France mass rape trial: फ्रान्समध्ये काही महिन्यांपूर्वी एक हादरवून सोडणारे प्रकरण चर्चेत आले होते. पत्नीला अमली पदार्थ देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करणे आणि तिच्यावर बलात्कार करण्यासाठी अनेक अनोळखी पुरुषांना बोलावणे, या आरोपांखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. फ्रान्समधील न्यायालयाने या प्रकरणात पीडितेच्या पतीसह इतर ५१ जणांना दोषी ठरवले आहे. त्यांनी नऊ वर्षांहून अधिक काळ तिच्यावर बलात्कार केले. न्यायालयात पती डॉमिनिक याने अमली पदार्थांचे सेवन करून पत्नीवर बलात्कार केल्याचे आणि इतर पुरुषांना बलात्कार करण्यास परवानगी दिल्याचे आरोप कबूल केले. त्याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इतर सर्व ५० आरोपींनाही न्यायालयाने दोषी ठरवले. या ऐतिहासिक प्रकरणाने गेल्या काही महिन्यांत फ्रान्सला हादरवून सोडले आणि जगभर या प्रकरणाची चर्चा सुरू होती. न्यायालयाने या सर्वांना शिक्षा सुनावल्यामुळे या जघन्य गुन्ह्यामागील ७२ वर्षीय डॉमिनिक पेलिकॉट नेमका कोण आहे, याची चर्चा सुरू आहे. हा आरोपी नक्की कोण आहे? त्याने असे कृत्य करण्यामागील नेमके कारण काय? फ्रान्सला हादरवून सोडणारे हे प्रकरण नक्की काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ…

Virat Kohli and Anushka Sharma Will Leave India and Shift To London Soon Says His Childhood Coach Rajkumar Sharma
Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आला तर..”, रहिवाश्यांचा संताप, वैयक्तिक वाद विकोपाला!
ajit pawar on kalyan society scuffle viral video news
Video: “तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला…”, कल्याण मारहाण प्रकरणी अजित पवारांनी विधानसभेत मांडली भूमिका!
Kalyan Crime News
Kalyan Crime : “मराठी माणसं भिकारी, त्यांना मारा”; म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; कल्याणच्या सोसायटीत तुफान राडा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on Kalyan Ajmera Society Dispute
Kalyan Society Dispute: “कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे”, ठाकरे गटाची मागणी!
Assembly elections vidhan sabha Kunbi Maratha Number of Maratha MLA
विधानसभेत मराठा वर्चस्वाला शह; ओबीसींना बळ
Maharashtra Assembly Winter Session Live Updates in Marathi| Maharashtra Hiwali Adhiveshan Live Updates
Maharashtra Assembly Winter Session LIVE Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या बदलीची घोषणा
(एपी फोटो)

आरोपी नक्की आहे कोण?

या संपूर्ण प्रकरणामागे एक व्यक्ती आहे, की तो म्हणजे पीडितेचा पती ७२ वर्षीय डॉमिनिक पेलिकॉट. तो एक माजी इलेक्ट्रिशियन आहे; जो नंतर रिअल इस्टेट व्यवसायात उतरला. न्यायालयात महत्त्वाच्या गोष्टी उघड झाल्या आणि त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे डॉमिनिक पेलिकॉट या आरोपीच्या दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे एक काळजी करणारे आजोबा, वडील आणि पती. जे पत्नी गिसेल यांना १९ वर्षांचे असताना भेटले. या जोडप्याचे मजबूत नाते होते, त्यांना तीन मुले आहेत. न्यायालयात त्याची सकारात्मक बाजूही समोर आली. त्याची दुसरी बाजू म्हणजे त्याचा कुटिल स्वभाव आणि त्याला लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचे असणारे व्यसन. न्यायालयातील तज्ज्ञांनी सांगितले की, हे त्याच्या स्वतःच्या हिंसक बालपणातून उद्भवले. न्यायालयाला मिळालेल्या साक्षीनुसार, पेलिकॉट फ्रान्सच्या मध्यभागी असणाऱ्या एका शहरात मोठा झाला. त्याच्या आईच्या पहिल्या पतीने आईला सोडून दिल्यानंतर, त्यांनी दुसरे लग्न केले आणि त्यांना आणखी दोन मुले झाली. त्यापैकी एक डॉमिनिक होता.

अधिक वाचा: जगातील सर्वांत मोठ्या विमानतळासाठी ‘हा’ देश समुद्रामध्ये तयार करणार कृत्रिम बेट; याची वैशिष्ट्ये काय?

तीन महिन्यांच्या खटल्यादरम्यान, त्याने एकदा साक्ष दिली, “प्रत्येक माणसामध्ये एक राक्षस असतो आणि माझ्या लहानपणापासून तो माझ्यात आहे.” त्याने त्याच्या वडिलांनी आपल्या आईवर बलात्कार आणि तिचा अपमान केल्याच्या घटनांचे वर्णन केले. त्याचे वकील बीट्रिस झवारो यांनी असा युक्तिवाद केला की, डॉमिनिकच्या मनावर अनेक आघात झाले आहेत. त्याच्यावर पहिला बलात्कार तो नऊ वर्षांचा झाला होता. दुसरे म्हणजे तो एक इलेक्ट्रिशियन होता, जेव्हा बांधकाम साईटवर काम करत होता. त्यादरम्यान त्याला सामूहिक बलात्कारात भाग घेण्यास भाग पाडले गेले होते. त्याला लग्न करायचे होते आणि जोडीदाराची अदलाबदल करायची होती, असेही त्याने न्यायालयाला सांगितले. मात्र, त्याची पत्नी गिसेलने नकार दिला. त्याच्या तारुण्याच्या काळातील तो नकार, लैंगिक शोषण यामुळे तो चुकीच्या वर्तनांमध्ये गुंतत गेला.

सामूहिक बलात्कार प्रकरण काय?

२०११ मध्ये डॉमिनिकने ‘Coco.fr’ नावाच्या फोरमवर पत्नीच्या परवानगीशिवाय फोरमवरील पुरुषांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. ‘Coco.fr’ ही लैंगिक हिंसाचाराचा गौरव करणारी आणि अनेक चॅटरूम होस्ट करणारी वेबसाइट आहे. तपासानुसार, या फोरमवरच त्याने दुसऱ्या वापरकर्त्याकडून आपल्या पत्नीला स्वतःच्या लैंगिक सुखासाठी अमली पदार्थ कसे द्यावेत, हे शिकून घेतले आणि नंतर फोरमवरून पुरुषांना बोलावण्यास सुरुवात केली. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, डॉमिनिक पुरुषांशी आधी संपर्क साधायचा आणि नंतर स्काईपवर वैयक्तिक चॅटवर बोलायचा. तो फोरमवर पत्नीला अमली पदार्थ दिल्यानंतर तिचे फोटो पाठवायचा आणि नंतर सर्व वयोगटांतील व व्यवसायांतील पुरुषांना बोलवायचा. आरोपी व्यक्तींमधील सर्वांत तरुण आता २७ वर्षांचा आहे आणि सर्वांत मोठा पुरुष ७४ वर्षांचा आहे. काही संदेशांमध्ये, अनेक पुरुषांनी डॉमिनिक जे करत होता, त्याबद्दल त्याचे कौतुक केले.

अधिक वाचा: भाजपाच्या पूर्वसुरींनी खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जाळला होता का? जयराम रमेश यांनी भाजपावर काय आरोप केले?

तो घरी येणाऱ्या परपुरुषांना त्याच्या संदेशांमध्ये, घराजवळ गाडी पार्क न करण्याची सूचना द्यायचा. पत्नी गिसेलला वास येऊ नये म्हणून त्यांना कोणताही सुगंध लावून न येण्याची सूचना दिली जायची. त्यानंतर तो चित्रीकरणदेखील करायचा, जे आता पुराव्याच्या स्वरूपात न्यायालयात दाखवले गेले. प्रत्येक चित्रफितीत तिला कुठलेही भान नसल्याचे स्पष्ट दिसले. चित्रीकरण करताना, डॉमिनिकला अनेकदा त्याची पत्नी गिसेलबद्दल अपमानास्पद टिप्पण्या करताना ऐकले जाऊ शकते. नर्स, पत्रकार, शिपाई, संगणक तज्ज्ञ, शेतकामगार, ट्रकचालक आणि दुकानातील कामगारांसह एकूण ५० पुरुषांचा या जघन्य गुन्ह्यात सहभाग आहे. सुमारे नऊ वर्षे हा प्रकार असाच सुरू होता. याहून भयावह बाब म्हणजे पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की, डॉमिनिकने त्याच्या घरात कॅमेरे लपवले, आपल्या मुलाच्या बायकांचे त्यांच्या बाथरूममध्ये किंवा घरात चित्रीकरण केले आणि ती छायाचित्रे ऑनलाइन शेअर केली. त्याने आपल्या प्रौढ मुलीचा अर्धनग्न झोपलेला फोटोदेखील काढला, तिलाही अमली पदार्थ दिले गेले आणि तिचा गैरवापर केला गेला असाव, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, आरोपीने न्यायालयात त्याबाबत नकार दिला.

(रॉयटर्स फोटो)

या प्रकरणात गुंतलेल्या इतरांचे काय?

डॉमिनिकने आपला गुन्हा स्वीकारला आहे आणि सोमवारी (१६ डिसेंबर) न्यायालयात म्हटले आहे, “मी जे केले, त्याबद्दल मला पश्चात्ताप होतो. माझ्या कुटुंबाला जो त्रास झाला, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो.” इतर ५० पुरुषांनीदेखील, ज्यांची चाचणी सुरू आहे अशा काहींनी आपला गुन्हा मान्य केला आहे; त्यापैकी सुमारे १५ जणांनी गिसेलची माफी मागितली आहे. दक्षिण फ्रान्समधील माझान शहरातील पेलिकॉट कुटुंबाच्या घरी सहा वेळा गेलेला आणखी एक आरोपी जेरोम व्ही. म्हणाला की, त्याला काहीही शिक्षा दिली गेली तरी तो पीडित व्यक्तीच्या सन्मानार्थ अपील करणार नाही. तिला सहन करण्याची गरज नाही; परंतु एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे गिसेल पेलिकॉटबरोबर तिच्या पतीने तिच्याबरोबर जे काही केले होते, त्या भयावहतेशी जगावे लागेल.

Story img Loader