माणसाची उत्क्रांती माकडापासून झाली हा चार्ल्स डार्विनचा सिद्धान्त. या सिद्धान्तामुळे बरेचदा वादही होतात, मात्र माणूस आणि मर्कट यांच्यात अनेक गुणधर्म समान असतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अनेक आशियाई देशांमध्ये आढळणारा ‘गिबन’ हा कपी वानर अनेकदा माणसासारखेच नृत्य करतो. जर्मनीतील प्राणीशास्त्रज्ञ काई कॅस्पर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गिबनच्या नृत्य वैशिष्ट्यांचा अभ्यास केला असून त्याच्या शैलीदार हालचालींचे विश्लेषण केले आहे. गिबन हा प्राणी कोठे आढळतो, त्याची नृत्यशैली आणि त्यावर कॅस्पर यांनी काय अभ्यास केला आहे याविषयी…

गिबन माकडाची वैशिष्ट्ये काय?

गिबन या मानवसदृश कपीचा समावेश नरवानर गणातील हायलोबेटिडी कुलात होतो. भारतासह बांगलादेश, म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड या देशांमध्ये जंगलातील दाट झाडींमध्ये हे माकड आढळते. भारतामध्ये ईशान्येकडील आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा आणि आसपासच्या नद्यांच्या खोऱ्यांतील वनात गिबन दिसून येते. या प्राण्यात आणि मानवात साम्य असल्यामुळे त्याला ‘मानवसदृश कपी’ असे म्हणतात. चिम्पांझी, गोरिला आणि ओरँगउटान या कपींच्या तुलनेत गिबन आकाराने लहान असतात. त्यांचे हात पायापेक्षा खूपच लांब असतात. केस पिवळसर करडे किंवा काळे असतात. चेहरा काळा पण त्याभोवती पांढरे केस असल्याने गिबनचा चेहरा एखाद्या मुखवट्यासारखा भासतो. झाडाची पाने, फळे किंवा कीटक, पक्ष्यांची अंडी हा त्यांचा आहार असतो.

dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
group of women amazing dance on famous song Dilat Zapuk Zupuk vajta rahtay
“दिलात झापुक झूपूक वाजत राहतय ग” महिलांनी केला जबरदस्त डान्स, VIDEO एकदा पाहाच
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
Musical dance drama Urmilayan Aryans Group of Companies Kamesh Modi
सांगीतिक नृत्यनाट्य ‘ऊर्मिलायन’
The rambunctious bull came straight out of the ring
खतरनाक! उधळलेला बैल थेट कूंपण तोडून बाहेर आला… पुढच्या पाच सेकंदात जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप

हेही वाचा : भारत-बांगलादेश कसोटी मालिकेवर बिघडलेल्या संबंधांचे प्रतिबिंब? पाकिस्तानप्रमाणेच भारतीय संघालाही बांगला खेळाडू चिथावणार का?

गिबन कपी कशा प्रकारे नृत्य करतात?

नृत्य हा सर्व मानवी समाजांद्वारे प्रचलित एक सार्वत्रिक कला प्रकार आहे. शारीरिक अवयव आणि मनाच्या लयबद्ध, उद्देशपूर्ण हालचालींचा वापर करून अमौखिक आणि मुद्रावेशातून संवाद साधण्याची कला म्हणजे नृत्य. नृत्याची उत्क्रांती अज्ञात असली तरी मानवासह काही पक्षी व प्राण्यांमध्ये नृत्य ही कला आढळून येते. गिबन हे माकड त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण नृत्यासाठी ओळखले जाते. गिबन झाडाच्या मोठ्या फांदीवर ताठ उभा राहून चालत जातो. त्यावेळी दोन्ही हात लांब करून तो तोल राखतो. एका फांदीवर उभा राहून खालच्या फांदीवर वैशिष्ट्यपूर्ण लयबद्ध झेप घेतो. रोबोट ज्याप्रमाणे हालचाली करतो, त्याप्रमाणे हालचाली करून गिबन नृत्यप्रदर्शन करतो. विशेषत: नराला आकर्षित करण्यासाठी गिबन मादी नृत्य करते. काही प्राणीतज्ज्ञांनी चीनमधील गुआंग्शी भागातील गिबन माकडाच्या नृत्याचे निरीक्षण केले. गिबन माकडाच्या चार प्रौढ मादींनी लयबद्ध आणि अमौखिक नृत्य प्रदर्शन केल्याचे तज्ज्ञांना आढळले. त्यांच्या हालचाली मानवी नृत्यासारख्याच लयबद्ध व आकर्षक होत्या. गिबन मादी नृत्याचा वापर लैंगिक संबंध जुळवण्यासाठी आणि समूहातील एखाद्या प्रौढ नराशी सामाजिक संबंध वाढविण्यासाठी करतात, असे संशोधकांना आढळले.

हेही वाचा : बुलेटप्रूफ ग्लास ते पॅनिक बटण; अमेरिकेत सुरक्षित मतदानासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत?

जर्मनमधील शास्त्रज्ञांनी काय अभ्यास केला?

जर्मनीतील ड्युसेलडॉर्फ शहरातील हेनरिक हेन विद्यापीठातील प्राणीशास्त्रज्ञ काई कॅस्पर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही गिबनच्या शैलीदार हालचालींचे विश्लेषण केले. मानवी नृत्याची प्रमुख वैशिष्ट्ये गिबनच्या नृत्यातही असल्याचे त्यांना आढळले. प्रायमेट्स या नियतकालिकात प्रकाशित होण्यापूर्वी हे निष्कर्ष ऑनलाइन पोस्ट करण्यात आले. प्राणिसंग्रहालयातील गिबन आरशाला कसा प्रतिसाद देतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना डॉ. कॅस्पर यांना त्यांच्या नृत्याविषयी कुतूहल निर्माण झाले. वानरांनी त्यांच्या प्रतिबिंबांची ओळख दाखवली नाही, परंतु त्यांनी त्यांच्या चाली दाखवल्या. ‘‘गिबन मादीचे शरीर कडक होते आणि मग या रोबोट-नृत्यासारख्या हालचाली सुरू होतात,’’ असे डॉ. कॅस्पर म्हणाले. गिबनच्या अधिक प्रजातींमधील नृत्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. कॅस्पर यांनी पॅरिसमधील जीन निकोड इन्स्टिट्यूट या संस्थेतील प्राइमेटोलॉजिस्ट कॅमिली कोये आणि नृत्य आणि हावभावाचा अभ्यास करणाऱ्या ओस्लो विद्यापीठातील भाषाशास्त्राच्या प्राध्यापिका प्रीती पटेल-ग्रोझ यांच्याबरोबर काम केले. संशोधकांच्या या गटाने क्रेस्टेड गिबन नावाच्या प्रजातींचे निरीक्षण केले. प्राणिसंग्रहालयातील गिबनच्या नृत्याच्या चित्रफिती गोळा केल्या आणि त्यांचे विश्लेषण केले. नृत्य करणाऱ्या गिबन प्रौढ माद्या होत्या आणि त्या सहसा प्रेक्षकांकडे पाठ फिरवून नृत्य करत होत्या. या हालचाली जाणीवपूर्वक होत्या आणि मानव व गिबन नृत्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये सामायिक होती, असे डॉ. कॅस्पर यांनी सांगितले.

sandeep.nalawade@expressindia.com