारा वासुकी नाग. इतका मोठा प्रचंड मोठा नाग प्रत्यक्षात असणे कठीणच. यासारख्या कल्पना केवळ पुराणांमध्येच शोभतात असे म्हणणाऱ्या अनेकांना चकित करणारे एक संशोधन समोर आले आहे. चक्क अभ्यासकांनी वासुकी नागाचाच शोध लावला आहे. याच पार्श्वभूमीवर या संशोधनाविषयी जाणून घेणे नक्कीच माहितीपूर्ण ठरणारे आहे.

अधिक वाचा: विश्लेषण: कंगना रणौतने निवडणुकीतील यशासाठी घातले साक्षात यमराजालाच साकडे; काय आहे गूढ यमराज या मंदिराचा इतिहास?

Fossilized dinosaur dung revealing Jurassic era secrets
Fossilized Dinosaur Dung: डायनासोरची विष्टा आणि उलटी सांगतेय त्याच्या अस्तित्त्वाची कथा; नवीन संशोधनाने ज्युरासिक कालखंडाचे कोणते रहस्य उलगडले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
Citizens of Gondia and state experienced thrill of tigers in Navegaon Nagjira forest
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ
snake bites disease
सर्पदंश हा आजार मानला जाणार? कारण काय? याला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी केंद्राकडून का होत आहे?
Nazca lines
Nazca Lines AI discovery: अत्याधुनिक AIने उलगडली प्राचीन कातळशिल्पं!
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
bjp leader and mlc yogesh tilekar uncle satish wagh killed after kidnapped in pune
भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरण करून खून

वासुकी इंडिकस

४७ दशलक्ष वर्षांपूर्वी भारतात वावरणाऱ्या भल्या मोठ्या नागाचा शोध संशोधकांनी लावला आहे. या नागाचे नामकरण हिंदू पौराणिक कथांमधील वासुकी या प्रसिद्ध पौराणिक नागावरून ‘वासुकी इंडिकस’ असे करण्यात आले आहे. ५० फूटांपेक्षाही लांब, आणि आतापर्यंत नोंद केलेल्या भल्यामोठ्या अजगारांनाही लाजवेल असे या नागाचे वर्णन करण्यात येत आहे.

या संशोधनाचे श्रेय कोणाचे?

वासुकी इंडिकस हा आतापर्यंत अस्तित्वात असलेल्या सर्वात मोठ्या सापांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. या संदर्भातील संशोधन ‘नेचर’ या संशोधन पत्रिकेत प्रकाशित करण्यात आलेले आहे. या संशोधनात म्हटल्याप्रमाणे हा अतिभव्य नाग ४७ दशलक्ष वर्षांपूर्वी इओसीन या कालखंडात अस्तित्त्वात होता. हा नाग संथ गतीने फिरणारा, हल्ला करणारा शिकारी होता, याने आपल्या भक्ष्याला पिळवटून मारले असे संशोधनात सिद्ध झाले आहे. या विषयावर सखोल संशोधक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुरकी (उत्तराखंड) येथील देबजित दत्ता आणि सुनील बाजपेयी या दोन संशोधकांनी केले आहे. यांनी प्रकाशित केलेल्या अहवाल २७ जीवाश्म vertebrae- कशेरुकाचे विश्लेषण करण्यात आले आहे (Datta, D., Bajpai, S. Largest known madtsoiid snake from warm Eocene period of India suggests intercontinental Gondwana dispersal. Sci Rep 14, 8054 (2024)). ही जीवाश्म गुजरातमधील पानांध्रो लिग्नाइट खाणीत सापडली होती.

शोधाची सुरुवात

वासुकी इंडिकसची गाथा २००५ साली सुरू झाली. सुरुवातीच्या कालखंडात गुजरात येथे सापडलेल्या जीवाश्मांची ओळख मगरीसारख्या प्राण्याशी करण्यात आली होती. २०२३ साली हे अवशेष भल्यामोठ्या नागाचे असल्याचे उघड झाले. त्यानंतर झालेल्या संशोधनात या प्राण्याचा आकार, निवासस्थान, वर्तन यांचा शोध घेण्यात आला. ज्यात या प्राण्याचे आकारमान हे त्याचे वैशिष्ट्य ठरले.

साप किती मोठा होता?

देबजित दत्ता (पोस्टडॉक्टरल फेलो) आणि जीवाश्मविज्ञानाचे प्राध्यापक सुनील बाजपेयी यांनी सीएनएनला दिलेल्या माहितीप्रमाणे या नागाच्या भव्य आकारमानामागे अनेक कारणे आहेत. ज्यात भरपूर अन्न संसाधने असलेल्या अनुकूल वातावरणापासून ते नैसर्गिक भक्षकांचा अभाव इत्यादींचा समावेश होतो. किंवा त्यामागे उबदार हवामान कारणीभूत असण्याचीही शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

जतन केलेल्या कशेरुकाच्या आकाराच्या आधारावर संशोधकांनी सापाची लांबी १०.९ मीटर (३६ फूट) ते १५.२ मीटर (५० फूट) असल्याचे सांगितले. तर या नागाचे शरीर विस्तृत आणि दंडगोलाकार होते. दत्त आणि बाजपेयींना यांनी सांगितले की, वासुकी इंडिकस पाण्याऐवजी जमिनीवर राहत असावा. आपल्या आकारमानामुळे तो झाडावर चढण्यास असमर्थ होता. असे असले तरी हा आकार उपलब्ध अवशेषांवरून अंदाजाने व्यक्त करण्यात आला आहे, कारण अभ्यासकांकडे या सापाच्या सांगाड्याचे पूर्ण अवशेष उपलब्ध नाहीत. देबजित दत्ता आणि सुनील बाजपेयी यांनी सांगितले की, ‘वासुकी इंडिकस हा टायटानोबोआ या सर्वात मोठ्या ज्ञात सापांच्या प्रजातीइतका मोठा असू शकतो. कोलंबियात सापडलेल्या टायटानोबोआचे वजन सुमारे १,१४० किलोग्राम (२,५०० पौंड) होते आणि लांबी नाकापासून शेपटीच्या टोकापर्यंत सुमारे १३ मीटर (४७.७ फूट) होती.

अधिक वाचा: विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?

हवामानाशी संबंध

निसर्गातील अनेक रहस्यांपैकी वासुकीच्या अस्तित्त्वाची कथाही हवामानाशी संबंधित आहे. नागाचे रक्त थंड असते. नाग हे पर्यावरणीय तापमानास अत्यंत संवेदनशील असतात. उबदार हवामान त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आदर्श परिस्थिती प्रदान करते. त्यांच्या शरीरातील अंतर्गत तापमान सभोवतालच्या वातावरणातील तापमानासह कमी जास्त होते. सभोवतालच्या उच्च तापमानामुळे वासुकीच्या चयापचय दरात वाढ झाली आणि त्याचाच परिणाम त्याच्या आकारमानाच्या वाढीत झाला असण्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे. संशोधकांच्या मतानुसार हा नाग किनारी किंवा दलदलीच्या क्षेत्रात राहत होता. वासुकीने कोणत्या प्रकारचे प्राणी खाल्ले हे आम्ही सांगू शकत नाही असेही त्यांनी सांगितले. परंतु त्याच्या अवशेषांच्या अभ्यासातून मासे, मगरी इत्यादींची शिकार त्याने केली असावी असे दिसते.

या नवीन संशोधनामुळे इतिहासपूर्व कालखंडातील आणखी एक पैलू उघड होण्यास मदत होणार असल्याने हे संशोधनाला महत्त्वाचे मानले जात आहे.

Story img Loader