GI TAG to Assam’s Majuli Mask Art आसाममधील पारंपरिक वारसा कला असलेल्या माजुली मुखवट्यांना सोमवारी ४ मार्च रोजी केंद्राकडून जीआय टॅग (GI) देण्यात आला. माजुली हस्तलिखितांमधील चित्रांनाही जीआय लेबल देण्यात आले आहे. एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशात निर्माण झालेल्या वस्तूंना/उत्पादनांना जीआय टॅग दिला जातो, ती उत्पादने त्यांच्या अद्वितीय वैशिष्ट्ये आणि गुणांसाठी ओळखली जातात. मूलत: जीआय टॅग हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ट्रेडमार्क म्हणून काम करतो. माजुली हे ब्रह्मपुत्र नदीतील सर्वात मोठे बेट आहे आणि आसामच्या नव-वैष्णव परंपरेसाठी ओळखले जाते. हे ठिकाण १६ व्या शतकापासून मुखवटा तयार करण्याच्या कलेचे माहेरघर आहे. माजुली कलेचे अभ्यासक आणि संवर्धक या कलेला तिच्या पारंपरिक (मठांमधून) स्थानांतून बाहेर काढून जीवनदान देण्यासाठी झटत आहेत. त्यांच्याच पुढाकाराने या कलेला जीआय मानांकन मिळाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अधिक वाचा: अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
हे मुखवटे का महत्त्वाचे आहेत?
माजुली मुखवटे हे आसाममधील पारंपारिकरित्या सादर करण्यात येणाऱ्या ‘भाओना’ या नाट्यप्रदर्शनात वापरले जातात. १५ व्या शतकातील प्रसिद्ध सुधारक संत श्रीमंत शंकरदेव यांनी वैष्णव तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी हा नाट्य प्रकार प्रचलित केला होता. या नाट्यप्रदर्शनात हे हस्तनिर्मित मुखवटे वापरले जातात. देवी-देवता, राक्षस, प्राणी-पक्षी, रावण, गरुड, नरसिंह, हनुमान, वराह, शुर्पणखा इत्यादी नैसर्गिक,पौराणिक मुखवट्यांना विशेष महत्त्व आहे. या मुखवट्यांचा आकार हा वापरणाऱ्याच्या चेहऱ्याच्या आकाराचा असतो. त्यांचा उल्लेख मुख-मुखा असा करण्यात येतो. हा मुखवटा तयार करण्यासाठी जवळपास पाच दिवस लागतात. काही मुखवटे संपूर्ण शीर- शरीर झाकणारे असतात, त्यांना चो-मुख म्हणतात. या प्रकारचे मुखवटे तयार करण्यासाठी साधारण दीड महिन्याचा कालावधी लागतो. माजुली मुखवट्याला पेटंट मिळण्यासाठी केलेल्या अर्जानुसार हे मुखवटे बांबू, चिकणमाती, शेण, कापड, कापूस, लाकूड आणि नदीच्या परिसरात उपलब्ध असलेल्या इतर सामुग्रीपासून तयार करण्यात येतात. एकूणच या मुखवट्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व असल्याने या कलेचे जतन आणि संवर्धन होणे ही काळाची गरज आहे.
मठांमध्ये कला का वापरली जाते?
सत्र या मठसंस्था धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणांचे केंद्रे म्हणून कार्य करतात. या मठसंस्था श्रीमंत शंकरदेव आणि त्यांच्या शिष्यांनी स्थापन केलेल्या आहेत. सध्या या मठसंस्था पारंपारिक कलांचे केंद्र झाल्या आहेत. बोरगीट (गाणी), सत्रिय (नृत्य) आणि भाओना (नाट्य) यांसारख्या सादरीकरणाच्या कला शंकरदेव परंपरेचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचे सादरीकरण या मठांमध्ये होते. समगुरी, नतुन समागुरी, बिहीमपूर आणि अलेंगी नरसिंह या चार मठांमध्ये मुखवटा तयार करण्याची परंपरा अबाधित आहे. पेटंटसाठीच्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे माजुलीमध्ये २२ सत्र/मठ आहेत.
मुखवटे तयार करणारे
हेमचंद्र गोस्वामी हे समगुरी सत्राचे सत्राधिकारी किंवा प्रशासकीय प्रमुख असून पारंपारिक मुखवटा तयार करण्याच्या कलेचे प्रसिद्ध अभ्यासक आहेत. त्यांच्या मते, हे मुखवटे ऐतिहासिकदृष्ट्या सर्व सत्रांमध्ये तयार केले जात होते, परंतु कालांतराने ही प्रथा हळूहळू नष्ट झाली.“नृत्य, गायन आणि वादन या कला सत्र परंपरेशी जवळून जोडल्या गेल्या आहेत, या परंपरेची सुरुवात आसामचे गुरु श्रीमंत शंकरदेव यांनी केली. श्रीमंत शंकरदेव यांनी १६ व्या शतकात मुखवटे तयार करण्याची कला चिन्ह जत्रेतील नाटकाद्वारे प्रस्थापित केली. प्रतिमांच्या माध्यमातून कथाकथन करणे हा या नाट्याचा हेतू होता. सर्वसामान्यांना कृष्णभक्तीकडे आकर्षित करण्यासाठी श्रीमंत शंकरदेव यांनी त्यांच्या जन्मगावी बतद्रवा येथे नाटक सादर केले होते. या नाटकाच्या सादरीकरणात त्यांनी चारमुखी ब्रह्मा आणि गरुड असे दोन मुखवटे वापरले होते, असे गोस्वामी यांनी नमूद केले आहे. १६६३ साली समगुरी सत्र स्थापन झाल्यापासून ते मुखवटा तयार करण्याची कला जोपासत आहेत.
मुखवट्यांच्या आधुनिकीकरणाची गरज
गोस्वामी यांनी नमूद केल्याप्रमाणे पारंपारिकपणे मुखवटे केवळ नाट्य प्रदर्शनासाठीच केले जात होते. परंतु या कलेच्या संवर्धनासाठी आणि कलाकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पारंपरिक परीघक्षेत्राच्या पलीकडे जाऊन या मुखवट्यांचा वापर करणे आवश्यक आहे. यात प्रमुख कार्यक्रमांमध्ये, सत्कार समारंभांमध्ये छोटे मुखवटे भेट देणे, माजुली येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना हे मुखवटे खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करणे, मुखवट्यांचे प्रदर्शन भरविणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो.
अधिक वाचा: भारताचा ‘झोरावर’ चिनी ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होणार का? काय आहे ‘प्रोजेक्ट झोरावर’?
जीआय टॅगसाठी अर्ज सादर करणाऱ्या एनजीओ ओक्रिस्टीर कोठियाच्या सीईओ बिस्मिता दत्ता यांनी नमूद केले की, कलेची परंपरा जपत मुखवट्याचा आधुनिक वापर हा दीर्घकालीन उद्देश आहे. कलेचे संवर्धन आणि लोकप्रियता वाढविण्यासाठी आम्ही कलाकारांच्या कार्यशाळा घेतल्या. या मास्कची विक्री कलाकारांसाठी एक व्यवहार्य पर्याय म्हणून करायची आहे. जी आय टॅग हा त्याचाच प्रचार करण्याचा एक मार्ग होता. किंबहुना समकालीन प्रतिमांचा वापर करून तरुण वर्गाला या कलेकडे आकर्षित करायचे आहे. या संदर्भात उदाहरण देताना त्या म्हणाल्या, दुर्गा पूजेच्या कालखंडात अनेकजण मुखवट्यांचा वापर करतात, त्यावेळी येथील मुखवटे वापरू शकतो का, याचा विचार करणे गरजेचे आहे.
माजुली हस्तलिखितातील चित्रकलेलाही जी आय टॅग; कशा स्वरूपाची असते ही चित्रकला?
माजुली हस्तलिखितातील चित्रकला १६ व्या शतकात प्रसिद्धीस आली. सांची पटावर किंवा सांचीच्या झाडाच्या सालापासून तयार केलेल्या हस्तलिखितांवर घरगुती शाई वापरून चित्र साकारली जातात. श्रीमंत शंकरदेव यांनी भागवत पुराणातील आद्य दशमाचे आसामीमध्ये प्रतिपादन केले होते. या आसामी रूपांतराच्या हस्तलिखित पोथीत या प्रकारची चित्रकला पाहायला मिळते. या कलेला अहोम राजांनी संरक्षण दिले. माजुलीतील प्रत्येक मठात या कलेचा सराव आजही सुरु आहे.