France Violence : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या किशोरवयीन मुलांना घरातून बाहेर पडू देऊ नये. मंगळवारी (२७ जून) पॅरिसच्या उपनगरात वाहतूक नियम तोडल्याबद्दल पोलिसांनी एका किशोरवयीन मुलावर गोळीबार केला होता. गोळीबारात मुलाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फ्रान्समधील लोकांमध्ये तीव्र संताप उसळला असून ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरून सरकार आणि पोलिसांचा निषेध करत आहेत. अनेक ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटल्या असून गाड्यांची जाळपोळ, इमारती आणि दुकानांमध्ये लुटमार सुरू आहे. गोळीबार झाल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी फ्रान्सच्या काही भागात अराजक परिस्थिती कायम आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व पर्याय वापरले जातील, अशी घोषणा फ्रान्स सरकारने केलेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंडिपेंडेंट युके या वेबसाईटने पॅरिसमधील घटनाक्रमाचा सविस्तर आढावा घेताल आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. ३० जून) पर्यंत पोलिसांनी विविध भागातून ८०० लोकांना ताब्यात घेतले आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले की, अटक केलेले सर्व बहुतेक सामान्य नागरिक आहेत. पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान आंदोलन आटोक्यात आणून शहरातील शाळा, पोलीस स्थानक आणि इतर सार्वजनिक इमारतींना लावलेल्या आगी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्य पॅरिस आणि इतर भागांमध्ये लुटमार झाल्याच्याही बातम्या समोर येत आहेत.
फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न म्हणाल्या की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार हरऐक प्रकारे प्रयत्न करत आहे. देशात भडकलेला हिंसाचार हा दुःखद आणि अक्षम्य असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे. राष्ट्रीय एकात्मता सुनिश्चित करणे आणि त्यासाठी जनजीवन पूर्वपदावर आणण्याकडे आमची प्राथमिकता आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान बॉर्न यांनी पॅरिस येथे माध्यमांशी बोलताना दिली.
पॅरिसमध्ये गोळीबाळाची घटना कशी घडली?
मंगळवारी सकाळी पॅरिस मधील नॉनटेअर येथे १७ वर्षीय नाहेल एम. नावाच्या मुलाने गाडी चालवत असताना वाहतुकीचे नियम मोडले असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले आहे. फ्रान्समधील पूर्ण वाहनचालक परवाना मिळवण्यासाठी सदर मुलगा खूपच लहान होता. पोलिसांनी नोंदविलेल्या जबाबानुसार, सदर मुलगा वाहतूक पोलिसांच्या दिशेने वेगात येत असल्यामुळे सदर पोलिसाने त्याच्यावर गोळी झाडली. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या दाव्याशी विसंगत अशी परिस्थिती दिसत आहे. गुरूवारी, नॉनटेअरच्या सरकारी वकिलांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, घटनेशी संबंधित इतर व्हिडिओ आणि पोलिसांचे जबाब एकत्र करून मंगळवारी सकाळी घडलेल्या घटनेचा तपशील समोर मांडला.
सरकारी वकील पास्कर प्रेच यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी मोटारसायकलवर असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना दिसले की, एक मर्सिडीज गाडी लहान मुलगा चालवत असून त्या गाडीत दोन प्रवासी होती. सदर गाडी बससाठी असलेल्या लेनमधून वेगाने चालत होती. वाहतूक पोलिसांनी सदर गाडी थांबविण्यासाठी दोन वेळा चालकाला इशारा केला. तरीही किशोरवयीन वाहनचालकाने न थांबता गाडी पळविली. त्यामुळे वाहतूक पोलिसांना गाडीचा पाठलाग करावा लागला. पुढील सिग्नलजवळ मर्सिडीज गाडी थांबल्यानंतर पोलिसांनी वाहनचालकाला गाडीचे इंजिन बंद करून बाहेर येण्यास सांगितले.
किशोरवयीन मुलाच्या हत्येनंतर खळबळ उडाली
पोलिसांनी आपल्या जबाबात सांगितले की, सिग्नलजवळ मर्सिडीज गाडी थांबल्यानंतर आम्ही वाहन चालकावर शस्त्र रोखून त्याला गाडीतून बाहेर येण्यास सांगितले. मात्र त्याने गाडी सुरू करून आमच्या दिशेने येण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे आम्हाला गोळीबार करावा लागला. सदर गोळी किशोरवयीन वाहनचालकाच्या छातीत लागल्यामुळे गाडी थोड्या अंतरावर जाऊन आदळली. त्यानंतर गाडीतील एक प्रवासी पळून गेला. सकाळी ८.२१ वाजता अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी चालकाला बाहेर काढून उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
सरकारी वकील प्रेच यांनी सांगितले की, ज्या वाहतूक अधिकाऱ्याने एक गोळी झाडली त्याच्या म्हणण्यानुसार तो फक्त सदर गाडी थांबवू इच्छित होता, जेणेकरून त्याला किंवा त्याच्या सहकाऱ्याला गाडीचा धक्का लागून इजा होणार नाही. नाहेल या किशोरवयीन मुलावर गोळी झाडल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर वकील प्रेच असेही म्हणाले की, या घटनेत शस्त्र वापरण्यासाठीच्या कायदेशीर अटी पूर्ण झालेल्या नाहीत.
दंगली कशा काय सुरू झाल्या?
नाहेल एम हा मूळचा उत्तर आफ्रिकन वंशाचा आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि पोलिसांकडून वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेल्या शहरांमध्ये जाणूनबुजून वर्णद्वेष केला जात आहे, अशा अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत. काही वर्षांपासून पोलिसांच्या हातून अशाप्रकारे अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर काही जखमी झालेले आहेत. याची जबाबदारी निश्चित व्हावी, अशीही मागणी फ्रान्समधून होत आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या मिनेसोटा येथे पोलिसांच्या हातून जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तिची हत्या झाल्यानंतर फ्रान्समध्येही त्याचे पडसाद उमटले होते. अनेकांनी रस्त्यावर उतरून फ्रान्समधील वर्णद्वेष आणि इतर अत्याचार प्रकरणी आवाज उचलला होता.
मंगळवारी नॉनटेअर येथे घडलेली घटना ही २०२३ मधील वाहतूक पोलिसांच्या प्राणघातक कारवाईची तिसरी घटना आहे. राष्ट्रीय पोलिसांचे प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी अशाप्रकारे १३ गोळीबाराची प्रकरणे घडलेली आहेत. २०२० मध्ये वाहतूक पोलिसांच्या हल्ल्यात दोन तर २०२१ साली तीन लोकांचा मृतू झालेला आहे. रॉयटर्सने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१७ पासून अशाप्रकारे पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेले हे अधिकतर कृष्णवर्णीय आणि अरब वंशाचे लोक आहेत.
मंगळवारी सकाळी नाहेलवर गोळीबार झाल्यानंतर रात्रीच्या आसपास नॉनटेअर उपनगरात गोळीबार झालेल्या ठिकाणीच लोकांनी संताप व्यक्त केला. याठिकाणी असलेल्या कचऱ्याच्या डब्यांना आग लावण्यात आली, तसेच आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने जळते फटाके फेकले. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या वापरल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने याठिकाणी दोन हजार पोलीस तैनात केले. मात्र बुधवारी (दि. २८ जून) संध्याकाळी पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला. यामुळे सरकारने देशभरातून ४० हजार पोलीस याठिकाणी तैनात केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
हे वाचा >> दंगलखोर व पोलीस भिडले असताना ‘हा’ पठ्ठ्या सँडविच खाण्यात मग्न, पाहा VIDEO
दंगली कुठे कुठे पसरल्या आहेत?
गुरूवारी रात्री पोलीस आणि अग्नीशमन दलाने शाळा, पालोस स्थानक आणि टाऊन हॉल तसेच इतर सार्वजनिक इमारतींना लागलेल्या आगी विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, अशी माहिती राष्ट्रीय पोलीस प्रवक्त्यांनी दिली. पॅरिसमधील उपनगरे, नॉनटेअर येथील तणावाचे पडसाद आता फ्रान्समधील इतर शहरांमध्येही जाणवू लागले आहेत. दक्षिणेतील टुलुझ आणि उत्तरेकडील लिले येथे आग लावण्याच्या आणि चकमकीच्या घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
गृहमंत्री गेराल्ड डार्मनिन यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री घडलेल्या हिंसाचारात २०० हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. ६००० हून अधिक आगीच्या घटना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलीस आणि अग्नीशमन दलाने केला आहे. आगीच्या घटनांमुळे जवळपास ५०० इमारती क्षतीग्रस्त झाल्या असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
नाहेलच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे फ्रान्समध्ये नोव्हेंबर २००५ साली घडलेल्या हिंसाचाराची पुन्हा एकदा आठवण झाली. त्यावेळी तीन आठवडे फ्रान्समध्ये हिंसाचार सुरू होता, त्यानंतर राष्ट्राध्यक्ष जॅकस चिराक यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी दोन अल्पवयीन तरूण लपून बसले असताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला होता. पॅरिसच्या क्लिची-सॉस-बोईस या उपनगरात घडलेल्या या घटनेचे लोण देशभर पसरले आणि मोठ्याप्रमाणात हिंसेची लाट तयार झाली होती. या घटनेनंतर संबंधित दोन पोलीस अधिकाऱ्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.