सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लूंग १५ मे रोजी निवृत्त झाले असून, त्यांची जागा लॉरेन्स वोंग यांनी घेतली आहे. खरं तर ५१ वर्षी लॉरेन्स वोंग हे अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थतज्त्र आहेत. त्यामुळे जवळपास सहा दशकांत ते सिंगापूरचे दुसरे बिगर राजकीय कुटुंबातून आलेले नेते म्हणून सिंगापूरच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. २०२२ पासून उपपंतप्रधान म्हणून काम पाहिलेले वोंग येत्या निवडणुकीत पीपल्स अॅक्शन पार्टीचे नेतृत्व करणार आहेत. खरं तर वोंग यांनी सोशल मीडियावर त्यांचे गिटार कौशल्य दाखवून सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले होते. गिटार वाजवतानाचा त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. कोविड १९ साथीदरम्यान त्यांनी केलेले काम आणि घेतलेल्या निर्णायक निर्णयांमुळेच त्यांना सर्वोच्च पदावर बढती मिळण्यास मदत झाली. १९६५ मध्ये सिंगापूरला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वोंग यांचा जन्म झाला. सिंगापूरमध्ये जन्मलेले पहिले नेते म्हणून वोंग यांचे लक्ष्य सिंगापूर आणि तेथील नागरिकांच्या फायद्याचे निर्णय घेण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा