जागतिक मंदी हा केवळ शब्द नाही तर ती एक भावना आहे. ही भावना माणसाला चिंताग्रस्त करते. आगामी काळात स्वत:च्या आणि कुटुंबाच्या व्यावसायिक आणि आर्थिक सुरक्षेचा विचार करून तुम्ही नैराश्याच्या गर्तेतही जाऊ शकता. सध्याची जागतिक परिस्थिती लक्षात घेता, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जागतिक व्यापार आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. तर अमेरिका गेल्या ४० वर्षांतील सर्वात भीषण महागाईच्या संकटाचा सामना करत आहे. ब्रिटनमधील महागाई दरही ४१ वर्षांतील उच्चांकावर पोहोचली आहे. दुसरीकडे, चीनलाही चलनवाढीचा सामना करावा लागत आहे. जपानची अर्थव्यवस्थाही कोलमडताना दिसत आहे.
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या देशांची ही अवस्था पाहता जगभरात आर्थिक मंदी येण्याचे संकेत दिसत आहेत. आर्थिक मंदीचा सर्वाधिक परिणाम तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या व्यावसायिक आणि आर्थिक बाबींवर होऊ शकतो. त्यामुळे अशा अनपेक्षित संकटापासून वाचण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेली सात धोरणं जाणून घेणं क्रमप्राप्त ठरतं. आर्थिक मंदीत कमीत कमी नुकसान व्हावं आणि अशा संकटाला यशस्वीरित्या तोंड देता यावं, यासाठी काय खबरदारी घ्यावी? याचा सविस्तर आढावा आपण या लेखातून घेणार आहोत…
आर्थिक मंदीची धास्ती घेऊ नका
मंदी हा आर्थिक चक्राचा एक भाग असतो. ज्याचा अर्थव्यवस्थेवर काही वर्षे प्रभाव राहतो. आर्थिक मंदी अपरिहार्य असल्याने, आपण शांत राहून वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींचा ताण घेण्याऐवजी नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी प्रभावी मार्ग शोधणे महत्त्वाचे आहे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी पैशांची बचत करा
खरं तर, वाईटातील वाईट दिवसासाठी आपण तयार राहणं नेहमीच फायदेशीर असतं. कारण कठीण काळ तुमची सर्व बाजूंनी परीक्षा घेत असतो. जागतिक मंदीच्या काळात तुम्हाला नेमक्या कोणत्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, हे कोणीही सांगू शकत नाही.
वेतन कपात किंवा नोकरी गमावण्यापासून ते वैद्यकीय गरज अशा विविध रुपात तुमच्यावर आपत्कालीन संकट ओढावू शकतं. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती विम्याद्वारे संरक्षित केली जाऊ शकते. परंतु इतर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला किमान सहा महिने पुरतील इतके पैसे आपत्कालीन निधीत असणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही आर्थिक टंचाईचा सामना न करता किंवा कर्जाच्या कचाट्यात न अडकता सहजपणे आर्थिक परिस्थितीला तोंड देऊ शकता.
कर्जाची परतफेड करण्यास प्राधान्य द्या
आर्थिक मंदीच्या तोंडावर तुमच्यावरील विद्यमान कर्जाची शक्य तितक्या लवकर परतफेड करावी. यामुळे तुमची व्याजाची रक्कम वाचू शकेल. पूर्णपणे कर्जमुक्त होणं आवश्यक आहे. विशेषत: क्रेडिट कार्ड बिल, वैयक्तिक कर्ज, सावकारांकडून उच्च व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी. अशा उच्च व्याजदराच्या कर्जाची परतफेड केल्याने तुमचा नियमित ईएमआयचा ताण दूर होईल. कर्जाचे हफ्ते चुकवल्यास तुमच्या CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
दोन बजेट तयार करा
अर्थसंकल्प किंवा बजेट ही संकल्पना आपल्याला काहीशी क्लिष्ट वाटत असली तरी निःसंशयपणे आपलं आर्थिक उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणूक व्यवस्थापित करण्यासाठी हा सर्वोत्तम आणि अत्यंत प्रभावी मार्ग आहे. आपली आर्थिक समीकरणं व्यवस्थापित करण्यासाठी अर्थसंकल्पाची मदत होते. पहिलं बजेट हे आपल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीसाठी तयार करावं. भविष्यातील जागतिक मंदीच्या कालावधीसाठी दुसरं बजेट तयार करणं आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीवर जागतिक मंदीचा थेट परिणाम होत असतो. या काळात वेतन कपात, नोकऱ्या कपात, जीवनावश्यक वस्तूंच्या फुगलेल्या किमती आदि संकटांचा सामना करावा लागू शकतो. अशा अनपेक्षित संकटाचा सामना करण्यासाठी दोन बजेट तयार करणं आवश्यक आहे.
गुंतवणुकीत विविधता आणा
तुमचं संपूर्ण भांडवल किंवा भांडवलाचा मोठा भाग एकाच क्षेत्रात गुंतवू नका. यामुळे जोखीम वाढते. एकाच विशिष्ट क्षेत्रात गुंतवणूक केल्याने तुमचं लक्षणीय नुकसान होण्याव्यतिरिक्त तुम्हाला संपूर्ण भांडवल गमवायला लागू शकते. त्यामुळे गुंतवणुकीत विविधता आणून आपलं भांडवलं कमी जोखमीच्या विविध क्षेत्रात गुंतवणे नेहमीच फायदेशीर ठरते. उदा., इक्विटी, FD, सोने, रिअल इस्टेट, फार्मास्युटिकल्स, ऑटोमोबाईल्स आदि क्षेत्रात वैविध्यपूर्ण पद्धतीने गुंतवणूक करायला हवी.
विमाधारक व्हा
आपत्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकते. त्यामुळे आपण वैद्यकीय, अपघात, चोरी, आग, मृत्यू किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी विमा काढला पाहिजे. यामुळे आपण आपल्या बचतीचा मोठा भाग गमावण्यापासून वाचू शकतो. विमा पॉलिसी घेताना, कव्हरेजची रक्कम, प्रीमियम, मुदत आणि कर लाभ आदि महत्त्वाच्या सर्व अटींचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा- विश्लेषण : आर्थिक मंदी म्हणजे काय? कोणताही देश आर्थिक मंदी कधी जाहीर करतो? कोणते घटक ठरतात कारणीभूत
तुमची कौशल्ये वाढवा आणि उत्पन्नाचा दुसरा पर्याय शोधा
जागतिक मंदी हा सर्वात अनपेक्षित काळ मानला जातो. या काळात सर्वात प्रतिभावान आणि कठोर परिश्रम करणार्या कर्मचार्यांनाही वेतन कपात किंवा नोकरी गमावण्याचे परिणाम भोगावे लागतात. सध्या असं मानलं जातं आहे की, जगभरातील जवळपास ७५ दशलक्ष लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. ट्विटर, मेटा (फेसबूक), अॅमेझॉन आणि गूगलने अलीकडेच हजारो लोकांना कामावरून काढून टाकलं आहे. तुमची कंपनी तुम्हाला कधी कामावरून काढून टाकेल, हेही तुम्हाला कळत नाही. त्यामुळे आपण कौशल्ये वाढवण्यावर भर द्यायला हवा. शिवाय उत्पन्नाचा दुसरा पर्याय शोधणंही तितकेच आवश्यक आहे.