सध्या ग्रीसमध्ये धनगरांसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. देशात ‘गोट प्लेग’ (goat plague) नावाचा संसर्ग पसरला आणि त्यामुळे देशातील पाळीव शेळ्या-मेंढ्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. ‘गोट प्लेग’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, देशातील शेळ्या आणि मेंढ्यांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. थोडक्यात, त्यांच्या वावरण्यावर पूर्णत: बंदी घालण्यात आल्याचे कृषी मंत्रालयाने जाहीर केले आहे. या विषाणूला औपचारिकपणे पेस्टे डेस पेटिट्स रुमिनंट्स (Peste des Petits Ruminants -PPR) म्हणून ओळखले जाते. या विषाणूचा मानवावर काही परिणाम होत नाही; मात्र तो शेळ्या-मेंढ्यांसाठी जीवघेणा ठरतो. संक्रमित झालेल्या शेळ्यांपैकी ८० ते १०० टक्के शेळ्या या विषाणूच्या संसर्गामुळे मरण पावतात, असे आकडेवारी सांगते. या जुलै महिन्याच्या सुरुवातीला ग्रीसमध्ये हा उद्रेक आढळून आला आणि मध्य ग्रीसमध्ये हजारो प्राणी या ‘गोट प्लेग’च्या प्रादुर्भावाने मरण पावले आहेत. त्यामुळे हा आजार आणखी पसरण्याची भीती ग्रीसला वाटत आहे. मात्र, हा रोग नेमका आहे तरी काय आणि त्याचा ग्रीसवर काय परिणाम होत आहे, ते पाहूयात.

हेही वाचा : रशियाचा ना झेंडा, ना राष्ट्रगीत! जाणून घ्या ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंनी स्वतंत्रपणे सहभागी होण्यामागचा इतिहास

gondia tiger latest news in marathi
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tiger killed laborer harvesting bamboo in Ballarpur forest
चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार; मृतदेहाजवळ सहा तास ठिय्या…
gondia tiger death loksatta
गोंदिया : ‘टी १४ वाघिनी’च्या बछड्याच्या मृत्यू, ‘इन्फेक्शन’, निष्काळजीपणा की…
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
avian flu transmission to humans
विश्लेषण : ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) माणसांसह वाघांनाही धोकादायक? 
Cases of sudden hair loss in Shegaon taluka increased again
शेगावातील केसगळतीची रुग्णसंख्या १४९ वर, भयाची व्याप्ती वाढली
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री

‘गोट प्लेग’ची सुरुवात कुठून झाली?

१९४२ साली पश्चिम आफ्रिकेतील कोट डी’आयवरमध्ये ‘गोट प्लेग’चा पेस्टे डेस पेटिट्स रुमिनंट्स हा विषाणू सापडल्याची नोंद सर्वांत आधी झाली आहे. तेव्हापासून हा रोग जागतिक स्तरावर आफ्रिका, मध्य पूर्व, आशिया आणि युरोपमधील मोठ्या प्रदेशांमध्ये पसरला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मते, सध्या ७० पेक्षा जास्त देश या विषाणूमुळे प्रभावित आहेत किंवा त्यांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. सर्वाधिक जोखीम असणाऱ्या देशांमध्ये सुमारे १.७ अब्ज मेंढ्या आणि शेळ्या आहेत. विशेष म्हणजे ही संख्या मेंढ्या आणि शेळ्यांच्या जगातील एकूण संख्येच्या सुमारे ८० टक्के इतकी आहे. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थच्या (डब्ल्यूओएएच) मते, हा विषाणू शेळ्या-मेंढ्यांच्या एकमेकांच्या जवळच्या संपर्कातून प्रसारित होतो. त्यामुळे शेळ्या आणि मेंढ्यांना एकत्र बंदिवासात ठेवल्यामुळे या संसर्गाचा उद्रेक होण्याची शक्यता अधिक वाढते. आजारी जनावरांच्या शरीरातून बाहेर पडणारे स्राव आणि त्यांच्यातील उत्सर्जनामुळे इतर प्राण्यांमध्येही हा संसर्ग पसरतो.

‘गोट प्लेग’च्या उद्रेकाशी ग्रीस कशा प्रकारे लढा देतोय?

ग्रीसमध्ये ११ जुलै रोजी पहिल्यांदा हा विषाणू आढळून आला होता. हा विषाणू ग्रीसच्या मध्य थेसली प्रदेशात सापडला होता; तेव्हापासून तो लॅरिसा प्रदेशातही पसरला आहे. दक्षिण भागातील करिंथमध्येही त्याचा प्रसार झाला आहे. ग्रीसमधील कृषी अधिकाऱ्यांना या भागात या संसर्गाची नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. कृषी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी जॉर्जिओस स्ट्रॅटकोस यांनी ‘रॉयटर्स’ला दिलेल्या माहितीनुसार, हा संसर्ग इतर प्राण्यांमध्ये पसरू नये या सावधगिरीच्या दृष्टिकोनातून थेसलीमध्ये या संसर्गाला बळी पडलेल्या सुमारे आठ हजार प्राण्यांना आधीच ठार करण्यात आले आहे. प्रादेशिक गव्हर्नर दिमित्रीस कोरेटास यांनी सांगितले की, या आठवड्याच्या शेवटी संसर्गाला बळी पडलेल्या आणखी १,२०० प्राण्यांनाही याच प्रकारे मारण्यात येईल.

युरोपियन युनियनच्या प्रोटोकॉलनुसार, प्राण्यांमध्ये तीव्र गतीने होत असलेला हा प्रसार रोखण्यासाठी संसर्गाचे एक प्रकरण आढळल्यानंतर संपूर्ण कळपाचा नाश करणे आवश्यक मानले जाते. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थने (WOAH) प्राण्यांना हा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यात कोणती लक्षणे दिसून येतात, याबाबतची माहिती दिली आहे. या लक्षणांमध्ये प्राण्यांना प्रामुख्याने ताप येणे आणि डोळे व नाकातून स्राव वाहणे यांचा समावेश आहे. जनावरांना खोकला येतो आणि त्यांचा श्वासोच्छवासही दुर्गंधीयुक्त होतो. त्यांना अतिसाराच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. या तीव्र लक्षणांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढते. या संसर्गामुळे बाधित झालेल्या प्राण्यांच्या जगण्याची शक्यता अत्यंत धूसर असते. या संसर्गाचा अधिक प्रसार रोखण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना संपूर्ण बाधित शेताचे निर्जंतुकीकरण करावे लागते. तसेच, पुढील उद्रेक टाळण्यासाठी जवळपासच्या भागातील जनावरांचीही चाचणी करावी लागते. स्ट्रॅटकोस यांच्या मते, संसर्गजन्य विषाणूची बाधा झाली आहे का, हे तपासण्यासाठी अधिकाधिक प्राण्यांची चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ग्रीसच्या मध्य प्रदेशातील दोन लाखांहून अधिक प्राण्यांची चाचणी करण्यात आली आहे. या आठवड्यात नवी प्रकरणे आढळून आल्यानंतर कृषी मंत्रालयाने मेंढ्या आणि शेळ्यांच्या हालचालींवर बंदी घातली आहे. अगदी शेळ्या-मेंढ्यांचे प्रजनन आणि कत्तल यांवरही ही बंदी लागू आहे. संपूर्ण ग्रीसमध्ये ही बंदी लागू करण्यात आली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे, “संपूर्ण देशभरात सुरक्षा उपाय कडक करण्यावर भर दिला जात असून, प्रतिबंधात्मक कारणांसाठी हे आवश्यक आहे. या संसर्गाचा प्रसार मर्यादित करणे आणि रोगाचे उच्चाटन करणे हे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.”

स्थानिक अधिकाऱ्यांसह तातडीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत; तसेच या उद्रेकामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी परदेशातून एखादी संशयास्पद गोष्ट आयात झाल्यामुळे हा उद्रेक झाला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. अद्याप तरी या आजारावर कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. मात्र, उपलब्ध लसच हा रोग प्रतिबंधित करण्यात मदत करू शकते.

हेही वाचा : ऑलिम्पिक खेळाडू ज्वाला गुट्टाची नाराजीची पोस्ट; उद्घाटन सोहळ्यातील टीम इंडियाच्या कपड्यांवरुन वाद का होतोय?

या प्रादुर्भावाचा काय परिणाम झालाय?

युरोपमधील शेळ्यांपैकी ग्रीसमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात शेळ्या आढळून येतात. त्यामुळे या उद्रेकाचा ग्रीसवर खोल परिणाम झाला आहे. २०२० च्या युरोपियन युनियनच्या कृषी, वनीकरण व मत्स्यपालन विभागाच्या अहवालानुसार, ग्रीसमध्ये सुमारे ३६,२५,००० शेळ्या आहेत. फेटा चीज हा पदार्थ ग्रीसची ओळख असल्याचे मानले जाते. या चीजच्या उत्पादनासाठी शेळ्यांचे पालन महत्त्वपूर्ण ठरते. ग्रीसची अर्थव्यवस्था फेटा चीजचे उत्पादन आणि त्याची विक्री यांवर मोठ्या प्रमाणावर उभी आहे. ७० टक्के मेंढ्या आणि किमान ३० टक्के शेळीच्या दुधापासून फेटा चीजची निर्मिती केली जाते. त्यामुळे या उत्पादनासाठी शेळ्या-मेंढ्यांचे पालन महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर या संसर्गाचा उद्रेक ग्रीससाठी खूपच चिंताजनक बाब आहे. फेटा चीजला जगभरात मागणी असल्यामुळे तिची प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. अलाईड मार्केट रिसर्चच्या अभ्यासानुसार, २०२२ मध्ये ग्रीसने १,२७,००० टन फेटा चीजपैकी ६५ टक्क्यांपेक्षा जास्त फेटा चीजची निर्यात केली आहे. ६५८ दशलक्ष डॉलर्सचे विक्रमी उत्पादन निर्यात करण्यात देशाला यश मिळाले आहे. वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थच्या (WOAH) मतानुसार, गोट प्लेगमुळे वार्षिक जवळपास २.१ बिलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. त्याशिवाय या प्रादुर्भावामुळे पशुधनावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची उपजीविका, अन्न सुरक्षा आणि रोजगारदेखील धोक्यात आला आहे.

Story img Loader