गेल्या काही महिन्यांपासून गोव्याचे पर्यटन चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट्सने गोव्याकडे पर्यटकांचा ओघ कमी होत असल्याचा दावा केला आहे. पोस्ट्समुळे राज्याच्या पर्यटन पायाभूत सुविधांवर टीकेची झोड उठली आहे आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांचा प्रवासाचा नकारात्मक अनुभव शेअर केला आहे. काहींनी सार्वजनिक वाहतुकीचा अभाव आणि स्थानिक टॅक्सी माफियांची मक्तेदारी याला दोष दिला; तर काहींनी सांगितले की, वाढता उड्डाण खर्च आणि वाढत्या हॉटेलच्या किमतींमुळे गोव्याविषयीची मोहकता कमी झाली आहे आणि प्रवासी आता थायलंड, व्हिएतनाम किंवा श्रीलंका यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्थळांना प्राधान्य देत आहेत. त्यांच्यानुसार, हे पर्यटन स्थळ स्वस्त आहे.

प्रत्युत्तरादाखल गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सविरुद्ध टीका केली आहे आणि दावा केला आहे की, गोव्याची प्रतिमा खराब करण्यासाठी काहींना पैसे दिले गेले आहेत. ते म्हणाले की, इन्फ्लुएन्सर्सनी गेल्या तिमाहीत राज्याची बदनामी करण्यासाठी मोहीम चालवली आणि पर्यटकांची संख्या कमी झाल्याचा खोटा प्रचार केला. नेमके हे प्रकरण काय? गोव्याकडे खरंच पर्यटक पाठ फिरवत आहेत का? गोवा सरकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समधील वादाचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.

Champions Trophy 2025: Indian Team Announced for Champions Trophy
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर! उपकर्णधारपदी ‘या’ युवा खेळाडूची लागली वर्णी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
IITian Baba Abhay Singh
IIT मधून शिकलेले बाबा महाकुंभ सोडून गेले? की त्यांना जायला भाग पाडलं? स्वतःच माहिती देताना म्हणाले…
Stray dog killing Morocco
मोरोक्कोमध्ये ३० लाख भटके कुत्रे मारले जाणार, कारण ऐकून हैराण व्हाल
Anjali Damania
Anjali Damania : “धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या”, अंजली दमानियांनी जोडला आणखी एक पुरावा; म्हणाल्या…
Heart disease risk factors rise in young adults
अभिनेता सुदीप पांडेचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पण तरुणांनाच या आजाराचा अधिक धोका का? हृदयरोगतज्ज्ञांनी सांगितले कारण
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Sharad Pawar Saif Ali Khan
“सैफच्या मुलाचाच बळी जाणार होता, पण…”, शरद पवार गटातील आमदाराचा मोठा दावा; म्हणाले, “सत्य सांगायला…”
सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट्सने गोव्याकडे पर्यटकांचा ओघ कमी होत असल्याचा दावा केला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : चंद्राचा समावेश धोक्यातल्या वारसास्थळांच्या यादीत? काय झालंय नेमकं?

वादाची सुरुवात

एक उद्योजक रामानुज मुखर्जी यांनी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत म्हटले की, विदेशी पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवत आहेत. त्यानंतरच या वादाची सुरुवात झाली आहे. “२०१९ आणि २०२३ ची तुलना केल्यास, दरवर्षी गोव्याला भेट देणाऱ्या रशियन आणि ब्रिटीश नागरिकांनी श्रीलंकेची निवड केली. मात्र, भारतीय पर्यटक अजूनही भेट देत आहेत. परदेशात तुलनेने बरीच स्वस्त ठिकाणे आहेत, त्यामुळे भारतीय पर्यटकही परदेशाकडे वळण्याची शक्यता आहे,” असे गोव्याला परदेशी पर्यटक कमी होत आहेत असा दावा करणाऱ्या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे. या पोस्टमुळे अनेकांनी आपलेही अनुभव शेअर केले आहेत; ज्यामुळे हा वाद आणखी वाढत चालला आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या टीकेला सरकारने काय उत्तर दिले?

पर्यटन विभागाने यावर निंदा व्यक्त केली आणि म्हटले की, भारतातील एखाद्या राज्याची दुसऱ्या देशाशी तुलना करणे चुकीचा दृष्टिकोन निर्माण करू शकते. गोव्यात टॅक्सी, मर्यादित हवाई कनेक्टिव्हिटी संबंधित काही आव्हाने आहेत. परंतु, जेव्हा फ्लाइट आणि हॉटेल भाड्याचा प्रश्न येतो, तेव्हा ते इतर पर्यटन स्थळांसारख्या बाजार शक्तीद्वारे चालवले जात असल्याचे म्हटले आहे. गोव्याची प्रतिमा खराब करण्यामागे छुपा अजेंडा असल्याचा दावा करून सोशल मीडियावर खोटा डेटा प्रसारित केल्याबद्दल उद्योजकाविरूद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नोव्हेंबरमध्ये ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत पर्यटन मंत्री रोहन खौंटे म्हणाले, “देश आणि राज्याशी खेळणाऱ्या व्यक्तीबद्दल आपण सहानुभूती बाळगली पाहिजे का? तुम्ही कल्पना करू शकता की कोणीतरी चिनी डेटा प्रसारित करत आहे आणि भारतीय त्याबद्दल बोलत आहेत? पीक टूरिस्ट सीझनच्या सुरुवातीला आलेल्या या सोशल मीडिया पोस्टचा हेतू गेल्या वर्षी घडलेल्या प्रकारासारखाच आहे. ही एक पद्धतशीर योजना असल्याचे दिसते,” असे त्यांनी सांगितले. अलीकडेच काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने गोव्यातील पर्यटन हंगामात रस्ते रिकामे आहेत, असे चित्र शेअर केल्याने वाद पुन्हा पेटला. सोमवारी, विभागाने गेल्या दोन वर्षातील पर्यटकांच्या संख्येची आकडेवारी सामायिक केली आणि म्हटले की, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या प्रचाराचा कोणताही परिणाम झाला नाही आणि गोवा हे पर्यटकांसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे.

गेल्या काही महिन्यांपासून गोव्याचे पर्यटन चर्चेत आले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

पर्यटनाच्या सद्यस्थितीबद्दल आकडेवारी काय सांगते?

या आठवड्यात सरकारने सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये एकूण १.०४ कोटी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली, २०२३ मध्ये हा आकडा ८६.२८ लाख होता. २०२३ मधील देशातील ८१.७५ लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली, तर २०२४ मध्ये पर्यटकांचा हा आकडा ९९.४१ लाखांवर पोहोचला. त्यात २२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. विदेशी पर्यटकांची संख्या २०२३ मध्ये ४.५२ लाख होती, जी २०२४ मध्ये ४.६७ लाख होती. डिसेंबर २०२४ मध्ये गोव्याच्या दाबोलीम विमानतळाने मागील वर्षीच्या त्या महिन्यातील आकडेवारीच्या तुलनेत प्रवाशांच्या आगमनात २७ टक्क्यांची वाढ नोंदवली.

पर्यटन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये जेव्हा महामारीचा फटका बसला, तेव्हा ३.०३ लाख परदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. २०२१ मध्ये दुसऱ्या कोविड लाटेदरम्यान केवळ २२,००० परदेशी पर्यटकांनी भेट दिली, तर २०२२ मध्ये ही संख्या १.७५ लाखांवर पोहोचली. २०१८ मध्ये ९.३४ लाखांहून अधिक परदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती, त्यानंतर २०१९ मध्ये ९.३७ लाख पर्यटकांची नोंद करण्यात आली होती. २०२२ मध्ये देशातील ७० लाखांहून अधिक पर्यटकांनी गोव्याला भेट दिली, २०१८ च्या तुलनेत हा आकडा किरकोळ कमी होता. २०१८ मध्ये देशभरातून ७०.८ लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती.

सरकारने म्हटले आहे की, आकडेवारी असे सूचित करते की, देशांतर्गत पर्यटन विक्रमी उच्च पातळीवर आहे तर परदेशी पर्यटन पुनर्प्राप्तीची चिन्हे दर्शवित आहे. राज्याच्या म्हणण्यानुसार, जरी पश्चिम आशिया आणि रशिया-युक्रेनमधील संघर्षांचा आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या ओघावर परिणाम झाला असला तरी अलीकडच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, गोव्याची वाढ राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सने काय प्रतिक्रिया दिली?

नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पर्यटन मंत्री खौंटे म्हणाले की, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अनेकदा “मोफत जेवण किंवा मोफत मुक्कामाची मागणी करतात. कदाचित गोव्याचा हॅशटॅग म्हणून वापर करून ते प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, आकडेवारी सर्व चित्र स्पष्ट करेल. जे मुद्दे उचलून धरण्यात आले त्यावर आम्ही काम करूच, पण ज्या पद्धतीने हा मुद्दा उचलून धरण्यात आला त्याचा संयुक्तपणे निषेध करण्याची गरज आहे. प्रत्येक पर्यटन स्थळाला आव्हाने असतात,” असे ते म्हणाले.

डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आणि कार्यकर्ती दीपिका नारायण भारद्वाज यांची ‘एक्स’वरील पोस्ट नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला व्हायरल झाली होती. त्या म्हणाल्या, “मी टाकलेली पोस्ट कोणत्याही टूलकिटचा भाग नव्हती. जे लोक त्यांचे प्रामाणिक मत व्यक्त करतात त्यांना पैसे दिले जातात, असा टोमणा मारणे मूर्खपणाचे आहे. पोस्टला प्रतिसाद म्हणून हजारो लोकांनी अशाच गोष्टी शेअर केल्या. मी गोव्याची हितचिंतक आहे आणि ते एक सुंदर ठिकाण आहे. परंतु, पुरेशा वाहतुकीचा अभाव हा पर्यटकांसाठी मोठा चिंतेचा विषय आहे. जर गोष्टी चुकीच्या होत असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत.”

हेही वाचा : ‘FBI’ने गुजराती तरुणावर ठेवले दोन कोटींचे बक्षीस; ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीतील भद्रेशकुमार पटेल कोण आहे?

सरकारने गोव्यातील काही इन्फ्लुएन्सर्सनादेखील पॅनेलमध्ये समाविष्ट केले आहे. त्यांना वास्तविक चित्र सामायिक करण्यासाठी आणि चुकीच्या माहितीचा प्रतिकार करण्यासाठी नियोजित मोहिमा आखण्याचे आवाहन केले आहे. गोव्यातील एका प्रभावशाली व्यक्तीने नाव न सांगण्याची विनंती केली आणि सांगितले, सोशल मीडिया समज निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावते. हा मुद्दा सूक्ष्म आहे. विश्वासार्ह आणि योग्य माहिती सामायिक करण्याची सामाजिक जबाबदारीदेखील इन्फ्लुएन्सर्सची आहे. त्याचवेळी सरकारने षड्यंत्र न मानता समस्या मान्य कराव्यात. गोव्यातील वाहतूक, कचरा व्यवस्थापन, कचऱ्याची विल्हेवाट या समस्या आहेत, ज्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.”

Story img Loader