गूगलने नवीन चिप विलोचे अनावरण करून क्वांटम कंप्युटिंगमध्ये महत्त्वपूर्ण झेप घेतली आहे, जी या क्षेत्रात क्रांती घडवून आणणार असल्याचे गूगलचे सांगणे आहे. गूगलने म्हटले आहे की, विलो पाच मिनिटांत अतिशय जटिल गणिती समस्या सोडविण्यास सक्षम आहे. याचा अर्थ असा की, आता अस्तित्वात असणाऱ्या जगातल्या सगळ्यात फास्ट सुपरकॉम्प्युटरला जे गणित सोडवायला १० सेप्टिलियन (१०,०००,०००,०००,०००,०००, ०००, ०००, ०००) एवढी वर्ष लागतील, तेच गणित या चिपद्वारे सोडवायला केवळ पाच मिनिटांचा कालावधी लागेल. क्वांटम कॉम्प्युटिंग म्हणजे नक्की काय? गूगल विलो काय आहे? त्यांचे महत्त्व काय? त्याविषयी जाणून घेऊ.

क्वांटम कॉम्प्युटिंग म्हणजे काय?

क्वांटम कंप्युटिंग क्वांटम मेकॅनिक्सच्या तत्त्वांचा वापर करते, जे भौतिकशास्त्रातल्या मूलभूत कणांवर नियंत्रण ठेवते. बिट्स (० ते १) वापरून माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या शास्त्रीय संगणकांच्या विपरीत, क्वांटम संगणक क्यूबिट्सचा वापर करतात. क्वांटमचा अर्थ एखाद्या गोष्टीचा सर्वात सूक्ष्म कण, जे बिट्स सिलिकॉनच्या चिप्सने तयार झालेले असतात आणि ० ते १ ही या बिट्सची भाषा असते. क्वांटम संगणकचे बेसिक युनिट क्यूबिट्स असते. क्वांटम संगणकात हे क्यूबिट्स एकमेकांबरोबर मिळून काम करतात. त्यामुळेच कमी क्यूबिट्समध्ये अधिकाधिक माहिती साठवली जाऊ शकते. विलोच्या क्षमतेच्या केंद्रस्थानी त्याचे १०५ क्यूबिट्स आहेत.

software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Arvind kejriwal dr babasaheb ambedkars Fact Check marathi
अरविंद केजरीवालांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेले ‘ते’ आक्षेपार्ह विधान खरंच तसे आहे का? वाचा, VIRAL VIDEO ची खरी बाजू….
Central government Digital arrest
देशभरात ‘डिजीटल अरेस्ट’ची धास्ती, काय दिला जातो जनजागृतीपर संदेश
semi conductor lab
चिप चरित्र: चिपपुरवठा साखळी आणि भारत
Loksatta kutuhal Artificial Intelligence and Power Supply
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विद्युत पुरवठा
Grandmother dances on pushpa 2 peelings song video viral on social media
काय भारी नाचलीय! ‘पुष्पा-२’ चित्रपटातील गाण्यावर थिरकली आजी, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Success Story of Trishneet arora founder of tac security once failed in 12th now reliance and bsc are his clients
शाळा सोडली, बारावीत नापास झाला पण हार मानली नाही! पाहा पठ्ठ्याने कशी सुरू केली अब्जावधीची कंपनी; आता रिलायन्स, BSE सारख्या मोठ्या कंपन्यांना देतोय सेवा

हेही वाचा : भारतीय नर्सला येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा का देण्यात आली? फाशी रद्द होण्यासाठी पर्याय काय?

संगणकातील अतिसूक्ष्म कणांच्या गुणधर्मांचा वापर करून नेहमीच्या संगणकापेक्षा वेगाने प्रॉब्लेम्स सोडवले जातात. क्यूबिट्सचा वेग जास्त असला तरी ते काही प्रमाणात संवेदनशील आहे, त्यामुळे क्वांटम संगणकात चुका होण्याचे प्रमाण अधिक होते. परंतु, गूगलचा असा दावा आहे की, विलो विकसित करताना प्रगत तंत्रे लागू करून या अडथळ्यावर मात केली आहे; ज्यामुळे प्रोसेसिंगचा वेग वाढला असून चुकांचे प्रमाण कमी झाले आहे.

विलो पाच मिनिटांत अतिशय जटिल गणिती समस्या सोडविण्यास सक्षम आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

विलो गेम चेंजर का आहे?

विलोच्या कामगिरीचे परिणाम अफाट आहेत. गूगलने भविष्यातील क्वांटम कॉम्प्युटरची कल्पना केली आहे, ज्यामध्ये वैद्यक, बॅटरी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसह विविध क्षेत्रातील आव्हाने हाताळली जातील. जिथे शास्त्रीय संगणक यावरील उपाय प्रदान करण्यासाठी संघर्ष करतात, तिथे विलो महत्त्वाची भूमिका बाजावेल. गूगल क्वांटम एआयचे प्रमुख हार्टमट नेव्हन यांनी सांगितले की, भौतिकशास्त्रातली गुंतागुंतीची समीकरणे सोडवणे हे क्वांटम संगणकाचे लक्ष्य आहे. ही प्रगती असूनही तज्ज्ञ सावध करतात की, वास्तविक जगातील समस्या सोडवण्यास सक्षम व्यावहारिक क्वांटम संगणक अद्याप अनेक वर्षे दूर असू शकतात. विलो बेंचमार्क चाचण्यांमध्ये अपवादात्मक क्षमता दाखवत आहे, मात्र सध्या ते या टप्प्यावर प्रामुख्याने प्रायोगिक साधन आहे. विलोसारख्या क्वांटम कॉम्प्युटिंगच्या विकासामुळे औषधांच्या संशोधनाला, इलेक्ट्रिक कार बॅटरीच्या विकासाला वेग येऊ शकतो.

गूगलची घोषणा मायक्रोसॉफ्ट आणि आयबीएमसारख्या इतर टेक दिग्गजांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या दरम्यान आली आहे. मागील वर्षांमध्ये, गूगलला आयबीएमकडून आधीच्या क्वांटम चिप्सबद्दलच्या दाव्यांमुळे टीकेचा सामना करावा लागला. परंतु, विलोच्या महत्त्वपूर्ण कामगिरीसह गूगलने असे प्रतिपादन केले की, त्यांनी त्रुटी सुधारल्या आणि संगणकीय गतीमध्ये सर्व टप्पे पार केले आहेत. संशोधकांनी विलोसारख्या नवकल्पनांद्वारे क्वांटम संगणकाची क्षमता शोधणे सुरू ठेवल्याने, ते संगणकीय शक्तीच्या नवीन युगात प्रवेश करण्याबद्दल आशावादी आहेत, त्यामुळे उद्योगांना आकार मिळेल आणि पूर्वी दुर्गम समजल्या जाणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे शक्य होईल. व्यावहारिक ॲप्लिकेशन्सच्या दिशेने प्रवास नुकताच सुरू झाला आहे, परंतु विलोसारख्या प्रगतीसह, संगणकाचे भविष्य पूर्वीपेक्षा अधिक उज्ज्वल असल्याचे दिसून येते.

क्वांटम टेकमध्ये भारताचे प्रयत्न

भारत क्वांटम कंप्युटिंगमध्ये लक्षणीय प्रगती करत आहे आणि या परिवर्तनीय तंत्रज्ञानामध्ये स्वत:ला स्थान निर्माण करत आहे. सरकारच्या वचनबद्धतेचे उदाहरण नॅशनल क्वांटम मिशन (NQM) द्वारे दिले जाते, ही मोहीम एप्रिल २०२३ मध्ये मंजूर करण्यात आली होती. त्याचे बजेट पुढील आठ वर्षांसाठी ६,००३.६५ कोटी (अंदाजे ७२० दशलक्ष डॉलर्स) वाटप करण्यात आले होते. या मोहिमे अंतर्गत सर्वात लक्षणीय प्रगती म्हणजे भारताच्या पहिल्या क्वांटम कॉम्प्युटरच्या दिशेने झालेली प्रगती.

हेही वाचा : थंडीनी गारठून सहा नवजात बालकांचा मृत्यू; बॉम्ब हल्ल्याच्या परिणामामुळे गाझामध्ये नक्की काय घडतंय?

मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) लहान आकाराच्या क्वांटम कॉम्प्युटरचे काम पूर्ण करण्याच्या जवळ आहे, जे लवकरच कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट तीन वर्षात २४ क्यूबिट प्रणाली आणि पाच वर्षांत १०० क्विट प्रणाली विकसित करण्याचे आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) आणि विविध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs) सारख्या आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये चार थीमॅटिक हब (T-Hubs) स्थापन करण्यात आले आहेत. हे केंद्र क्वांटम कम्प्युटिंग, क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम सेन्सिंग आणि मेट्रोलॉजी आणि क्वांटम मटेरियल्स आणि उपकरणांसह प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतात.

Story img Loader