What is digital condom?: …As easy as using a real condom… ‘वास्तविक कंडोम वापरण्याइतकं सोपं…’ असं नव्या आणि पहिल्या डिजिटल कंडोमच्या टॅग लाईनमध्ये म्हटलं आहे. लैंगिक संबंधादरम्यान गैर- सहमतीने रेकॉर्डिंग टाळण्यासाठी डिझाइन केलेलं हे अ‍ॅप आहे. या नवीन अ‍ॅपच्या परिचयाने सोशल मीडियावर गप्पा रंगल्या आहेत. लोकांनी विविध प्रतिक्रिया पोस्ट केल्या आहेत. या अ‍ॅप संदर्भात आश्चर्याची भावना व्यक्त केली गेली आहे. काहींनी तर प्रशंसा देखील केली आहे. तर काहींनी आपल्या समाजात हे आवश्यक आहे ,हेच खेदजनक असल्याचं म्हटलं आहे. काहींनी खिल्ली उडवली आहे… तर मला ‘आय लव्ह यू’ व्हायरसपासून सुरक्षित राहायचे आहे असं एकाने म्हटलं आहे. आणखी एकानं विचारल आहे की , हे फोन सेक्ससाठी आहे का?, तर तिसऱ्यानं म्हटलंय, WTF हे डिजिटल कंडोम आहे का? तुम्ही आता तांत्रिक नवकल्पनांनी वेडे होत आहात. एकूणच खिल्ली, आनंद, खेद अशा मिश्र प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर डिजिटल कंडोम म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेणं माहितीपूर्ण ठरावं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक वाचा: डीपफेक तंत्रज्ञान ठरतेय धोकादायक ! महिलांनी का राहायला हवं सावध?

डिजिटल कंडोमबद्दल जाणून घेण्यासाठी येथे पाच गोष्टी दिल्या आहेत:

१. ते कोणी तयार केले? आणि का?

डिजिटल कंडोम हे अ‍ॅप फोन सेक्ससाठी एक सुरक्षित खबरदारी म्हणून तयार करण्यात आलं आहे. जर्मन लैंगिक आरोग्य ब्रँड ‘बिली बॉय’ आणि ‘एजन्सी इनोसियन बर्लिन’ यांनी एकत्रित डिजिटल कंडोम हे अ‍ॅप तयार केलं आहे. त्याला CAMDOM- कॅमडोम म्हणतात.

२. ते अ‍ॅप नेमकं काय काम करते?

सध्या स्मार्टफोन हा शरीराचा अविभाज्य भाग झाला आहे. आपल्या फोनवर भरपूर संवेदनशील डेटा साठवला जातो. ‘म्हणूनच आपण सहमत नसलेल्या गोष्टींच्या रेकॉर्डिंगपासून संरक्षण करण्यासाठी पहिले ॲप तयार केले आहे. हे अ‍ॅप फक्त ब्लूटूथ वापरून तुमचा कॅमेरा आणि माइक ब्लॉक करू शकते.’ असे ॲपचे डेव्हलपर फेलिप आल्मेडा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

अधिक वाचा: Israel used Smart bomb: लेबनॉनमधील इमारती जमिनदोस्त करण्यासाठी इस्रायलने वापरला स्मार्ट बॉम्ब; नक्की काय आहे स्मार्ट बॉम्ब?

३. ते काय करते?

मोबाइल डिव्हाइस ब्लॉक करून लैंगिक संबंधादरम्यान असहमत असलेल्या बाबींचे रेकॉर्डिंग थांबवणे ही या शोधामागील कल्पना आहे.

४. ते कसे वापरले जाते?

निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समागमापूर्वी यूजर्सनी त्यांचे स्मार्टफोन एकमेकांच्या जवळ ठेवणे आवश्यक आहे. यूजर्स कॅमेरे आणि मायक्रोफोन ब्लॉक करण्यासाठी व्हर्च्युअल बटण स्वाइप करू शकतात. जर एखादा वापरकर्ता चोरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल, तर अलार्म संभाव्य गैर-सहमतीने रेकॉर्डिंगचा धोका दर्शवतो. आवश्यक तेवढ्या उपकरणांना एकाच वेळी ब्लॉक करण्याची क्षमता या यंत्रणेत आहे,” असे कंपनीने आपल्या निवेदनात स्पष्ट केले.

६. ॲपच्या शोधामागील प्रेरणा काय होती?

Innocean Berlin मध्ये आम्ही फक्त आमच्या क्लायंटसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी समस्यांचे निराकरण करण्यावर भर देतो. म्हणूनच, BILLY BOY बरोबर हे ॲप विकसित करणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. जेणेकरून वापरकर्त्यांचे त्यांच्या सहमतीशिवाय कोणीही रेकॉर्डिंग्स करू शकणार नाही. यापूर्वी कधीच ज्या तंत्रज्ञानाचा वापर केलेला नाही ते तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे असं Innocean Berlin चे CCO गॅब्रियल यांनी निवेदनात म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: German companys digital condom social media buzz about it svs