Space Travel रविवारी (१९ मे) भारतीय वंशाचे वैमानिक गोपी थोटाकुरा आणि इतर पाच अंतराळ पर्यटकांनी अवकाशात एका मनोरंजनात्मक सहलीचा आनंद घेतला. थोटाकुरा हे पहिले भारतीय अंतराळ पर्यटक ठरले आहेत; ज्यांनी अवकाशाची सफर केली. गेल्या तीन वर्षांत ५० जणांनी अवकाशातील सफरीचा आनंद घेतला आहे. अंतराळ पर्यटन म्हणजे काय? तुम्हालाही अंतराळ पर्यटन मोहिमेत सहभाग नोंदविता येऊ शकतो का? त्यासाठी किती खर्च येतो? या सर्व बाबी सविस्तर जाणून घेऊ या.

पहिले भारतीय अंतराळ पर्यटक

गोपी थोटाकुरा यांनी ‘ब्ल्यू ओरिजिन’ कंपनीच्या अंतराळयानात बसून ही सफर केली. ‘ब्ल्यू ओरिजिन’ ही कंपनी काही खासगी अवकाश कंपन्यांपैकी एक आहे; ज्या अंतराळात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांची इच्छा पूर्ण करतात. टेक ऑफ ते लँडिंगपर्यंतचा संपूर्ण प्रवास फक्त १० मिनिटे चालला. त्यादरम्यान अंतराळयान पृथ्वीपासून जास्तीत जास्त १०५ किमी अंतरापर्यंत पोहोचले. त्यात एका ९० वर्षीय अमेरिकन व्यक्तीचादेखील सहभाग होता.

Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
History of Geographyn History of the Earth Geological timescale
भूगोलाचा इतिहास: खडकातील पाऊलखुणा!
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

हेही वाचा : Pune Porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवता येईल का?

अंतराळातील ही सफर सर्वांत लहान आणि जलद सफरींपैकी एक होती. या अंतराळ सफरीत कर्मन रेषेच्या (Karman line) थोडे पुढे नेले जाते. ही रेषा पृथ्वीपासून सुमारे १०० किमी उंचीवर आहे. ही पृथ्वीच्या वातावरणाला बाह्य अवकाशापासून विभक्त करणारी सीमारेषा आहे. या उंचीच्या खाली उडणाऱ्या हवाई जहाजाला ‘विमान’ म्हटले जाते; तर ही रेषा ओलांडणाऱ्या अवकाशी वाहनाचे अवकाशयान म्हणून वर्गीकरण केले जाते. थोटाकुरा ज्या मोहिमेत सहभागी झाले, त्याला सब-ऑर्बिटल स्पेस फ्लाइट म्हणतात. थोटाकुरा यांच्या अंतराळ यानाने कर्मन रेषा ओलांडली आणि काही काळ हे यान तेथे थांबले आणि नंतर पृथ्वीवर परतले. अंतराळ पर्यटनातील बहुतेक उड्डाणे याच स्वरूपाची असतात.

अंतराळ सफरीत कर्मन रेषेच्या (Karman line) थोडे पुढे नेले जाते. ही रेषा पृथ्वीपासून सुमारे १०० किमी उंचीवर आहे. ही पृथ्वीच्या वातावरणाला बाह्य अवकाशापासून विभक्त करणारी सीमारेषा आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

अंतराळात पर्यटनात जास्त कालावधीचा प्रवास शक्य आहे का?

होय, अंतराळ पर्यटनात जास्त कालावधीचा प्रवासदेखील शक्य आहे. अशा प्रवासात पर्यटकांना चक्क अंतराळात काही दिवस राहता येते. अनेक अंतराळ पर्यटकांनी पृथ्वीभोवती प्रदक्षिणादेखील घातली आहे. पृथ्वीपासून अगदी ४०० किमी उंचीवर कायमस्वरूपी असणार्‍या अंतराळ स्थानकात काही दिवस व्यतीतही केले आहेत. पृथ्वीभोवती फिरणार्‍या कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) पर्यटक काही दिवस राहिले आहेत.

पहिले अंतराळ पर्यटक असणारे अमेरिकेतील डेनिस टिटो यांनी २००१ मध्ये रशियन सोयुझ अंतराळयानातून प्रवास केला आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सात दिवस घालवले. २००१ ते २००९ दरम्यान सात पर्यटकांनी रशियन सोयुझ अंतराळ यानातून प्रवास केला आणि ते अंतराळ स्थानकावर गेले. त्यातील चार्ल्स सिमोनी यांनी दोनदा अंतराळ प्रवास केला; परंतु २००९ नंतर अंतराळ पर्यटनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, २०२१ पासून पुन्हा लोक अंतराळ पर्यटनाला पसंती देऊ लागले.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) (छायाचित्र-रॉयटर्स)

लोकांना अंतराळ पर्यटनाचा आनंद देणार्‍या कंपन्या

खासगी अंतराळ पर्यटनात व्हर्जिन गॅलेक्टिक, ब्ल्यू ओरिजिन व स्पेसएक्स या तीन कंपन्या आघाडीवर आहेत. या कंपन्यांनी २०२१ मध्ये त्यांची पहिली अंतराळ मोहीम राबवली. त्या वर्षाच्या जुलैमध्ये १० दिवसांच्या अंतराने व्हर्जिन गॅलेक्टिक व ब्ल्यू ओरिजिन या कंपन्यांचे मालक रिचर्ड ब्रॅन्सन व जेफ बेझोस हे अंतराळ पर्यटनावर गेले. ही दोन्ही उड्डाणे ‘सब-ऑर्बिटल’ होती म्हणजे अंतराळाच्या सीमारेषेच्या अगदी वर काही मिनिटे थांबून त्यांचे यान परत आले.

‘स्पेस एक्स’कडे स्वतःचे कोणतेही मिशन नव्हते; परंतु कंपनीचे क्रू ड्रॅगन हे स्पेसक्राफ्ट अब्जाधीश जेरेड इस्सॅकमन यांनी अवकाशात जाण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. इस्सॅकमन आणि तीन सहप्रवाशांनी तीन दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली. व्यावसायिक अंतराळवीरांच्या मदतीशिवाय पृथ्वीभोवती फिरणारे ते पहिलेच होते. त्याच वर्षी जपानी अब्जाधीश युसाकू माएझावा आणि इतर दोघे रशियन सोयुझ या अंतराळ यानात बसून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले; जेथे त्यांनी १२ दिवस व्यतीत केले.

सुरुवातीला अंतराळ पर्यटनास एक तर या कंपनीचे मालक गेले किंवा इतर अब्जाधीशांनी यानांना भाडेतत्त्वावर घेतले होते. त्यानंतर पैसे देण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकासाठी अंतराळ पर्यटन खुले करण्यात आले. ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’ने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ही सेवा सुरू केली; तर ‘ब्ल्यू ओरिजिन’ने आतापर्यंत अशा ३७ पर्यटकांना अंतराळात नेले आहे.

अंतराळ पर्यटनास इच्छुक असणार्‍या प्रत्येक व्यक्तीला अंतराळवीरांप्रमाणेच अत्याधुनिक प्रशिक्षणाची आवश्यकता असते. (छायाचित्र-रॉयटर्स)

‘स्पेस एक्स’ने या सेवेंतर्गत आतापर्यंत असे एकही उड्डाण केले नाही; परंतु आता ते केवळ छोटी उड्डाणे किंवा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसाठीच नाही, तर चंद्र आणि मंगळाच्या आसपासच्या प्रवासासाठी इच्छुक लोकांकडूनही बुकिंग स्वीकारत आहेत. स्पेस एक्स ही एकमेव कंपनी नाही, तर स्पर्धेत अशा अनेक कंपन्या आहेत; ज्या लोकांना चंद्र, इतर ग्रह किंवा लघुग्रहांच्या आसपासच्या गंतव्य स्थानांवर घेऊन जाण्याच्या योजना आखत आहेत. परंतु, या सर्व भविष्यातील योजना आहेत. अंतराळ पर्यटनास इच्छुक असणार्‍या प्रत्येक व्यक्तीला अंतराळवीरांप्रमाणेच अत्याधुनिक प्रशिक्षणाची आवश्यकता असते. सब-ऑर्बिटल फ्लाइटची निवड करणाऱ्या प्रवाशांना किमान प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. अंतराळ प्रवासाच्या तिकिटातच प्रशिक्षणाचे पैसेदेखील घेतले जातात.

अंतराळ पर्यटनाला एकूण किती खर्च येतो?

गोपी थोटाकुरा यांनी केलेल्या सफरीसाठी एकूण किती खर्च आला, याविषयी ‘ब्ल्यू ओरिजिन’ने काहीही माहिती उघड केलेली नाही. परंतु space.com वेबसाइटनुसार, व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीच्या अंतराळयानाच्या प्रवासाची किंमत सुमारे ४,५०,००० डॉलर्स (सुमारे ३.७५ कोटी रुपये) आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंतच्या प्रवासासाठी २० ते २५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १६० ते २१० कोटी रुपये) खर्च येत असल्याचा अंदाज आहे. ‘नासा’च्या अलीकडील अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, स्पेसएक्स आणि स्पेस ॲडव्हेंचर्स या स्पेस कंपन्या चंद्राभोवती जाण्यासाठी सुमारे ७० ते १०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६०० ते ८५० कोटी रुपये) प्रवास शुल्क आकारण्याची योजना तयार करीत आहेत.

हेही वाचा : पुरुषांच्या अंडकोषामध्ये आढळले मायक्रोप्लास्टिक्स; प्रजनन क्षमतेवर होणार परिणाम?

त्यामुळे सध्या तरी अंतराळ पर्यटन केवळ अतिश्रीमंतांनाच परवडणारे आहे. उंच आकाशात प्रवास करू इच्छिणार्‍यांसाठी अधिक परवडणारे पर्यायदेखील समोर येत आहेत; मात्र त्यांना अंतराळ प्रवास म्हणता येणार नाही. काही बलून कंपन्या सामान्य विमानाच्या फ्लाइंग झोनपेक्षा जास्त उंचीवर नेण्याचा दावा करतात. हे बलून एका बंदिस्त आसन व्यवस्थेसह प्रवाशांना सुमारे १,००,००० फूट (सुमारे ३० किमी) उंचीवर घेऊन जातात. व्यावसायिक विमानांपेक्षा तीन पट जास्त उंचीवर आणि सहा ते १२ तासांच्या उड्डाणांसाठी या कंपन्या सुमारे ५० हजार डॉलर घेतात.