नुकतेच नियुक्त झालेले गॅब्रिएल ॲटल हे फ्रान्सचे पहिले जाहीर समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत. सन २००९ पासून आतापर्यंत विविध देशांचे नऊ समलिंगी राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान किंवा मंत्री झाले आहेत. इतिहासात आतापर्यंत अनेक राजे, राण्या आणि राष्ट्राध्यक्ष हे समलिंगी असल्याची वदंता होती. मात्र आता आपली समलिंगी ओळख जाहीरपणे सांगणारे राष्ट्रप्रमुख-पंतप्रधान किंवा मंत्री काही देशांत आहेत. यांपैकी सर्व नेते हे युरोपीय आहेत. त्या विषयी…

गॅब्रिएल ॲटल कोण आहेत?

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांनी नुकतीच ३४ वर्षीय शिक्षण मंत्री गॅब्रिएल ॲटल यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. ॲटल हे महायुद्धोत्तर काळातील फ्रान्सचे सर्वांत तरुण पंतप्रधान ठरले आहेत. तसेच ते फ्रान्सचे पहिले समलिंगी पंतप्रधान ठरले आहेत. ॲटल १७ वर्षांचे असताना फ्रान्सच्या समाजवादी पक्षात सहभागी झाले. कोविड महासाथीत सरकारचे प्रवक्ते म्हणून ते फ्रेंच राजकीय वर्तुळासह घरोघरी परिचयाचे झाले. नंतर अर्थ मंत्रालयातील कनिष्ठ मंत्री आणि २०२३ मध्ये शिक्षणमंत्रिपदी त्यांची नियुक्ती झाली. माक्राँ यांचे जाणकार-अभ्यासू कॅबिनेट मंत्री आणि कुशल संवादक म्हणून त्यांनी अल्पावधीत ओळख प्रस्थापित केली. शिक्षणमंत्री असताना फ्रान्समधील शाळांत मुस्लिम वेशभूषेवर बंदी घातल्याने ते उलटसुलट चर्चेत आले होते. ॲटल यांच्या नियुक्तीने समलिंगी राष्ट्रप्रमुख-पंतप्रधानपदाची युरोपीय परंपरा चर्चेत आली आहे. १५ वर्षांपूर्वी २००९ मध्ये आइसलँडच्या तत्कालीन पंतप्रधान जोहान्ना सिगुर्दर्डोटीर यांनी सर्वप्रथम आपली समलिंगी ओळख जगासमोर जाहीर केली होती.

those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
elon musk role in trump administration
‘लाभार्थी’ इलॉन मस्कची ट्रम्प प्रशासनात काय भूमिका राहील? त्याच्या कंपन्यांना किती आणि कसा फायदा होणार? 
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Congress response to Fadnavis criticism of the Prime Minister print politics news
‘पंतप्रधानांना बदलायचे आहे हे तेच संविधान’; फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

हेही वाचा…विश्लेषण: मोजक्याच जागांवर लक्ष केंद्रित करण्याची काँग्रेसची व्यूहरचना? लोकसभेसाठी किती जागा लढवणार?

पहिले समलिंगी राष्ट्रप्रमुख कोण?

सॅन मारिनो हा युरोपमधील व्हॅटिकन सिटी व मोनॅकोच्या खालोखालचा तिसरा लहान देश. या देशाचे प्रमुखपद दोन जण संयुक्तपणे सहा महिन्यांसाठी भूषवतात. ‘कॅप्टन रीजेंट’ या पदाने ते ओळखले जातात. सन २०२२ मध्ये या देशाच्या प्रमुखपदी पाओलो रोंडेली यांची निवड झाली. पहिले समलिंगी राष्ट्रप्रमुख ठरण्याचा मान पाओलोंना मिळाला. एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या सहा महिन्यांसाठी ऑस्कर मिनासमवेत त्यांनी ‘कॅप्टन रीजेंट’ म्हणून काम केले. लाटवियाच्या ११व्या अध्यक्षपदाची सूत्रे एडगर्स रिंकेविच यांनी २०२३ मध्ये हाती घेतली आहेत. तेव्हा २०२३ मध्ये ते जगातील दुसरे समलिंगी राष्ट्राध्यक्ष ठरले. युरोपीय महासंघ सदस्य देशांत ते पहिले राष्ट्रप्रमुख ठरले. सन २०१४ मध्ये परराष्ट्र मंत्रिपदी असताना ‘ट्विटर’वर आपले समलैंगिकत्व जाहीर करणारे ते पहिलेच लॅटव्हियन खासदार बनले.

पहिल्या समलिंगी महिला पंतप्रधान कोण?

आइसलँडमध्ये २००९ मध्ये आइसलँडच्या ‘सोशल डेमोक्रॅटिक अलायन्स’च्या नेत्या जोहान्ना सिगुरर्डोटिर या २००९ ते २०१३ या काळात आइसलँडच्या आणि जगातील पहिल्या समलिंगी महिला पंतप्रधान ठरल्या. सिगुर्दर्डोटिर यांना त्यांचे पूर्वाश्रमीचे पती पोर्वाल्दुर स्टेनर जोहान्सन यांच्यापासून दोन मुले आहेत. त्यांनी २००२ मध्ये लेखिका जोनिना लिओस्डोटिर यांच्याशी सममलैंगिक संबंध सार्वजनिकरीत्या स्वीकारले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक सुधारणा केल्या. सन २०१० मध्ये समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देत या नवीन कायद्याचा पहिल्या लाभार्थींपैकी एक बनल्याबद्दल त्या आदरास पात्र ठरल्या. त्यांनी २०१३ मध्ये राजकारणातून निवृत्ती घेतली.

हेही वाचा…विश्लेषण: राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा की अजित पवारांचा? अपात्रता याचिकांबाबत शिवसेना निकालाचीच पुनरावृत्ती?

भारतीय वंशाचे आयर्लंडचे प्रमुख कोण?

एलीयो दी रुपो हे २०११ मध्ये बेल्जिअमचे नेतृत्व करणारे पहिले समलिंगी पुरुष ठरले. दी रुपो सत्तेवर येईपर्यंत बेल्जिअममध्ये आधीच समलिंगी विवाह आणि ‘एलजीबीटी’ दत्तक कायदे अनेक वर्षांपासून अस्तित्वात होते. लिओ वराडकर हे डिसेंबर २०२२ पासून आयर्लंडचे ‘टीशाह’ म्हणजेच राष्ट्रप्रमुखपद भूषवत आहेत. यापूर्वी ते २०१७ ते २०२० पर्यंत या पदावर होते. आयर्लंड सरकारचे पहिले समलिंगी प्रमुख ठरले. सन २०१५ मध्ये देशाच्या समलिंगी विवाहासंबंधी सार्वमताच्या आधी सार्वजनिकरीत्या आपली ओळख उघड करणारे ते पहिले आयरिश मंत्री ठरले.

समलिंगी पंतप्रधान-उपपंतप्रधान कोणत्या देशाचे?

झेवियर बेटेल २०१३ मध्ये लक्झेम्बर्गच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले आणि त्याच वर्षी समलिंगी समाजवादी नेते एटिएन श्नाइडर यांच्याशी युती करून ते पंतप्रधान झाले. श्नाइडर हे उपपंतप्रधान झाले. या दोघांच्या रूपाने लक्झेम्बर्ग एकाच वेळी समलिंगी पंतप्रधान आणि समलिंगी उपपंतप्रधान असणारा पहिला देश बनला. बेटेल यांच्या नेतृत्वाखाली, लक्झेम्बर्गने ५६ विरुद्ध ४ मतांनी समलिंगी कायदा मंजूर केला. सन २०१५ मध्ये हा कायदा मंजूर झाला. त्याचा लाभ घेत बेटेल मे २०१५ मध्ये त्यांचा साथीदार गौथियर डेस्टेनेशी विवाहबद्ध झाले.

हेही वाचा…विश्लेषण: संत्री उत्पादकांचे प्रश्न केव्हा सुटणार?

‘एलजीबीटीक्यू’च्याच टीकेच्या धनी कोण?

सर्बियासारख्या पुराणमतवादी देशाच्या पहिल्या समलिंगी मंत्री झाल्यानंतर ॲना ब्रनाबिक वर्षभरातच २०१७ मध्ये सर्बियाच्या पहिल्या समलिंगी पंतप्रधान बनल्या. त्यांच्या नियुक्तीवर काही ‘एलजीबीटीक्यू’ गटांनी सर्बियन अध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांच्या उजव्या विचारसरणीच्या सरकारच्या प्रभावातून टीका केली होती. अंडोराचे पंतप्रधान झेवियर एस्पॉट मारो यांनी २०१९ मध्ये पदभार स्वीकारला, परंतु २०२३ मध्ये आपण समलिंगी असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्याबाबत झामारो यांनी स्पष्ट केले, की माझी समलिंगी ओळख मी कधीही लपवली नाही. विचारल्याशिवाय ती आवर्जून सांगण्याची गरज मला वाटत नाही.