What Is the Ghost Island of the Caspian Sea? कल्पना करा की, समुद्राच्या मधोमध असलेलं एक बेट अचानक वर आलं आणि त्याबद्दल एकही बातमी न येता ते पुन्हा समुद्रात नाहीसंही झालं तर? हा काही मनाचा खेळ नाही. अनेकांसाठी ही एक गोंधळात टाकणारी आणि वारंवार घडणारी घटना आहे. यामुळे शास्त्रज्ञ चक्रावून गेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या भुताटकीचं बेट म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्थळाचा घेतलेला हा आढावा.

कॅस्पियन समुद्रात एक विलक्षण भुताटकीचं बेट पुन्हा प्रकट झालं आहे. या बेटाने अनेक शतकांपासून अचानक वर येणे आणि झपाट्याने नाहीसं होण्याचं चक्र कायम ठेवलं आहे. कुमानी बँक मड ज्वालामुखीच्या टोकावर तयार झालेलं हे बेट २०२३ च्या सुरुवातीला पुन्हा वर आलं. परंतु, २०२४ च्या अखेरीस अदृश्य होण्यास सुरुवात झाली. त्याचं अल्पकालीन अस्तित्व आणि पुन्हा प्रकट होणं या घटनाचक्राने भूभौतिकशास्त्रज्ञांना (Geophysics) भुरळ घातली आहे.

Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
पॅराक्वॅट विषबाधा म्हणजे काय? ग्रीष्माने तिच्या प्रियकराची हत्या कशी केली? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Paraquat Poisoning : पॅराक्वॅट म्हणजे नेमकं काय? त्यामुळे विषबाधा कशी होते?
Saif attacker tag costs Colaba resident his job, marriage
Saif Attacker Tag : “लग्न मोडलं, नोकरीही गेली..”, सैफवर हल्ला करणारा संशयित या एका आरोपाने कसं बदललं तरुणाचं आयुष्य?
Yogi Adityanath News
Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य, “सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे, सगळ्यांनी…”
soumendra jena success story
Success Story: १० बाय १० ची खोली ते दुबईतील आलिशान बंगला; १७ वर्षांच्या मेहनतीने बदलले नशीब
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
china super rich numbers declining
‘या’ देशातील श्रीमंत लोक देश सोडून का जात आहेत? श्रीमंतांच्या संपत्तीत घट होण्याचे कारण काय?

भुताटकीच्या बेटाचा संक्षिप्त इतिहास

कुमानी बँक बेटाचा नोंदवलेला इतिहास मे १८६१ पासून सुरू होतो. त्या कालखंडात ते प्रथम कॅस्पियन समुद्राच्या पृष्ठभागावर बाहेर येत असल्याचे लक्षात आले. मात्र, पुढच्याच वर्षी हे बेट नाहीसं झालं. अशाच प्रकारे हे बेट २० व्या शतकात सहा वेळा तरी वर आलं आणि पुन्हा अदृश्य झालं. प्रत्येक वेळी ते दोन वर्षांपेक्षा कमी काळ टिकतं होतं. या बेटाच्या पुनरागमनाचा संबंध पाण्याखालील मातीच्या ज्वालामुखीशी आहे. याच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हे बेट तयार होतं. उद्रेकामुळे मोठ्या प्रमाणात चिखल पृष्ठभागावर ढकलला जातो. त्यामुळे तात्पुरती भूमी तयार होते. हे उद्रेक भव्य असू शकतात. त्यात आगीची कारंजी आकाशात उडतात आणि तेल उत्पादन केंद्रांमध्ये होणाऱ्या स्फोटांसारखे स्फोट सतत होतं राहतात. तरीही, २०२३ साली बेटाचं प्रकटणं अशा ज्वालामुखीच्या आगीच्या स्फोटांशिवायच घडलं त्यामुळे हे प्रकरण आणखीच गूढ ठरलं.

बेटाचं २०२३ मधील पुनरागमन

नासाच्या २०२३ च्या उपग्रह प्रतिमांमध्ये बेटाचं अलीकडंच पुनरागमन नोंदवण्यात आलं. हे बेट अजरबैजानच्या किनाऱ्यापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर दिसलं. २०२४ च्या अखेरीपर्यंत बेटाचा मोठा भाग आधीच झिजला किंवा समुद्राखाली गेला. मागे फक्त काही तुकडे राहिले. उपग्रह डेटामध्ये बेटाचं पुनरागमन दिसून आलं असलं तरी ही घटना फारशी लक्षात आली नाही. २०२४ च्या शेवटी मार्क टिंगे यांनी थ्रेड्सवर पोस्ट केली की, “गेल्या वर्षी एक नवीन बेट अचानक दिसलं, जे खूप अद्भुत आहे.” १९९३ सालीही असाच प्रकार घडला होता. त्यावेळीस हे बेट बाहेर आलं होतं आणि उपग्रह प्रतिमांमध्ये दिसून येत असूनही अधिकृत नोंदींमध्ये याचा उल्लेख झाला नाही.

मातीच्या ज्वालामुखींचं महत्त्व

कुमानी बँक मड ज्वालामुखी हा कॅस्पियन समुद्राच्या अजरबैजान प्रदेशातील अनेक ज्वालामुखीं पैकी एक आहे, जो त्याच्या भूगर्भीय हालचालींसाठी प्रसिद्ध आहे. चिखलाच्या ज्वालामुखींची खासियत म्हणजे ते फक्त चिखलच नाही तर मिथेनसारखे वायूही उत्सर्जित करतात. हे वायू उद्रेकांच्या वेळी पेट घेऊन ज्वालानृत्याचंच दृश्य तयार करतात. हे ज्वालामुखी घोस्ट बेटांसारखे तात्पुरता भूभाग निर्माण करू शकतात.

ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस दाबाखालील चिखल आणि वायू समुद्रतळ फोडून पृष्ठभागावर येतात. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर डोंगरसदृश रचना तयार होते. मात्र, लाटांमुळे तयार होणारा गंज आणि तयार होणाऱ्या इतर बाबींचाही अस्थिरता यामुळे बेट बहुतेक वेळा फार काळ टिकत नाही. या भूगर्भीय निर्मिती आणि नैसर्गिक शक्तींमधील नाजूक संतुलनामुळे हे बेट क्वचितच काही वर्षांपेक्षा जास्त काळ टिकू शकतं.

२०२३ साली हे बेट बाहेर येण्याचं महत्त्व काय?

२०२३ साली भुताटकी बेटाचं बाहेर येणं हे शास्त्रज्ञांसाठी मड ज्वालामुखी आणि त्याचा आसपासच्या पर्यावरणाशी असलेला परस्परसंवाद अभ्यासण्याची दुर्मिळ संधी होतं. या तात्पुरत्या रचना त्यांच्या क्षणिक स्वरूपामुळे संशोधनासाठी अनोख्या आव्हानांचा आणि संधींचा लाभ देतात. कारण त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील बलवान भूगर्भीय शक्तींची एक झलक दाखवतात. टिंगे आणि इतर संशोधकांसाठी या बेटाचं बाहेर येणं मानवी निरीक्षणाबाबत अनेक प्रश्न उभे करतात. “आजच्या जलद होणाऱ्या प्रसिद्धीच्या कालखंडात एखादं बेट किनाऱ्यापासून फक्त २० किमी अंतरावर प्रकटतं आणि कोणीही त्याबद्दल काहीच बोलत नाही, हे खरोखरच आश्चर्यकारक आहे!” टिंगे यांनी नमूद केलं. त्यांच्या या निरीक्षणाने शास्त्रीय शोध आणि सार्वजनिक जागरूकता यामधील दरीवर प्रकाश टाकला आहे.

भुताटकीच्या बेटाचं भवितव्य

२०२५ च्या जानेवारी महिन्यात भुताटकीचं बेट हळूहळू अदृश्य झालं. आपल्या शतकांपासून चालत आलेल्या चक्राला ही घटना पुढे नेत आहे. याचं अदृश्य होणं पृथ्वीच्या भूगर्भशास्त्राच्या गतिमान आणि सतत बदलत्या स्वरूपाची आठवण करून देतं.त्यामुळे हे बेट सध्या दृश्यातून नाहीसं होत असलं तरी भविष्यात ते पुन्हा प्रकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभ्यासासाठी नवीन संधी निर्माण होतील. सध्या तरी कुमानी बँक बेट निसर्ग निर्माण करू शकणाऱ्या गूढ आणि तात्पुरत्या घटनांचं प्रतीक आहे. या बेटाचं थोड्याच काळासाठी दिसणं चिखलाच्या (मड) ज्वालामुखींच्या सामर्थ्याचा आणि आपल्या ग्रहाच्या भूगर्भीय शक्तींचा पुरावाच आहे.

Story img Loader