Hamas chief assassinated इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. त्यातच आता हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया याची हत्या करण्यात आल्याने परिस्थिती आणखी चिघळणार आहे. ७ ऑक्टोबर २०२३ नंतर इस्रायल-हमास युद्धातील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत हानियाच्या मृत्यूवर भारताने प्रतिक्रिया दिली नाही. मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील इराणचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांच्या शपथग्रहण सोहळ्यासाठी तेहरानमध्ये होते. इस्माईल हानियादेखील या सोहळ्यात सामील होण्यासाठी म्हणून तेहरानमध्ये होता. आता इस्माईल हानियाच्या हत्येचा भारतावर आणि एकूणच जगावर काय परिणाम होईल, हादेखील प्रश्न उपस्थित होतो. याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

७ ऑक्टोबरनंतरचा सर्वांत मोठा हल्ला

७ ऑक्टोबरला केल्या गेलेल्या हल्ल्यानंतर हमाससाठी हा सर्वांत मोठा धक्का आहे. ७ ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्यात कमीत कमी १२०० इस्रायली नागरिक आणि लष्करी कर्मचारी मारले गेले होते आणि सुमारे २५० लोकांना कैद करण्यात आले होते. तेव्हापासून, इस्रायली सैन्य गाझावर वारंवार हवाई हल्ले करीत आहे आणि हमासच्या नेत्यांचा पाठलाग करीत, त्यांना ठार करत आहे. इस्रायलद्वारे करण्यात येणार्‍या या कारवाईत आतापर्यंत ४० हजारहून अधिक लोक मारले गेले आहेत. इस्रायलच्या दृष्टिकोनातून, हमासला कमकुवत करण्याच्या त्यांच्या अभियानाचा हा मोठा विजय आहे. त्यासाठीच इस्रायलद्वारे ऑपरेशन ‘स्वोर्ड्स ऑफ आयर्न’ सुरू करण्यात आले होते.

Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
review of the development works was presented in the campaign of the candidate in Byculla Mumbai news
भायखळ्यातील प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा
भायखळ्यातील प्रचारात विकासकामांचा लेखाजोखा
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : गोव्यातील ‘सनबर्न फेस्टिवल’वर बंदी? स्थानिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांचा या महोत्सवाला विरोध का?

हानियाच्या हत्येनंतर हमास, इराण संतप्त

हानिया कतारमध्ये असणार्‍या हमासच्या राजकीय ब्यूरोचे प्रमुख होते. त्यामुळे हमास या कारवाईकडे एक प्रमुख चिथावणी म्हणून पाहत आहे. हानिया ‘हमास’मधील प्रमुख चेहरा होता. ओलिस करार, तसेच युद्धविरामाच्या अटींवर हानिया चर्चा करायचा. एका निवेदनात, हमासने हानियाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. इराणच्या नवीन राष्ट्रपतींच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर तेहरानमधील त्याच्या निवासस्थानावर हल्ला करून त्याला संपवण्यात आले. त्यामुळे हमास आणि त्याचा सहकारी देश इराण संतापला आहे, हे निश्चित आहे. ‘हमास’चे अधिकारी सामी अबू झुहरी यांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले की हानियाची इराणमध्ये झालेली हत्या ही एक गंभीर बाब आहे.

जागेला लक्ष्य करून हानियाची हत्या

हानियाच्या हत्येचे ठिकाण हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. तेहरानमध्ये हा हल्ला जाणीवपूर्वक करण्यात आल्याचे आणि युद्धजन्य परिस्थितीत हे एक मोठे पाऊल असल्याचे सांगितले जात आहे. इस्माईल हानिया याने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचीही भेट घेतली होती. कतारमध्ये राहणाऱ्या हानियाला इराणमध्ये सुरक्षाही प्रदान करण्यात आली होती. परंतु, हानियाची हत्या इराणमध्ये करून, इस्रायलने हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, हमासचे नेते इराणी सुरक्षेत सुरक्षित नाहीत. या वर्षी एप्रिलमध्ये इराणने इस्रायलवर हल्ले केल्यानंतर इस्रायलनेही इराणला लक्ष्य केले होते. इराणने इस्रायलवर डागलेली क्षेपणास्त्रे इस्रायलने त्याच्या मित्रराष्ट्रांच्या मदतीने रोखली होती. त्यानंतर वातावरण शांत होते; परंतु या हत्येमुळे युद्धजन्य परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इराण आणि हमासद्वारे इस्रायलचा बदला

इराण आणि हमासमध्ये आता हानियाच्या मृत्यूचा बदला घेण्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे नवनिर्वाचित राष्ट्रपती पेजेशकियान यांच्यावर नक्कीच दबाव आणण्यात येईल. पेजेशकियान यांची निवडणूक मोहीम आर्थिक कारणांसाठी पाश्चात्त्य देशांशी वाटाघाटी सुरू करणे, यावर केंद्रित होती. कारण- इराणला पाश्चात्त्य निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. त्यांना युरोपशी संवाद प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याचीदेखील आशा होती. परंतु, हानियाच्या हत्येमुळे पेजेशकियान यांच्यावर आयआरजीसी आणि इराणी आस्थापनातील कट्टरपंथींकडून त्यांच्याप्रमाणेच उत्तर किंवा प्रतिसाद देण्यासाठी दबाव असेल. पेजेशकियान यांचे राष्ट्रपती म्हणून पहिले काही दिवस आणि आठवडे एक राजकारणी म्हणून त्यांच्या कौशल्याची चाचणी असेल. या संकटाला कसा प्रतिसाद द्यायचा याविषयी त्यांना सर्वोच्च नेत्यांशी चर्चा करावी लागेल.

हानियाच्या हत्येचा खर्‍या अर्थाने फायदा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना होणार आहे. गेल्या काही काळात त्यांच्या नेतृत्वावर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यात आली होती. हमासशी ओलिस करार केल्याने अमेरिका, इजिप्त व कतार यांच्यासह इतरांनी मध्यस्थी करून त्यांच्यावर दबाव आणल्यामुळे त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. या हत्येनंतर गाझातील युद्ध आणखी लांबण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, नेतान्याहू युद्ध संपेपर्यंत आपल्या पदावर कायम राहू शकतात.

अमेरिकेच्या निवडणुकीचाही मोठा परिणाम

अमेरिकेतील निवडणूक निर्णायक टप्प्यावर आहे. उपाध्यक्षा कमला हॅरिस यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन्ट्री झाली आहे. इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या कारवाईबाबत नेत्यानाहू यांच्याविरोधात त्या महत्त्वाची भूमिका घेतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. कारण- त्यांचे संपूर्ण लक्ष तरुण डेमोक्रॅटिक मतदारांवर आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या तुलनेत हॅरिस यांनी गाझामधील युद्धावर अनेकदा आपले मत मांडले आहे. त्यामुळे या परदेशांत आता तणावाची स्थिती निर्माण झाल्यास त्याला प्रतिसाद कसा द्यायचा याचा त्यांना विचार करावा लागेल.

मुख्य म्हणजे इराण आणि हमास यांच्याकडून कोणती कारवाई करण्यात आल्यास, त्याचा सभोवतालच्या संपूर्ण प्रदेशावर परिणाम होईल. कतार, तुर्की व येमेनच्या हौथींनी या हत्येचा आधीच निषेध केला आहे आणि सौदी अरेबियासारखे प्रमुख प्रादेशिक देश या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. गाझामध्ये नऊ महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या युद्धानंतर ही एक मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे हा प्रदेश व्यापक संघर्षात येऊ शकतो.

हेही वाचा : पँगॉन्ग लेकवरील चीनचा पूल तयार; भारतासाठी हा किती मोठा धोका?

भारताच्या चिंतेचे कारण काय?

लक्षात घ्या, अजूनही या घटनाक्रमावर विचार करीत आहे आणि त्याविषयी कोणतेही विधान करणे टाळले आहे. कारण- भारताला अशा विषयांवरील प्रतिसादाच्या संवेदनशीलतेची जाणीव आहे. त्यात हमासच्या नेत्यांबद्दल कोणतीही सकारात्मक भावना नसली तरी अशा विषयांवर भाष्य करताना त्याच्या होणार्‍या परिणामांचा भारताला सर्वांत आधी विचार करणे आवश्यक आहे. भारताला जवळजवळ दोन-तृतियांश कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याव्यतिरिक्त या प्रदेशात सुमारे नऊ दशलक्ष भारतीय नागरिक राहतात आणि काम करतात. त्यामुळे या प्रदेशातील शांतता आणि स्थिरता बिघडल्यास ते भारतासाठी चिंतेचे कारण ठरू शकेल.