पॅलेस्टाइनमधील हमास या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्यापासून इस्रायल देश खूपच आक्रमक झाला आहे. हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमास या संघटनेला समूळ नष्ट केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असा निश्चयच इस्रायलने केला आहे. दरम्यान, आता गाझा शहरातील ‘अल शिफा’ हे सर्वांत मोठे रुग्णालय या युद्धाच्या केंद्रस्थानी आले आहे. इस्रायलने या रुग्णालयावर हल्ला केल्यामुळे जगभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘अल शिफा’ रुग्णालयाला एवढे महत्त्व का? इस्रायलने या रुग्णालयावर हल्ला का केला? हे जाणून घेऊ.

आतापर्यंत ४० रुग्णांचा मृत्यू

गाझा शहरात अल शिफा हे सर्वांत मोठे आणि अत्याधुनिक सोई-सुविधांनी युक्त असे रुग्णालय आहे. मात्र, इस्रायलच्या हल्ल्यानंतर या रुग्णालयातील सोई-सुविधा कोलमडल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने तशी माहिती दिली आहे. या रुग्णालयाच्या परिसरात इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू असल्यामुळे आतापर्यंत या रुग्णालयातील ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे; तर शेकडो रुग्ण रुग्णालयात अडकले आहेत.

Muslim community struggle to bury their dead
‘या’ देशात मुस्लिमांना मृतदेह दफन करण्यासाठी जागाच मिळेना; कारण काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
syria interim president ahmed al sharaa first visit to saudi
सीरियाच्या हंगामी अध्यक्षांची पहिली भेट सौदी अरेबियाला… इराणपासून फारकत घेत असल्याचे संकेत?
Israeli Palestinian Conflict
अन्वयार्थ : अरबांची जरब…
Salwan Momika Iraqi man burned Quran in Sweden shot dead
मशिदीसमोर कुराण दहन करणाऱ्या व्यक्तिची गोळ्या घालून हत्या; कोण होते सलवान मोमिका?
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Saif ali khan
सैफ अली खानला मुंबईच्या जुहूमध्ये घ्यायचं होतं हक्काचं घर, पण….; अनुभव सांगत म्हणालेला, “इथे मुस्लीम…”
who is afsar zaidi saif ali khan friend
सैफ अली खानच्या मेडिकल फॉर्मवर कुटुंबियांचं नाही, तर ‘त्या’चं नाव; कोण आहे तो? त्याने सही का केली?

रुग्णालयात तीन दिवसांपासून विजेचा अभाव

रुग्णालयातील सध्याच्या परिस्थितीबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) माहिती दिली. “सध्या या रुग्णालयातील परिस्थिती फारच भीषण आहे. या रुग्णालयात तीन दिवसांपासून वीज नाही. पाणीदेखील नाही. इंटरनेटची सुविधादेखील पूर्णपणे कार्यरत नाही. अशा परिस्थितीमुळे रुग्णालय पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीये,” असे गेब्रेयसस म्हणाले.

‘अल शिफा’ रुग्णालयाला एवढे महत्त्व का?

गाझा शहरातील अल शिफा या रुग्णालयाला फार महत्त्व आहे. कारण- ते गाझातील सर्वाधिक मोठे आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे रुग्णालय आहे. मात्र, आता या रुग्णालयातील सर्व व्यवस्था कोलमडून पडली आहे. या रुग्णालयाच्या सहा मजली इमारतीत एकूण ६०० ते ९०० रुग्णखाटा असून, शेकडो कर्मचारी आहेत. गाझा शहरात अन्य कोणत्याही रुग्णालयात नसलेल्या सुविधा या रुग्णालयात होत्या. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून हे रुग्णालय निर्वासितांचे आश्रयस्थान झाले होते. तसेच युद्धातील अनेक जखमी पॅलेस्टिनींवर या रुग्णालयात उपचार करण्यात येत होते.

इस्रायलने ‘अल शिफा’ रुग्णालयावर हल्ला का केला?

काही दिवसांपासून इस्रायली सैन्याने अल शिफा या रुग्णालयाला वेढा दिलेला आहे. हमास या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय याच रुग्णालयाखाली आहे, असा दावा इस्रायली लष्कराकडून केला जात आहे. याच रुग्णालयाखालच्या बोगद्यांतून हमास आपल्या कारवाया करीत आहे. हमास संघटना रुग्णालयाच्या इमारतीचा वापर करीत आहे. तसेच रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा ढाल म्हणून वापर केला जात आहे, असेही इस्रायलने म्हटले आहे. मात्र, हमास आणि गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने इस्रायलचा हा दावा फेटाळला आहे. इस्रायल कोणत्याही आधाराविना अशा प्रकारचे आरोप करीत आहे. या दाव्यांना कोणताही आधार नाही, असे स्पष्टीकरण हमास आणि गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिले आहे.

इस्रायलकडून चुकीचा दावा केला जात असल्याचा आरोप

अल शिफा रुग्णालयात मूळचे ब्रिटनचे डॉ. अबू सित्ताह हे नोकरी करतात. त्यांनी इस्रायलच्या या दाव्यावर भाष्य केले असून, इस्रायल चुकीचे दावे करीत आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ‘ह्युमन राईट्स वॉच’ ही संघटनादेखील इस्रायलच्या या दाव्याची पुष्टी करू शकलेली नाही.

सध्या ‘अल शिफा’ रुग्णालयाची काय स्थिती आहे?

सध्या अल शिफा या रुग्णालयात ६५० रुग्ण, तसेच पाच ते सात हजार नागरिक अडकले आहेत. ‘हमास’ने सांगितल्याप्रमाणे या रुग्णालय परिसरात सातत्याने गोळीबार, बॉम्बहल्ले केले जात आहेत. हमासने दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात आतापर्यंत ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात तीन प्रिमॅच्युअर (प्रसूती कालावधीपूर्तीपूर्व प्रसूती) बाळांचाही समावेश आहे. वीज गेल्यानंतर त्यांना ज्या इन्क्युबेटरमध्ये ठेवले होते, ते बंद पडले. परिणामी या बाळांचा मृत्यू झाला, असे हमासने सांगितले.

लहना मुलांसाठी इन्क्युबेटरची गरज

या रुग्णालयात एकूण ३६ प्रिमॅच्युअर बालके आहेत. त्यांना तत्काळ इन्क्युबेटर्सची गरज आहे. या मुलांचा जीव वाचावा यासाठी आम्ही पोर्टेबल आणि बॅटरीवर चालणारे इन्क्युबेटर द्यायला तयार आहोत, असे इस्रायलने म्हटले होते; मात्र आतापर्यंत इस्रायलने तशी कोणतीही तजवीज केलेली नाही, असे गाझातील आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल किदरा यांनी सांगितले.

मोठ्या कबरीत मृतदेहांना दफन करण्याचा विचार

अल किदरा यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात १०० मृतदेह पडून आहेत. या मृतदेहांमधून दुर्गंधी येत आहे. या मृतदेहांना बाहेर काढण्यात अपयश येत आहे. “एका मोठ्या कबरीत सर्व मृतदेहांना दफन करण्याचा आम्ही विचार करीत आहोत. असे करणे आमच्यासाठी फार धोकादायक आहे. आम्हाला इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेडक्रॉस संघटनेकडून कोणतीही मदत मिळत नाहीये. मात्र, आम्हाला या मृतदेहांना दफन करणे गरजेचे आहे. कारण- हे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली आहे,” असे अल किदरा यांनी सांगितले.

“… तर आमच्यावर हल्ला केला जातोय”

दुसरीकडे आम्ही अल शिफा या रुग्णालयाला वेढा दिलेला नाही, असे इस्रायलचे म्हणणे आहे. ज्या लोकांना रुग्णालयाच्या बाहेर जायचे आहे, ते जाऊ शकतात, असे इस्रायलने सांगितले आहे. तर, रुग्णालयाबाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यावर आमच्यावर हल्ला केला जात आहे, असे अल शिफा या रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय मानतावादी कायदा काय सांगतो?

आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यानुसार युद्धादरम्यान रुग्णालयांना विशेष संरक्षण पुरवले जाते. मात्र, याच रुग्णालयांचा सैनिक लपवण्यासाठी किंवा शस्त्रे ठेवण्यासाठी वापर केला जात असेल, तर अशा रुग्णालयांचे संरक्षण संपुष्टात येते. युद्धादरम्यान रुग्णालयात सैनिक लपले असतील, तर रुग्णांना, तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रुग्णालयाबाहेर पडण्याची अनेक वेळा सूचना केली जाते. ओहियोतील केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीमधील लष्करी नीतिशास्त्रातील तज्ज्ञ जेसिका वोल्फेंडेल यांनी युद्धाच्या नियमांविषयी सांगितले आहे. इस्रायलाने हमासकडून रुग्णालयाचा वापर झाल्याचे सिद्ध केले तरी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदे कायम असतील. इस्रायलला रुग्णालयावर हल्ला करण्याची मुभा नाही. निरापराध लोकांना वाचवण्यासाठी इस्रायलने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे, असे जेसिका म्हणाल्या.

Story img Loader