केंद्र सरकारने १७ जानेवारी २०२५ रोजी संचार साथी मोबाईल ॲप लाँच केले; ज्यामुळे ग्राहकांना सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन (एसएफसी), मोबाईल नंबरचा अनधिकृत वापर यांसारख्या फसव्या क्रियाकलापांची तक्रार करण्यास मदत होणार आहे. हे मोबाईल ॲप Android आणि iOS अशा दोन्हींसाठी उपलब्ध आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे या ॲप लाँच कार्यक्रमामध्ये म्हणाले, “संचार साथी मोबाईल ॲप हा वापरकर्त्यांसाठी अनुकूल प्लॅटफॉर्म आहे. हे ॲप दूरसंचार सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि नागरिकांना सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हा उपक्रम सर्व वापरकर्त्यांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करतो. संचार साथी ॲप प्रत्येकासाठी दूरसंचार नेटवर्कची सुरक्षितता आणि विश्वासार्हता राखण्यासाठी वचनबद्ध आहे.” काय आहे संचार साथी ॲप? या ॲपमुळे सायबर फसवणूक रोखण्यात कशी मदत होईल? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहे संचार साथी ॲप?

संचार साथी हा मोबाईल ग्राहकांना मदत करण्यासाठी, त्यांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि विविध फसवणूक प्रतिबंध साधने व उपक्रमांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी दूरसंचार विभागाचा (DoT) एक ग्राहककेंद्रित उपक्रम आहे. हे ॲप सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, तोतयागिरी किंवा इतर कोणत्याही गैरवापरासाठी कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे दूरसंचार सेवा वापरकर्त्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने केल्या गेलेल्या संशयित फसवणूक संप्रेषणाची तक्रार करण्यास नागरिकांना सुविधा देते.

हेही वाचा : महाकुंभ मेळ्यात बांधण्यात आले २,५०० वर्षे जुन्या तंत्राने प्रेरित पूल; काय आहे पोंटून पुलाचा इतिहास?

तुमचा हरवलेला/चोरी झालेला मोबाईल हॅण्डसेट ब्लॉक करा : हे ॲप हरवलेल्या/चोरी झालेल्या मोबाईल उपकरणांचे ट्रेसिंग सुलभ करते. त्यामुळे हरवलेला/चोरी झालेला मोबाईल ब्लॉक करणेदेखील सुलभ होते; जेणेकरून हरवलेली/चोरलेली डिव्हायसेस भारतात वापरली जाऊ शकत नाहीत. जर कोणी ब्लॉक केलेला मोबाईल वापरण्याचा प्रयत्न केला, तर तो मोबाईल लगेच ट्रेस केला जाऊ शकतो.

तुमच्या मोबाईल हॅण्डसेटची वास्तविकता जाणून घ्या : इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी (IMEI) नंबरच्या मदतीने मोबाईल हॅण्डसेटची वास्तविकता तपासण्यासाठी हे ॲप मोबाईल ग्राहकांना सुविधा देते.

संचार साथी मोबाईल ॲप हा वापरकर्त्यांसाठी अनुकूल प्लॅटफॉर्म आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

भारतीय क्रमांकासह येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार करा : हे ॲप नागरिकांना स्थानिक भारतीय क्रमांकाने (+91-xxxxxxxxxx) प्राप्त झालेल्या आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार करण्याची सुविधा प्रदान करते. अशा कॉल्सबद्दल अहवाल दिल्याने सरकारला बेकायदा टेलिकॉम सेटअपविरुद्ध कारवाई करण्यास मदत होते.

संचार साथी ॲप कसे वापरावे?

१. प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा. एकदा डाउनलोड झाल्यावर ते उघडा.

२. ॲपची होम स्क्रीन हे ॲप कोणत्या सुविधा देते हे दर्शवेल. ‘एक्सप्लोर करा’वर क्लिक करा. एक नवीन पृष्ठ दिसेल आणि ते तुम्हाला नोंदणी करण्यास सांगेल. नोंदणीसाठी पुढे जाण्यासाठी ‘प्रोसीड’वर क्लिक करा. जेव्हा तुम्ही यावर क्लिक कराल तेव्हा ॲप फोन लॉग, एसएमएस इत्यादींसारख्या अनेक परवानग्या विचारेल. सर्व परवानग्यांवर ‘अनुमती द्या’ क्लिक करा. पुढे त्यात तुमचे नाव आणि आडनाव विचारले जाईल. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ते १४४२२ वरून एसएमएस पाठवेल. त्यामुळे तुमच्या मोबाईलवर एसएमएस पाठविण्यासाठी रीचार्ज असल्याची खात्री करा.

३. एकदा नोंदणी केल्यानंतर तुम्ही ऑफर केलेल्या सुविधांचा वापर सुरू करू शकता. तक्रारीसाठी तुम्हाला स्क्रीनशॉट अपलोड करणे आणि फसवणूक संप्रेषणाचे तपशील टाईप करणे आवश्यक आहे. त्यानंतर ‘सबमिट’वर क्लिक करणे आवश्यक आहे.

दूरसंचार विभागाच्या डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मने सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कशी मदत केली?

प्रेस रिलीजमध्ये असे म्हटले आहे की, दूरसंचार विभागाचे डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म, केंद्रीय सुरक्षा एजन्सी, राज्य पोलीस, जीएसटीएन, बँका, दूरसंचार सेवा प्रदाते, सेबी, सीबीडीटी, डीजीजीआय, आयबी, सीबीआय, व्हॉट्सॲप इत्यादींसह ५२० हून अधिक संस्थांना समर्थन देते. यामुळे सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करण्यात मोठा हातभार लागला आहे. दूरसंचार विभागाने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, “दूरसंचार विभागाच्या अनेक नागरिककेंद्रित उपक्रमांपैकी संचार साथी उपक्रमाने उल्लेखनीय यश मिळविले आहे. मे २०२३ मध्ये सुरू झालेल्या संचार साथी पोर्टलने (www.sancharsaathi.gov.in) सायबर फसवणुकीशी लढा देण्यासाठी, नऊ कोटींहून अधिक भेटी, २.७५ कोटी फसवी मोबाईल कनेक्शन्स तोडणे आणि २५ लाखांहून अधिक हरवलेली किंवा चोरीला गेलेली उपकरणे सुरक्षित करणे यांसारखे उल्लेखनीय टप्पे गाठण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. याव्यतिरिक्त सायबर गुन्ह्यांशी जोडलेली १२.३८ लाख व्हॉट्सॲप खाती बंद करण्यात आली आहेत आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी ११.६ लाख बँक खाती गोठवण्यात आली आहेत.”

असोसिएशन ऑफ सर्टिफाईड फायनान्शियल क्राइम स्पेशलिस्ट (ACFCS)च्या कार्यकारी सदस्य शीतल आर. भारद्वाज यांच्या मते, “या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे ते वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल फोन लॉगमधून संशयित फसवे कॉल आणि एसएमएसची तक्रार करण्याची परवानगी देते. हा सक्रिय दृष्टिकोन दूरसंचार-संबंधित घोटाळे आणि वैयक्तिक डेटाचा अनधिकृत प्रवेश कमी करण्यात मदत करतो. संचार साथी ॲप पारदर्शकता, सुरक्षा आणि डिजिटल सक्षमीकरणाचा प्रचार करून, ग्राहक संरक्षण मजबूत करते. या अॅपचा बहुआयामी दृष्टिकोन वापरकर्त्यांना दूरसंचार फसवणुकीपासून वाचवण्यास मदत करतो आणि डिजिटल वापरास प्रोत्साहन देतो. संचार साथी ॲप हे दूरसंचार फसवणूक रोखण्याच्या दिशेने एक स्तुत्य पाऊल आहे. भारताने यासंदर्भात आणखी भर देण्याच्या साठी सायबर फसवणुकीच्या व्यापक समस्येवर लक्ष देण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

टेलिकॉम हा कनेक्टिव्हिटीचा शेवटचा टप्पा आहे आणि एकदा कनेक्ट झाल्यावर मोबाईल फोन विविध सायबर धोक्यांना बळी पडतो. खरोखर विकसित आणि सुरक्षित भारत निर्माण करण्यासाठी भारताने यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्या दृष्टीने करणे आवश्यक असलेल्या उपाययोजना खालीलप्रमाणे :

  • डिजिटल फसवणुकीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी एक व्यापक सायबर सुरक्षा ॲप विकसित करणे.
  • मजबूत डिजिटल संरक्षण तयार करण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देणे.
  • सायबर गुन्हेगारांच्या पुढे राहण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान आणि संशोधनामध्ये सतत नवनवीन योजना आणि गुंतवणूक करणे.

एक सक्रिय आणि सहयोगी दृष्टिकोन हे सुनिश्चित करेल की, नागरिक वाढत्या डिजिटल जगात सुरक्षित राहतील आणि भारताच्या डिजिटल परिवर्तनावर विश्वास वाढवेल.”

’63SATS’चे कार्यकारी अधिकारी आणि एमडी पठारे यांनी ठळकपणे सांगितले की, संचार साथी ॲप हे दूरसंचार सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि प्रत्येकासाठी दूरसंचार संबंधित समस्या सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले अनुकूल प्लॅटफॉर्म आहे. ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

  • हरवलेल्या फोनचा मागोवा घेता येतो.
  • CEIR वैशिष्ट्य वापरून, वापरकर्ते त्यांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधून ब्लॉक करू शकतात आणि त्याचा गैरवापर अवरोधित करू शकतात.

हेही वाचा : देशभरातील १३ विमानतळांवर ‘फास्ट-ट्रॅक इमिग्रेशन’ सुविधा; हा नवीन कार्यक्रम काय आहे? याचा लाभ कोणाला मिळणार?

  • ग्राहक त्यांच्या IMEI नंबरद्वारे त्यांचे डिव्हाइस ब्लॉक करून, अनधिकृत वापर प्रतिबंधित करू शकतात.
  • सिम कार्डावरील तपशील सुरक्षित करू शकता.
  • ॲपवरून वापरकर्त्यांना किती सिम कार्डे सक्रिय आहेत, ते तपासता येते.
  • कोणतेही अनधिकृत कनेक्शन शोधण्यात करता येते.
  • जर वापरकर्त्यांना त्यांच्या नावावर नोंदणीकृत सिम कार्ड आढळले, तर ते सिम कार्ड निष्क्रिय करण्याची विनंती करता येते.