अमेरिकेने तब्बल १०५ तस्करी केलेल्या पुरातन वस्तू भारताला परत केल्या आहेत आणि त्या लवकरच भारतात परत येतील, असे घोषित करण्यात आले आहे. सोमवारी न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासात या वस्तूंचा प्रत्यावर्तन सोहळा पार पडला. या १०५ पुरातन वस्तूंपैकी सुमारे ५० कलाकृती धार्मिक विषयांशी संबंधित आहेत तर उर्वरित सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. या पुरातन वस्तू इसवी सनपूर्व पहिले शतक ते १५ वे शतक या कालखंडातील आहेत. यामध्ये इ.स.पूर्व पहिल्या शतकातील टेराकोटामधील यक्षाचे शिल्प समाविष्ट आहे, जे पूर्व भारतातून चोरीला गेले होते. ९ व्या शतकातील नृत्यगणेश हा मध्य भारतातून चोरीला गेला होता. तर १० व्या शतकातील कुबेराची मूर्ती मध्य भारतातूनच नाहीशी झाली होती. या सर्व पुरातन वस्तू वेगवेगळ्या काळात तस्करीच्या माध्यमातून परदेशी पोहचल्या होत्या. अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान १०० हून अधिक चोरलेल्या पुरातन वास्तू भारताला परत करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा