युजर्ससाठी Gemini Advanced लाँच केल्यानंतर Google ने आता त्याचे पुढील जनरेशन AI मॉडेल जेमिनी १.५ ची घोषणा केली आहे. जेमिनीची नवीन आवृत्ती कामगिरीच्या बाबतीत खूपच पुढे आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या मते, जेमिनी १.५ आवृत्ती लांब कोडिंग सेशन्स, मजकूर सारांश, प्रतिमा इत्यादी अनेक कार्ये हाताळण्यास सक्षम आहे. जेमिनी १.५ हे मध्यम आकाराचे मल्टिमॉडल असून, ते जेमिनी १.० प्रो आणि जेमिनी १.० अल्ट्रासारखेच आहे.
जेमिनी १.५ मॉडेलमध्ये काय आहे विशेष?
Google च्या जेमिनी १.५ ने नव्या ‘तज्ज्ञांच्या मिश्रणा'(Mixture of Experts)चे स्थापत्य सादर केले आहे, जे AI मॉडेल्सना अधिक सक्षम बनवते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास Google ने अतिशय कठीण कार्ये सहजतेने, दीर्घ तासांचे कोडिंग, इमेज प्रोसेसिंग यांसारखी अनेक कठीण कामे करण्यासाठी डिझाइन आणि प्रशिक्षण जेमिनी १. ५ ला दिले आहे. जेमिनी १.५ प्रो १ दशलक्ष टोकन्स तयार करू शकते, असंही गुगलचे म्हणणे आहे. यामुळे हे नवीन मॉडेल त्याच्या जुन्या आवृत्तीपेक्षा त्याच्या मेमरीमध्ये अधिक गोष्टी लक्षात ठेवू शकते. कंपनीच्या मते, जेमिनी १.५ प्रो हे जेमिनी १.० अल्ट्रा सारखेच चांगले आहे.
या नवीन मॉडेलमधील एक प्रमुख अपडेट म्हणजे सुरक्षिततेचे नियम आहेत. ते शक्तिशाली AI मॉडेल्सशी संबंधित जोखमींकडे सतत लक्ष देत आहे आणि त्यामुळे संभाव्य हानी टाळण्यासाठी नवीन फिल्टर सादर केले आहेत, असंही Google ने म्हटले आहे. Google चे CEO सुंदर पिचाई यांनी त्यांच्या अधिकृत X खात्याद्वारे जेमिनी १.५ ची घोषणा केली आहे. आपल्या पोस्टमध्ये वर नमूद केलेल्या या सर्व वैशिष्ट्यांची माहिती देताना त्यांनी लिहिले की, डिसेंबरमध्ये आम्ही जेमिनी १.० प्रो लॉन्च केले आणि आज आम्ही जेमिनी १.५ प्रो लॉन्च करीत आहोत.
जेमिनी १.५ प्रोचा विचार केल्यास पूर्वीच्या गुगल एआय मॉडेलच्या तुलनेत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय आहे. जेमिनी १.५ प्रोची सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे माहितीवर सतत दहा लाख टोकन्सपर्यंत प्रक्रिया करण्याची त्याची क्षमता आहे. खरं तर अद्याप विकसित केलेल्या कोणत्याही मोठ्या प्रमाणावरील पायाभूत मॉडेलसाठी ही नक्कीच सर्वात लांब विंडो आहे. जेमिनी १.० मॉडेलमध्ये ३२,००० टोकन्सची कॉन्टेक्स्ट विंडो आहे. जीपीटी ४ टर्बोमध्ये १,२८,००० टोकन्स आहेत आणि क्लॉड २.१ मध्ये २,००,००० टोकन्स आहेत. Google चे मूलभूत मॉडेल विकास आणि पायाभूत सुविधांच्या जवळजवळ प्रत्येक भागामध्ये संशोधन आणि अभियांत्रिकी नवकल्पनांवर आधारित आहे. नवीन MoE आर्किटेक्चर जेमिनी १.५ प्रोला प्रशिक्षण आणि सेवा देण्यासाठी अधिक कार्यक्षम बनवते, असाही Google ने दावा केला आहे.
हेही वाचाः विश्लेषण : इराणने अंटार्क्टिका खंडावर केलेला दावा जगभरातील देशांची चिंता वाढवणार?
टोकन्स म्हणजे काय?
माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी टोकन्सचा वापर केला जातो. टोकन हे एकगठ्ठा सुटवांग असू शकतात किंवा शब्द, फोटो, ऑडिओ किंवा कोडही असू शकतो. कोणत्याही मॉडेलची काँटेक्स्ट विंडो जेवढी मोठी तेवढी त्याची माहिती साठवण्याची क्षमता अधिक असते.
जेमिनी १.५ प्रोच्या वापराचे प्रकरण काय?
जेमिनी १.५ प्रो कथितरीत्या ७,००,००० शब्द किंवा सुमारे ३० हजार कोड ओळींचा अंतर्भाव करू शकते. जेमिनी १.० प्रोची जेवढी क्षमता आहे, त्यापेक्षा याची ३५ पट जास्त क्षमता आहे. तसेच जेमिनी १.५ प्रो विविध भाषांमध्ये ११ तासांपर्यंत ऑडिओ आणि १ तास व्हिडीओवर प्रक्रिया करू शकते. Google च्या अधिकृत YouTube चॅनेलवर पोस्ट केलेल्या डेमो व्हिडीओंमधून मॉडेलचे दीर्घ संदर्भ समजून दाखवले आहेत. डेमोमध्ये एकूण ३,२७,३०९ टोकन वापरले गेलेत. व्हिडीओसाठी एकूण टोकन ६,९६,१६१ होते आणि प्रतिमा २५६ टोकन होत्या. डेमोच्या व्हिडीओमध्ये एक युजर्स मॉडेलला विशिष्ट क्षण आणि संबंधित माहिती दर्शविण्यास सांगताना दिसत आहे.
किंमत किती अन् ते कधी उपलब्ध होणार?
रिपोर्टनुसार, १ दशलक्ष टोकन्स संदर्भ विंडोसह जेमिनी १.५ प्रो वापरण्यासाठी विनामूल्य असेल. १,२८,००० कॉन्टेक्ट विंडोंपासून सुरू होणाऱ्या आणि १ दशलक्ष टोकन्सपर्यंत विस्तारणाऱ्या मॉडेलवर Google भविष्यात किंमत ठरवू शकते. जेमिनी १.५ प्रो ही Google च्या AI घडामोडींमध्ये एक नवीन आवृत्ती आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये Google ने तिचे AI मॉडेल जेमिनी १.० जेमिनी अल्ट्रा, जेमिनी प्रो आणि जेमिनी नॅनोसह तीन वेगवेगळ्या आकारात सादर केले होते. Gemini १.० ने कोडिंग आणि मजकुरासह अनेक आधारावर इतर अत्याधुनिक कामगिरीला मागे टाकले आहे, असा दावाही गुगलने केला आहे.
सामान्य युजर्स जेमिनी १.५ वापरण्यास कधी होणार सक्षम ?
जेमिनी १.५ प्रो सध्या Google AI स्टुडिओ आणि Vertex AI च्या एंटरप्राइझ युजर्ससाठी उपलब्ध आहे. जेमिनी १.५ प्रो सार्वजनिकरीत्या बाजारात कधी आणले जाईल, याबद्दल कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही. सध्या Google AI चे नियमित युजर्स Gemini Advanced Chatbot ची विनामूल्य चाचणी वापरू शकतात, जे कोडिंग, प्रतिमा तयार करणे यांसारखी कार्ये सहजपणे करू शकतात आणि Android स्मार्टफोन्सवर Google सहाय्यक देखील बदलू शकतात. गुगलने भारतातही जेमिनी ॲप आणण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी हे ॲप फक्त अमेरिकेत उपलब्ध होते. Google iOS उपकरणांमध्ये Google ॲपदेखील अपडेट करीत आहे, ज्यामुळे iPhone आणि iPads वापरणारे युजर्स जेमिनी चॅटबॉट सेवादेखील वापरू शकतात.