अमेरिकेने तब्बल १०५ तस्करी केलेल्या पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत आणि त्या लवकरच भारतात परत येतील, असे घोषित करण्यात आले आहे. सोमवारी न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासात या वस्तूंचा प्रत्यावर्तन सोहळा पार पडला. या १०५ पुरातन वस्तूंपैकी सुमारे ५० कलाकृती धार्मिक विषयांशी संबंधित आहेत तर उर्वरित सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. या पुरातन वस्तू इसवी सनपूर्व पहिले शतक ते १५ वे शतक या कालखंडातील आहेत. यामध्ये इ.स.पूर्व पहिल्या शतकातील टेराकोटामधील यक्षाचे शिल्प समाविष्ट आहे, जे पूर्व भारतातून चोरीला गेले होते. ९ व्या शतकातील नृत्यगणेश हा मध्य भारतातून चोरीला गेला होता. तर १० व्या शतकातील कुबेराची मूर्ती मध्य भारतातूनच नाहीशी झाली होती. या सर्व पुरातन वस्तू वेगवेगळ्या काळात तस्करीच्या माध्यमातून परदेशी पोहचल्या होत्या. अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान १०० हून अधिक चोरलेल्या पुरातन वास्तू भारताला परत करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला होता.

अमेरिकेने घेतलेला निर्णय हा प्रशंसनीय असला तरी ब्रिटिश काळापासून भारतातील अनेक वस्तू या अवैध, तसेच वैध मार्गाने परदेशात गेल्या आहेत. प्रत्यक्ष भला मोठा ताजमहाल ही या फेऱ्यातून सुटला नव्हता. त्याच निमित्ताने ब्रिटिशांच्या ताजमहाल चोरीची आणि विकृतीची गाथा जाणून घेणे रोचक ठरावे!

people among the Kumbh Mela pilgrims contributed to the resolve traffic jam
गेले संगमस्नानास अन् ओंजळीत वाहतूक नियंत्रणाचे पुण्य!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Kasheli village in Rajapur is the first solar village in the state
राजापुरातील कशेळी गाव राज्यातील पहिले ‘सोलर गाव’
Loksatta natyarang Ramayana drama Urmilyan Indian culture
नाट्यरंग: ऊर्मिलायन;दृक् श्राव्यकाव्याची नजरबंदी
Narendra Chapalgaonkar death marathi news
Narendra Chapalgaonkar: ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन
Akola , Bangladeshi Rohingya, Birth Certificate,
अकोल्यातून १५ हजारांवर बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र? किरीट सोमय्यांचा आरोप; ‘एसआयटी’मार्फत….
Yogi Niranjan Nath selected as Chief Trustee of Sant Dnyaneshwar Maharaj Sansthan Committee
आळंदी : योगी निरंजन नाथ यांची संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्त पदी निवड
Indian state Rahul Gandhi
राहुल गांधी यांच्याविरोधात आसाममध्ये एफआयआर, राजकीय स्टंट असल्याची काँग्रेसची टीका

आणखी वाचा : राम मंदिराच्या निर्मितीला कारणीभूत ठरलेल्या भारतीय पुरातत्त्व खात्याच्या (ASI) जन्माची कूळकथा !

लॉर्ड विल्यम बेंटिक

१८३० साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चक्क ताजमहाल मोडून विकण्याचा घाट घातला होता. या मागे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक हे होते. लॉर्ड विल्यम बेंटिक यांची भारताच्या इतिहासात वेगळी ओळख आहे. सती प्रथा बंद करण्यामागे बेंटिक यांचा सहभाग होता. परंतु त्यांच्या ताजमहाल विकण्याच्या योजनेमुळे इतिहासात त्यांची ओळख ‘शहाणा मूर्ख’ (Wise fool) अशी राहिली आहे. यापूर्वी ‘ब्रिटिशांकडून ताजमहाल विकण्याची योजना करण्यात आली होती’, ही अफवा किंवा दंतकथा असल्याचा दावा पुराव्याअभावी ब्रिटिश अभ्यासकांकडून करण्यात येत होता. किंबहुना ही अफवा लॉर्ड विल्यम बेंटिक यांची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कलेतिहासाच्या प्राध्यापिका कविता सिंग यांनी या विषयाची पडताळणी करण्यासाठी संपूर्ण भारतातील तसेच युनायटेट किंडम मधील आर्कायव्हल्स पालथी घातली, त्यांच्या संशोधनातून जे सत्य समोर आले ते अचंबित करणारे आहे.

ताजमहालाच्या विक्रीची कथा आहे तरी काय?

ताजमहालच्या विक्रीची कथा खरी सुरु होते ते आग्राच्या किल्ल्यापासून. आग्रा किल्ल्याच्या आत प्रवेश करताच एक पोकळी जाणवते ती म्हणजे मुघल साहित्यात तसेच ब्रिटिशपूर्व काळात ज्या परदेशी व्यापाऱ्यांनी या किल्ल्याला भेट दिली त्यांच्या प्रवास वर्णनात नमूद केलेल्या ‘शाही हमामाची’. हाच हमाम म्हणजेच संगमरवरात घडवलेले न्हाणी घर, संपूर्ण मोडून लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी या हमामाची विक्री केली. ताजमहाल विकण्यापूर्वी हा केलेला लहान प्रयोग होता हेही सांगण्यात येत होते.

आणखी वाचा : विश्लेषण: मेलुहा ते इंडिया भारताच्या विविध नावांचा प्रवास कसा झाला?

१९२९ साली लॉर्ड विल्यम बेंटिक यांची ब्रिटिश भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली. या नेमणुकीमागे मुख्य उद्देश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अवास्तव वाढलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हा होता. १८३० सालच्या सुमारास पहिले अँग्लो आणि बर्मी युद्ध जिंकल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा खजिना रिकामा झाला होता म्हणून संचालक मंडळाने खर्च कमी किंवा खजिना वाढविण्याचे निर्देश दिले होते. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी ताजमहाल मोडून तेथील संगमरवर विकून टांकसाळ भरण्याची योजना आखली होती. तत्पूर्वी आग्रा किल्ल्यातील हमाम विकून या प्रयोगाची चाचणी करण्यात आली होती. परंतु ताजमहालच्या नशिबाने ही चाचणी यशस्वी झाली नाही. हमाम मोडून विकण्यात आला त्यातून फारशी किंमत मिळाली नाही. लॉर्ड ब्रेसफोर्ड, सर विल्यम स्लीमन यांच्या लिखित साहित्यात या गोष्टीचा संदर्भ मिळतो. मोडण्यात आलेल्या या हमामाचे अनेक भाग आजही आपण लंडन मधील व्हिक्टोरीया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात पाहू शकतो.

ताजमहालचे काय झाले?

लॉर्ड विल्यम बेंटिकचा कार्यकाळ हा ताजमहालसाठी सर्वात वाईट काळ मानला जातो. त्यांच्या काळात, निधी उभारण्यासाठी हे स्मारक उद्ध्वस्त केले जाणार होते, इतकेच नाही तर ताजमहालच्या लिलावाची जाहिरात तत्कालीन साप्ताहिक वृत्तपत्र जॉन बुल मध्येही प्रकाशित झाली होती. हा लिलाव दोन वेळेस करण्यात आला होता. पहिला १८३१ मध्ये आणि दुसरा १८३२ साली. दोन्ही वेळेस सर्वाधिक बोली लावणारे शेठ लक्ष्मीकांत जैन (१८१०-६६) हे भारतीय व्यापारी होते, त्यांनी पहिल्या खेपेस २ लाख इतकी बोली लावली होती आणि दुसऱ्यांदा ताजमहालची किंमत ७ लाख रुपयांपर्यंत पोहोचली. सर्वाधिक बोली लावण्याचा हेतू ताजमहाल पाडण्याचा नसून हे स्मारक वाचवण्याचा होता. परंतु ताजमहालचा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच ताजमहाल विकणार असल्याची बातमी वणव्यासारखी पसरली, त्यामुळे स्थानिकांकडून ब्रिटिश राजवटीविरुद्ध मोठा उठाव झाला. स्थानिक लोकांचा विरोध पाहून तत्कालीन राजेशाहीला आपला निर्णय बदलावा लागला आणि त्यांच्याकडून झालेला लिलाव रद्द करण्यात आला.

ताजमहाल लिलावाचा सबळ पुरावा फॅनी पार्क (प्रवासी- भारताविषयीच्या पुस्तकाच्या लेखिका: wanderings of a pilgrim in search of the picturesque) यांनी नमूद केलेल्या २६ जुलै १९३१ रोजी जॉन बुलला दिलेल्या एका प्रतिक्रियेत सापडतो. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे ‘ताजमहालचा लिलाव होत आहे, परंतु अपेक्षित अशी किंमत मिळाली नाही, फक्त दोन लाखाची बोली लावण्यात आली होती, किंबहुना ताजमहाल लिलावाच्या चर्चेने स्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.’ इतकेच नव्हे तर इतर काही ब्रिटिशांप्रमाणे त्याही या लिलावाच्या विरोधात होत्या. त्यांनी हिंदू व्यापाऱ्याने ताजमहाल घेण्याची दाखवलेली मनीषा ही कशा प्रकारे हिंदू-मुस्लीम वादाला कारणीभूत ठरली, हेही नमूद केले होते.

आणखी वाचा : व्यथा नर्तिकेच्या आयुष्याची … कथा घुंगरांच्या सामर्थ्याची ! (भाग १)

शेठ लक्ष्मीकांत जैन

शेठ लक्ष्मीकांत जैन हे मथुऱ्याचे मूलनिवासी होते. ते बँकिंग व्यवसायिक होते. म्हणूनच त्यांचा उल्लेख ‘द टाइम्स’ या लंडनमधील वृत्तपत्राने Rothschild of India असा केला होता. Rothschild (रॉथस्चाइल्ड) हे प्रसिद्ध कुटुंब होते. ते मूळचे फ्रँकफर्ट येथील एक श्रीमंत अश्केनाझी ज्यू कुटुंब होते. Rothschild या कौटुंबिक बँकिंग व्यावसायकांनी युरोपच्या औद्योगिकीकरणादरम्यान आंतरराष्ट्रीय उच्च वित्तपुरवठा केला तसेच जगभरातील रेल्वे प्रणालींना आर्थिक पाठिंबा आणि सुएझ कालव्यासारख्या प्रकल्पांसाठी जटिल सरकारी वित्तपुरवठा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती; म्हणूनच ब्रिटिश वृत्तपत्राने भारतीय बँकिंग व्यवसायिक लक्ष्मीकांत जैन यांची तुलना Rothschild कुटुंबाशी केली.

त्यांचे वंशज विजय कुमार जैन (former legislator up) यांनी लक्ष्मीकांत जैन यांच्यावर लिहिलेल्या ‘मथुरा सेठ’ या पुस्तकात ताजमहालच्या लिलावाचा संदर्भ दिला आहे. २००५ साली ताजमहालवरील वादावरून उभ्या राहिलेल्या खटल्यात ASI कडून न्यायालयात देण्यात आलेल्या अहवालातही या लिलावाचा उल्लेख आहे. मूलतः ताजमहाल मधील समाधीचा मुख्य दरवाजा चांदीच्या वापराचे सुशोभित केलेला होता, परंतु नंतर ब्रिटीश अधिकार्‍यांनी दरवाजातून चांदी काढून घेतली. त्यामुळे लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या कार्यकाळात इंग्रजांनी हे स्मारक लुटण्याची कसलीही कसर सोडली नाही असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

Story img Loader