जगात सर्वच ठिकाणी शहरांतील लोकसंख्या वेगाने वाढत आहे, भारतासारख्या शहरांत ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शहरांत लोसंख्या स्थलांतरीत होतांना बघायला मिळत आहे. यामुळे शहरांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरात आलेल्या, ये-जा करणाऱ्या नागरीकांना मुलभूत सुविधा देतांना शहरांतील प्रशासनाची तारांबळ उडत आहे, शहरे बकाल होत आहेत. असं असतांना पॅरिस शहराने जगापुढे विशेषतः भारतासारख्या देशापुढे उत्तम नगर नियोजनाचा धडा घालून दिलेला आहे.

जगातील सर्वात सुंदर शहर म्हणून पॅरीस शहराने गेली कित्येक वर्षे ओळख टिकवून ठेवली आहे. मात्र हे ओळख निर्माण होण्यापूर्वी शहराला एका फार मोठ्या स्थित्यंतराला सामोरे जावे लागले, हे होतांना लोकांची निदर्शने झाली. पण त्यांनतर जो बदल झाला तो पुढील अनेक दशकांतील नागरीकरणाला पुरुन उरला.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
white house
३,००० कामगार, ४१२ दरवाजे, १३२ खोल्या अन् बरंच काही; जाणून घ्या ट्रम्प यांच्या होणाऱ्या अधिकृत निवासस्थानाची वैशिष्ट्यं
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

फ्रान्समध्ये राजकीय स्थित्यंतर

नेपोलियन तिसरा हा प्रसिद्ध फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्टचा भाचा. राजकीय उलथापलथीनंतर नेपोलियन तिसरा हा १८४८ ला फ्रान्स देशाचा पहिला अध्यक्ष (राष्ट्रपती ) झाला. दुरदृष्टी असलेल्या या अध्यक्षाचे राजधानी असलेल्या पॅरिस शहरावर खूप प्रेम होते. शहराची बकाल स्थिती लक्षात घेता त्याने पॅरिसचा अधिकारी ( प्रशासकीय प्रमुख ) हौसमन (Haussmann)ला शहराचे नव्याने नियोजन करण्याचे आदेश दिले.

आधी पॅरिस कसे होते?

१८५० च्या दशकात जगात पॅरिस शहराचे जगात नाव होते, युरोपंच काय जगाच्या कानाकोपऱ्यातून पॅरिस शहरात पोटापाण्यासाठी लोकांचे लोंढे येत होते. मात्र पॅरिस हे अत्यंत गलिच्छ अवस्थेत होते. सांडपाण्याची योग्य सोय नसणे, वाहतुकीचे नियोजन नसणे, रोगराई, गलिच्छ वस्ती, आरोग्य व्यवस्थेचा अभाव यामुळे शहराला एक बकाल अवस्था आली होती.

हौसमनचे शिवधनुष्य

फ्रान्समधील राजकीय उलथापालथीचे सत्र थांबल्यावर १९५३ मध्ये हौसमनने पॅरिस शहराच्या नियोजनाच्या कामाला सुरुवात केली.१८५३ -५९, ५९-६७ आणि ६७-६९ अशा तीन टप्प्यात भीमकाय अशी कामे करत पॅरिस शहर आणि आजुबाजुच्या भागाचा चेहरामोहरा बदलला.

Arc de Triomphe च्या परिसरातील रस्ते

दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेट हे ज्या वास्तूची प्रतिकृती असल्याच म्हंटलं जातं ते परिसमधील प्रसिद्ध Arc de Triomphe च्या परिसराची पुर्नबांधणी सर्वप्रथम करण्यात आली. Arc de Triomphe हे केंद्रस्थानी ठेवत मुख्य रस्ते, जोड रस्ते, चौक यांची निर्मिती करण्यात आली. हा सर्व परिसर आयफेल टॉवर एवढाच पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरला आहे.

जुन्या इमारती जमिनदोस्त, रस्ते उद्ध्वस्त

शहरातील मुख्य आणि प्राचिन वारसा सांगण्याऱ्या इमारतींना वगळत हौसमनने तब्बल १९ हजार बांधकामे ही जमिनदोस्त केली, यामध्ये तब्बल एक लाख २० घरे होती. याजागी सुटसुटीत आणि अधिक लोकांना सामावून घेता येईल अशा तब्बल ३४ हजार नव्या इमारतीची निर्मिती केली. या सर्व इमारतींची उंची आणि आकार याला विशिष्ट नियमावली देत अवाढव्य इमारती तयार होणार नाहीत याची काळजी घेतली.

एकीकडे इमारतांची पुर्नबांधणी करतांना कित्येक रस्ते पुन्हा नव्याने बांधले. मुख्य रस्ते अतिशय रुंद करण्यात आले, तर अतंर्गत रस्ते हे किमान १२ मीटर रुंद आणि लहान रस्ते हे ५ मीटर रुंदीचे ठेवण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा तत्कालीन दिवाबत्तीची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली.

संपुर्ण शहरासाठी भुमिगत सांडपाणी व्यवस्था उभी करण्यात आली. आरोग्य व्यवस्था

याच काळात Paris Opera House, he Gare du Nord रेल्वे स्टेशन, Saint-Augustine चर्च अशा काही भव्य वास्तू उभ्या करण्यात आल्या, जे आजही पॅरिसच नव्हे तर फ्रान्स देशाची जगात ओळख बनून राहिल्या आहेत. शहराच्या चारही दिशांना असलेल्या विस्कळीत जंगलसदृश्य भागाचे भव्य अशा पार्कमध्ये रुपांतर केले आणि पॅरिस शहराभोवती हिरवळ-निसर्गसौदर्य कायम राहील याची काळजी घेण्यात आली.

Image Source @culturaltutor

या सर्व घडामोडींमुळे पॅरिस शहर एका सुस्थितीत पोहचले. पॅरिसमध्ये प्रवास करणे, रहाणे हे सुसह्य झाले. शहराचे सौदर्य वाढलेच पण त्याचबरोबर भविष्यातील वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्याची व्यवस्था तयार झाली.

अर्थात हे सर्व करतांना नेपोलियन तिसरा आणि हौसमनला लोकांच्या मोठ्या विरोधाला मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागले. जवळपास १७ वर्षे शहरात सर्वत्र सुरु असलेली कामे, त्यासाठी होत असलेला खर्च याला मोठा विरोध झाला. पण कामाची सुट देण्यात आली असल्याने हौसमन यांनी ही सर्व कामे नेटाने पुर्ण केली.

हौसमनने पॅरिस शहर सुशोभित करत जो पाया रचला त्यावर आज १६० वर्षानंतरही पॅरिस शहर हे टिकून आहे. आज पॅरिस हे जगातील अत्यंत सुंदर शहर म्हणून ओळखलं जातं, ज्या वास्तुंचे, रस्त्यांचे,उद्यानांचे कौतुक केले जाते, पर्यंटकांचा राबता असतो हे सर्व हौसमनच्या कारकिर्दीत उभं केलेलं आहे.