पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याच्या काही तास आधी, महसूल विभागाने १३ फेब्रुवारी रोजी मुख्यतः कॉर्नपासून तयार केल्या जाणाऱ्या अमेरिकन व्हिस्की असणाऱ्या बॉर्बनवरील दरकपातीची घोषणा केली. नवीन रचनेमुळे बॉर्बन वर ५० टक्के मूलभूत सीमाशुल्क आणि अतिरिक्त ५० टक्के करआकारणी लागू केली जाईल, यापूर्वी १५० टक्के मूलभूत सीमाशुल्क आणि १०० टक्के करआकारणी केली जात होती. १९६४ मध्ये अमेरिकन काँग्रेसने (अमेरिकेतील संसद) बॉर्बनला अमेरिकेचे विशिष्ट उत्पादन म्हणून घोषित केले होते. बॉर्बन व्हिस्की नक्की कशी तयार होते? तिचा इतिहास काय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉर्बन व्हिस्की

अमेरिकन कायद्यानुसार, व्हिस्कीला बॉर्बन, असे लेबल लावायचे असल्यास ती अमेरिकेत तयार होणे आवश्यक असते. त्यात ‘मॅशबिल’ म्हणजेच धान्यांचे मिश्रण वापरले जाते. त्यामध्ये ५१ टक्के मका, जे पांढऱ्या ओकपासून तयार केलेल्या नवीन बॅरल्समध्ये कमीत कमी दोन वर्षांचे असणे आवश्यक असते आणि आतून जळलेले असणे आवश्यक असते. याला ४० टक्के ते ६२.५ टक्के अल्कोहोल व्हॉल्यूमनुसार बाटलीबंद केले जाते आणि त्यात कोणतेही अतिरिक्त रंग किंवा चव नसते. कायद्यानुसार अमेरिकेमध्ये कोठेही बॉर्बनचे उत्पादन केले जाऊ शकते, परंतु ते ग्रामीण दक्षिणेसह विशेषत: केंटकी राज्यात उत्पादित केले जाते. हेदेखील मानले जाते की, बॉर्बनचे नाव केंटकीमधील बर्बन काउंटीवरून पडले आहे. मात्र, अनेक तज्ज्ञ आजही त्याच्या उत्पत्तीबाबत असहमत आहेत.

महसूल विभागाने १३ फेब्रुवारी रोजी मुख्यतः कॉर्नपासून तयार केल्या जाणाऱ्या अमेरिकन व्हिस्की असणाऱ्या बॉर्बनवरील दरकपातीची घोषणा केली. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

‘बॉर्बन’ कशी तयार केली जाते?

बहुतेक ब्रँड बॉर्बन व्हिस्की अंदाजे ७० टक्के मक्यापासून तयार करतात. इतर धान्यांचे विशिष्ट मिश्रण वापरल्यास प्रत्येक ब्रँडला त्याची वेगळी चव येते. त्यात राई, माल्टेड बार्ली किंवा गहू यांचा वापर केला जातो. हे मिश्रण तयार करण्यासाठी अगदी कमी तापमानात सर्व धान्य पाणी आणि यीस्ट एकत्र मिसळले जाते. मिश्रण एकजीव करून, दोन आठवड्यांपर्यंत आंबवण्यासाठी ठेवले जाते. यादरम्यान धान्यांमधील साखरेची यीस्टबरोबर प्रतिक्रिया होते आणि बुरशीजन्य जीवांच्या प्रतिक्रियात्मक प्रतिसादातून इथाईल अल्कोहोल तयार होते. बहुतेक ‘बॉर्बन’मध्ये मागील डिस्टिलेशनमधून उरलेला आंबट मॅश फरमेन्ट करतेवेळी टाकला जातो; ज्यामुळे जीवाणूंची वाढ थांबते.

आंबवलेले मिश्रण गाळले जाते. उर्वरित द्रव मिश्रण, ज्यात पाणी, अल्कोहोल आणि इतर रसायनांचा समावेश असतो, त्याला अल्कोहोलची पातळी वाढवण्यासाठी डिस्टिल्ड केले जाते. मुळात अल्कोहोल इतर घटकांपासून, मुख्यतः पाण्यापासून, त्यांच्या वेगवेगळ्या तापमानांवर अवलंबून राहून शारीरिकदृष्ट्या वेगळे केले जाते. बहुतेक बॉर्बन्स दोनदा आंबवण्याच्या प्रक्रियेद्वारे टाकले जातात. डिस्टिलेशननंतर जळलेल्या ओक बॅरल्समध्ये त्याला बराच काळ ठेवले जाते; ज्यामुळे ‘बॉर्बन’ला गोड चव आणि रंगही येतो. कोणते लाकूड वापरण्यात आले आहे, याचादेखील चवीवर परिणाम होतो आणि ते किती काळ टिकले आहे याचादेखील अंतिम उत्पादनाच्या चवीवर परिणाम होतो. बाटलीबंद करण्यापूर्वी बर्बन डिस्टिल्ड वॉटरने पातळ केले जाते; जेणेकरून अल्कोहोलचे प्रमाण योग्य पातळीपर्यंत कमी होईल.

‘बॉर्बन’चा इतिहास काय आहे?

व्हिस्कीचा शोध कोणी लावला आणि केव्हा याविषयी आयरिश आणि स्कॉट्समध्ये मतभेद आहेत. जसे रसगुल्ल्याच्या उत्पत्तीबद्दल बंगाली आणि ओडिया कधीच सहमत होऊ शकत नाहीत, तसेच आयरिश आणि स्कॉट्स या दोन्ही शेजाऱ्यांमधील हा वाद कधी; सुटणार नाही. परंतु, हे निश्चितपणे म्हणता येईल की, व्हिस्कीची अंबवण्याची प्रक्रिया १७ व्या शतकाच्या सुरुवातीला स्कॉट आणि आयरिश स्थायिकांसह उत्तर अमेरिकेत आले. उत्तर अमेरिकेतील मूळ रहिवासी हजारो वर्षांपासून मक्याची शेती करीत होते आणि कॉर्न-आधारित आंबवलेली पेये वापरत होते. लवकरच मका अमेरिकन-निर्मित व्हिस्कीत मॅशबिल म्हणून वापरला जाऊ लागला आणि ‘व्हॉइला’ व ‘बॉर्बन’चा जन्म झाला.

बॉर्बनच्या आविष्काराबद्दल अनेक कथा आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

बॉर्बनच्या आविष्काराबद्दल अनेक कथा आहेत. सर्वांत लोकप्रिय कथांपैकी एक म्हणजे केंटकी येथील १८ व्या शतकातील बाप्टिस्ट मंत्री एलिजा क्रेग यांची भूमिका. ‘बॉर्बन’ला त्याचा तपकिरी रंग आणि विशिष्ट चव देण्यासाठी उत्पादनाचे वय वाढविणारी क्रेग ही पहिली व्यक्ती आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात त्याला सध्याचे स्वरूप आले. सुरुवातीला ब्ल्यू कॉलर ड्रिंक, बॉर्बनची लोकप्रियता वाढली. विशेषत: प्रोहिबिशन पीरियड (१९२० ते १९३३) संपल्यानंतर, मध्यम आणि उच्च वर्ग त्याकडे अधिकाधिक आकर्षित झाले. अलीकडच्या वर्षांत, ही व्हिस्की फक्त अमेरिकेमध्येच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. अलाईड मार्केट रिसर्चच्या मते, २०२१ मध्ये जागतिक बॉर्बन स्पिरिट्स मार्केटचे मूल्य ७.८ अब्ज डॉलर्स होते आणि २०३१ पर्यंत १२.८ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. भारताने २०२३-२४ मध्ये २.५ दशलक्ष डॉलर्स किमतीचे बॉर्बन आयात केले, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

‘बॉर्बन’चे सेवन कसे केले जाते?

प्युरिस्ट मानतात की उच्च दर्जाचे ‘बॉर्बन’ योग्य रीतीने सेवन केले पाहिजे, ज्यामुळे व्हिस्कीचा संपूर्ण सुगंध, पोत व त्याच्या चवीतील बारकावे अनुभवता येतात. Taster’sClub.com मधील एका लेखात म्हटले आहे, “त्याचा सुगंध अनुभवण्यासाठी व्हिस्कीला हलक्या हाताने फिरवा, एक छोटा घोट घ्या आणि गिळण्यापूर्वी ती तुमच्या टाळूवर काही वेळासाठी राहू द्या. अनेक जण ‘बॉर्बन’ पाण्याचा शिडकावा करून पिण्यास प्राधान्य देतात. पेयाचा सुगंध आणि चव वाढवण्यासाठी असे केले जाते. जिम बीम, वूडफोर्ड रिझर्व्ह, मेकर मार्क, इव्हान विल्यम्स व वाइल्ड टर्की १०१ हे ‘बॉर्बन’चे काही लोकप्रिय ब्रँड आहेत. जॅक डॅनियल व जेंटलमन जॅक यांना बऱ्याचदा ‘बॉर्बन’ म्हणून संबोधले जाते; परंतु प्रत्यक्षात ती टेनेसी व्हिस्कीची नावे आहेत.