केरळमधील पल्लीकड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. सोमवारी या बैठकीचा समारोप झाला. या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रभारी सुनील आंबेकर यांनी जात जनगणनेला संघाचा पाठिंबा असल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसकडून सातत्याने जात जनगणनेची मागणी होत आहे. आता सुनील आंबेकर यांच्या विधानानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही हीच मागणी आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. विशिष्ट समुदाय किंवा जातींचा डेटा गोळा करण्यावर आक्षेप नाही. पण, त्याचा वापर जनकल्याणासाठी केला जावा; निवडणुकांसाठी राजकीय साधन म्हणून नाही, असे मत त्यांनी या बैठकीत व्यक्त केले. समन्वय बैठक ही संघाच्या चार वार्षिक सभांपैकी एक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार वार्षिक बैठका कशा असतात? या बैठकांमध्ये नक्की कोणत्या विषयांवर चर्चा होते? त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा