समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘हिंदू मंदिरे आज ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी पूर्वी बौद्ध वास्तू होत्या, त्या नष्ट करून हिंदू मंदिरे बांधली गेली आहेत का, हे शोधण्याकरिता पुरातत्त्व सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. सध्या एका बाजूस वाराणसीतील ज्ञानवापी मशीद परिसरासंदर्भात सध्या खटला सुरू आहे, तर दुसरीकडे मौर्य यांनी गेल्या आठवड्यात एका सार्वजनिक कार्यक्रमातील भाषणात हे वक्तव्य केले. “(तुम्हाला) आजच्या मशिदींपूर्वी कोणत्या वास्तू अस्तित्वात होत्या याचे सर्वेक्षण करायचे असल्यास, त्या वास्तूंपूर्वी काय अस्तित्वात होते हेदेखील शोधण्याकरिता सर्वेक्षण केले पाहिजे. बौद्ध धार्मिक स्थळे नष्ट करून त्या जागी अनेक हिंदू मंदिरे बांधण्यात आली,” असे विधान त्यांनी केले. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. त्याच निमित्ताने प्राचीन भारतीय संदर्भ नेमके काय सांगतात हे समजून घेणे महत्त्वाचे ठरणारे आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी त्यांच्या विधानाच्या स्पष्टीकरणार्थ बद्रिनाथ, केदारनाथ मंदिराचा उल्लेख केला. उत्तराखंडमधील हे मंदिर ८ व्या शतकात बौद्ध मठाच्या जागेवर बांधले गेले, असा त्यांचा दावा आहे.

गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाला मशिदीच्या परिसराची (except the ablutions area) “शास्त्रीय तपासणी/ सर्वेक्षण/ उत्खनन” पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिली आहे. सतराव्या शतकातील ज्ञानवापी मशीद मंदिराच्या जागेवर बांधण्यात आली आहे की नाही, हे ठरविण्यासाठी सर्वेक्षणाची परवानगी न्यायालयाकडून देण्यात आली आहे.

Dharavi Kumbharwada rehabilitation
धारावी कुंभारवाड्याचे मुलुंड कचराभूमीच्या जागेवर पुनर्वसन?; जागा दाखविण्यासाठी नेल्याने रहिवासी संतप्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rajput Gardens
मुघल गार्डन्सची जितकी चर्चा होते, तितकी ‘राजपूत गार्डन्स’ची का होत नाही?
Chandrashekhar Bawankule , Chandrashekhar Bawankule Amravati ,
चंद्रशेखर बावनकुळे यांना सोनेरी मुकूट? चर्चेला उधाण…
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
Widow practice, villages , Kolhapur,
कोल्हापुरातील दोन गावात विधवा प्रथा बंद, भेदभावाला मूठमाती देण्याचा ग्रामसभेचा निर्णय
Pune , House , Building , Redevelopment ,
लोकजागर : घर म्हणजे फक्त इमारत असते का?
m f hussain painting controversy
एम. एफ. हुसेन यांच्या हिंदू देवतांच्या कलाकृती वादाच्या भोवऱ्यात; नेमके प्रकरण काय?

प्राचीन भारत सहिष्णू होता का?

विद्यमान राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतात, ते म्हणजे प्राचीन भारतीय हिंदू संस्कृती ही खरंच शांतताप्रिय आणि सहिष्णू होती का?, शिवाय मुस्लिम आक्रमणकर्त्यांबरोबरच धार्मिक हिंसाचार भारतात आला असे सर्वत्र मानले जाते, यात कितपत तथ्य आहे. त्या प्रमाणे खरोखरच भारतीय संस्कृती ही धार्मिक हिंसाचारापासून अनभिद्न्य होती का? आज अनेक धार्मिक- ऐतिहासिक स्थळांवरून संघर्ष होताना दिसत आहे. कुणाची संस्कृती, किती जुनी यासाठी स्पर्धाच जणू सुरु आहे. धार्मिक भावनांचा शस्त्र म्हणून वापर केला जात आहे. इतिहासाची आपल्या पद्धतीने आणि आपला फायदा लक्षात घेऊन तोडफोड केली जात आहे. त्यामुळेच इतिहास आणि संस्कृती नेमकी काय सांगते, यापेक्षा आपल्याला इतिहास आणि संस्कृती कशी होती हे प्रत्येकजण आपापल्या चष्म्यातून दाखविण्याच्या प्रयत्नात आहे, हे या ज्ञानव्यापी प्रकरणात प्रकर्षाने जाणविणारे आहे. सध्या सुरु असलेले ज्ञानव्यापी मशीद प्रकरण अनेक अर्थाने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे. या मशिदीच्या परिसरात हिंदू मंदिराचे अवशेष सापडल्याने सर्वोच्च न्यायालयाकडून पुरातत्त्वीय सर्वेक्षणाला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मौर्य यांनी ‘केदारनाथ मंदिराच्या ठिकाणी असलेला बौद्ध मठ’ हे विधान भलतेच चर्चेत आहे. त्यांच्या या विधानावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर व्यक्त झाल्याचे आपण पाहू शकतो. यातूनच आरोप-प्रत्यारोपांचे नवे सत्र आता सुरु झाले आहे.

हेही वाचा : विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?

मूलतः भारतीय संस्कृती ही सहिष्णू होती यावर बहुतांश भारतीयांचा विश्वास आहे आणि बहुतेक राजकीय पक्षांनी या कथनाचे समर्थन देखील केले आहे. १९१२ ते १९२४ या कालखंडा दरम्यान लिहिलेल्या प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या (१८७०-१९५८) पाच खंडीय औरंगजेबाच्या इतिहासात त्यांनी ‘औरंगजेबाने सोमनाथ, मथुरा आणि वाराणसी येथील मंदिरांसह हिंदूंची अनेक इतर मंदिरे नष्ट केल्याचे’ नमूद केले आहे. जदुनाथ सरकार यांनी प्राचीन भारतीय हिंदूंच्या सहिष्णुता आणि अहिंसेशी तुलना इस्लामिक असहिष्णुता आणि कट्टरतेशी केली आहे. या नंतर ज्या इतिहासकारांनी जदुनाथ सरकार यांच्यावर “उघड जातीय” असल्याची टीका केली, त्यांनीही काही प्रमाणात त्यांच्याच कित्ता गिरवल्याचे लक्षात येते आणि त्यांनीही भारताच्या जन्मजात वैश्विकता आणि धार्मिक सहिष्णुतेवर जोर दिल्याचे त्यांच्या लिखाणामधअये दिसते. याला भूतपूर्व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तकही अपवाद नाही. जवाहरलाल नेहरू आपल्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया (१९४६) या पुस्तकात “प्राचीन भारतीयांमध्ये… मनाचे स्वातंत्र्य आणि लवचिकता आणि आत्म्याची सहिष्णुता होती तसेच इतर आस्था आणि त्यांच्याशी निगडित मार्ग यांच्याबद्दल असलेल्या अत्यंत सहनशीलतेमुळे भारतीयांनी संघर्ष टाळले आणि त्यामुळे समतोल राखण्यास मदत झाली” असे नमूद करतात.

त्यामुळेच दोन टोकाच्या विरोधाभास असणाऱ्या व्यक्तींकडून भारतीय संस्कृती आणि इतिहासाविषयी व्यक्त केले गेलेले विचार- वर्णन नक्कीच लक्षवेधी ठरणारे आहे. असे असले तरी, काही अभ्यासकांनी मात्र भारताविषयीच्या या कल्पनेतील विरोधाभासांकडे लक्ष वेधले आहे. ‘पोलिटिकल व्हायोलन्स इन एन्शन्ट इंडिया’ (२०१७) या पु्स्तकात इतिहासकार उपिंदर सिंग यांनी या विषयी युक्तिवाद केला आहे. आपल्याला माहीत असलेली भारताची भूमिका ही शांतताप्रिय आहे, गांधीजींच्या राष्ट्रवादाच्या अहिंसक विचारसरणीने या गोष्टीला दुजोरा दिला आहे, असे नमूद करून उपिंदर सिंग म्हणतात, सध्या समोर असलेला भारताचा इतिहास हा निवडक साधनांवर अवलंबून आहे, “जगाच्या इतर भागांप्रमाणेच प्राचीन भारताचा इतिहासही विविध प्रकारच्या हिंसाचाराने भरलेला आहे यात शंका नाही.” सिंग यांच्या या विधानाला दुजोरा देणारे विधान प्रसिद्ध दिवंगत इतिहासकार डी एन झा यांनी ‘अगेन्स्ट द ग्रेन: नोटस् ऑन आयडेंटिटी, इन्टॉलरन्स, अॅण्ड हिस्ट्री’ या पुस्तकात केले आहे. इस्लामच्या आगमनापूर्वी भारतात प्रतिस्पर्धी सत्ता धार्मिक वास्तू आणि मूर्तींची विटंबना व विध्वंस करत हे सामान्य होते, असे झा यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे.

हेही वाचा : विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- बुद्धमूर्तीमुळे प्रकाशात आले पहिल्या शतकातील प्राचीन जागतिकीकरण !

धर्म आणि राजकीय सत्ता पूर्वापार संबंध

रिचर्ड ईटन यांच्या ‘टेमपल डिस्क्रिशन अॅण्ड इंडो- मुस्लिम स्टेट्स’ (२०००) या पुस्तकात ईटन यांनी भारतीय संस्कृतीतील राजा आणि देव यांच्यातील संबंध उलगडून सांगितला आहे. मध्ययुगीन काळात मंदिरे ही पूर्णतः राजकीय संस्था होत्या. ज्या राजाने जे मंदिर बांधले आहे, त्या मंदिराला लुटणे हे विजयाचे प्रतीक मानले जात होते. प्रारंभिक भारतीय इतिहासामध्ये आंतरदेशीय संघर्षांदरम्यान झालेल्या मंदिरांच्या विटंबनाच्या घटना विपुल आहेत. ईटन यांनी दिलेल्या उदाहरणांपैकी पहिले उदाहरण म्हणजे ‘अकराव्या शतकातील चोल राजा राजाधिराजा पहिला, याने चालुक्यांचा पराभव करून, त्यांची राजधानी कल्याणी लुटली आणि एका मोठ्या काळ्या दगडात कोरलेल्या द्वारपालाच्या प्रतिमेला त्यांची राजधानी असलेल्या तंजावरला नेले. आणि दुसऱ्या उदाहरणानुसार पल्लव नरसिंहवर्मन पहिला याने इ.स.६४२ मध्ये चालुक्य राजधानी वातापी येथून गणेशाची प्रतिमा लुटली. किंबहुना चोलांनी कोल्हापूरवर केलेल्या हल्ल्यात महालक्ष्मी देवीच्या मूळ काष्ठातील मंदिराला आग लावली होती, याचे पुराभिलेखीय संदर्भ आजही उपलब्ध आहेत.

त्यामुळेच समान धर्माच्या राजांनी एकमेकांवरील आक्रमणात मंदिरे तसेच देवतांच्या मूर्ती पळविल्याच्या, उध्वस्त केल्याची उदाहरणे उपलब्ध असल्याने भारतीय इतिहासाला समजून घेणे गुंतागुंतीचे ठरले आहे. प्राचीन भारतीय संकल्पनेनुसार राजा हा ईश्वराचा अवतार मानला जातो. किंबहुना अनेक ठिकाणी ईश्वरच राजा असतो, तर मानवी राजा हा त्याचे प्रतिनिधित्त्व करतो. त्यामुळेच कोकणासारख्या ठिकाणी इनामदार संस्थान या संकल्पना अस्तित्त्वात असल्याचे लक्षात येते. अशा वेळी मंदिराच्या स्वरूपात असणारी राजसत्ता उध्वस्त केली जाते.

दोन धर्मातील हिंसा आणि छळ

भारतात तत्त्वज्ञानाचा उदय इसवी सनपूर्व पाचव्या-सहाव्या शतकाच्या सुमारास झाला, या काळाला शास्त्रीय परिभाषेत “भारताचे दुसरे शहरीकरण” म्हणतात, हा काळ गंगेच्या खोऱ्यातील मोठ्या सामाजिक-सांस्कृतिक बदलाचा मानला जातो. वैदिक धर्माच्या अत्यंत कठोर जात आणि कर्मकांडाच्या पद्धतींना प्रतिसाद म्हणून बौद्ध-जैन धर्मासारख्या इतर परंपरांच्या प्रवाहांचा उगम झाल्याचे मानले जाते. आज गौतम बुद्ध हे भगवान विष्णूंचा अवतार असल्याचे मानले जात असले तरी झा यांनी ‘ब्राह्मॅनिकल इन्टॉलरन्स इन अर्ली इंडिया’ (२०१६) आपल्या या पुस्तकात या दोन धर्मातील हिंसा आणि छळ यांचा इतिहास अधोरेखित केला आहे.

श्रमण व ब्राह्मण हे साप- मुंगूस

“पतंजलीने महाभाष्यात नमूद केल्याप्रमाणे श्रमण आणि ब्राह्मण हे साप आणि मुंगूसासारखे ‘शाश्वत शत्रू’ (विरोधः शाश्वतिकाह) आहेत. बौद्ध साहित्यात पुष्यमित्र शुंगाचे वर्णन ‘बौद्धांचा छळ करणारा’ म्हणून केले आहे, इ.स.पू पहिल्या शतकात होऊन गेलेल्या पुष्यमित्र याने तब्बल ८४ हजार बौद्ध स्तूप नष्ट केले, अनेक बौद्ध मठ आणि शिक्षण केंद्रे उद्ध्वस्त केली आणि बौद्धांची निर्घृण कत्तल केली असे उल्लेख येतात. परंतु हा तपशील अतिशयोक्तीपूर्ण असू शकतो असे, रोमिला थापर यांनी त्यांच्या ‘अशोका अॅण्ड द डिक्लाइन ऑप द मौर्याज’ (१९६१) मध्ये नमूद केले आहे. इथे लक्षात घेण्याचा मुख्य भाग म्हणजे दोन्ही पक्षांकडून असे आरोप प्रत्यारोप करण्यात येतात. पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार भारहूत येथील प्राचीन बौद्ध स्तुपावर शुंग घराण्यातील व्यक्तींनी बौद्ध स्तुपासाठी दान धर्म केल्याचे उल्लेख आहेत. असे असले तरी, गेल ओम्वेदट (Gail Omvedt) यांच्या ‘बुद्धीझम इन इंडिया: चॅलेंजिंग ब्राह्मिनिझम अॅण्ड द कास्ट’ (२००३) या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, या प्रसंगातील संख्यांवर वाद होवू शकतो परंतु दोन धर्मांमधील प्रचंड मतभेदाचे अस्तित्व नाकारता येत नाही.

हेही वाचा : विश्लेषण:Global Buddhist Summit 2023 चीन, भूराजकीय मुद्दे आणि ‘बौद्ध मुत्सद्देगिरी’!

“हुआन त्सांग (किंवा झुआनझांग), सातव्या शतकातील चिनी बौद्ध भिक्खूने हर्षवर्धनाच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर प्रवास केला होता. यांनी हिंसेच्या अनेक कथा नमूद केल्या आहेत, ज्यात शैव राजा शशांकच्या सुप्रसिद्ध कथेसह, बोधी वृक्ष तोडल्याचा समावेश आहे. शशांक, सहाव्या-सातव्या शतकातील गौडचा (आधुनिक उत्तर बंगाल) शैव राजा होता, याने बौद्ध हर्षाशी युद्ध केले आणि ज्या मूळ पिंपळाच्या झाडाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात हर्षवर्धन आणि शशांक यांच्यात झालेला संघर्ष हा राजकीय होता. अशाच स्वरूपाचा हर्षाचा संघर्ष माळव्याच्या देवगुप्ताशी होता. हे ऐतिहासिक पुराव्यांवरून सिद्ध झालेले आहे.

हर्षवर्धनाचे वडील हे शैव उपासक होते, हेही तितकेच खरे आहे. किंबहुना स्वतः हर्ष हा बौद्ध आणि शैव अशा दोन्ही उपासनांचा आदर आणि पालन करत होता. बाणभट्ट हा हर्षाच्या दरबारात होता. त्याने हर्षाचा उल्लेख शैव म्हणून केलेला आहे. हर्षाच्या एका अभिलेखात त्याचा उल्लेख परमपरमेश्वर असा आलेला आहे. तर हुआन त्सांग हर्षवर्धन बौद्ध असल्याचे नमूद करतो. एकूणच राजकीय संघर्षात धार्मिक भावनांचा शस्त्रासारखा वापर करण्यात आला, हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे आजच्या राजकीय परिस्थितीला प्रधान मानून इतिहास ढुंढाळणे संभ्रमात टाकणारे ठरते.

Story img Loader