पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर आता हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. इस्रायलकडून पॅलेस्टाईनमध्ये बॉम्बहल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पॅलेस्टाईनमध्ये वीज, अन्न, औषध अशा सर्वांचाच तुटवडा भासत आहे. याच कारणामुळे पॅलेस्टिनी नागरिकांची मदत करणे गरजेचे आहे, अशी भावना जागतिक पातळीवर व्यक्त करण्यात येत आहे. याच कारणामुळे आता इस्रायलने रफाह सीमेतून पॅलेस्टिनी नागरिकांना मदत करण्यास परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या गाझा पट्टी तसेच पॅलेस्टाईनमधील नागरिकांची काय स्थिती आहे? हे जाणून घेऊ या…

हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध

हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलनेदेखील गाझा पट्टी तसेच पॅलेस्टाईनच्या इतर प्रदेशावर क्षेपणास्त्र डागले. त्यानंतर आता हमास आणि इस्रायल यांच्यात उघड युद्ध सुरू झाले आहे. या युद्धात हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येक नागरिक जखमी आहेत. याच जखमी नागरिकांना २१ ऑक्टोबर रोजी रफाह सीमा ओलांडून ट्रकच्या माध्यमातून औषध, अन्न, कपडे अशा स्वरुपात मदत पुरवण्यात आली आहे.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
District Magistrate Rajender Pensiya told PTI. (FB)
संभल प्रशासनाकडून दंगलखोरांचे फलक; परिसरात ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त
Israel responds to Hezbollah rocket attack
हेजबोलावर इस्रायलचे पुन्हा हवाई हल्ले; शस्त्रसंधी करार झाल्यानंतर आठवड्यातच पुन्हा संघर्ष

इस्रायलने वीजपुरवठा बंद केला

हमास-इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून रफाह क्रॉसिंग बंद होती. रफाह क्रॉसिंग इजिप्तकडून नियंत्रित केली जाते. सध्या युद्धामुळे गाझा पट्टीत अन्न, इंधन, औषध यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. इस्रायलने वीजेचा पुरवठा बंद केल्यामुळे गाझा पट्टीतील परिस्थिती जास्तच भीषण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत मदत पुरवण्यास सहमती दिली आहे.

मदत घेऊन ट्रक गाझा पट्टीत दाखल

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जारी केलेल्या निवेदनानुसार एकूण चार ट्रकमध्ये डब्ल्यूएचओतर्फे आरोग्यविषयक मदत पाठवण्यात आली आहे. या मदतीमध्ये ट्रॉमा तसेच जुन्या आजारांवर उपचार करण्यासाठीच्या औषधांचा समावेश आहे. या ट्रकमध्ये अन्य औषधदेखील आहेत. गाझा पट्टीतील नागरिकांना मदत मिळावी आणि सुरक्षित मार्गिका तयार व्हावी यासाठी ‘इजिप्त अँड पॅलेस्टाईन रेड क्रेसेंट सोसायटी’ची मदत घेण्यात येत आहे. मात्र सध्या गाझा पट्टीत आरोग्यविषयक स्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे आम्ही पुरवत असलेली वैद्यकीय मदत पुरेशी नाही. ही मदत वाढण्याची गरज आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

गाझा पट्टीत १.७ दशलक्ष लोक निर्वासित

गाझा पट्टी या प्रदेशचे आकारमान साधारण ३६५ स्क्वेअर किलोमीटर आहे. युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रिफ्युजीजच्या (UNRWA) म्हणण्यानुसार या प्रदेशात जवळपास २.२ दशलक्ष लोक राहतात. यातील १.७ दशलक्ष लोक हे निर्वासित आहेत. UNRWA गाझा पट्टीतील आठ निर्वासित शिबिरांत मदतकार्य करते. यूएन ऑफिस फॉर द कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटेरियन अफेअर्स (OCHA)नुसार गाझा पट्टी हा प्रदेश जगाीतील सर्वाधिक दाट लोकसंख्येचा प्रदेश आहे. या भागात एका स्क्वेअर किलोमीटर परिसरात साधारण ५९०० लोक राहतात. गाझा पट्टीतील साधारण ४१ टक्के लोकसंख्या ही १५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.

गाझा पट्टीत १.४ दशलक्ष लोक विस्थापित

हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर गाझा पट्टीतील लोकांची परिस्थिती बिकट झाली आहे. या युद्धात एकीकडे पॅलेस्टिनी नागरिकांचे मृत्यू होत आहेत. तर दुसरीकडे साधारण १.४ दशलक्ष लोक विस्थापित झाले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या ह्युमॅनिटेरियन कोऑर्डिनेशन कार्यालयाने तशी माहिती दिली आहे.

आरोग्य व्यवस्था कोलमडली

इस्रायल, अमेरिका, युरोपियन युनियनकडून हमास या संघटनेला दहशतवादी संघटना म्हटले जाते. याच हमास संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या युद्धात आतापर्यंत ४ हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. गाझा पट्टीत सध्या एकूण १३ रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयांत औषध तसेच अन्य वैद्यकीय मदतीची गरज आहे. त्यामुळे ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीयेत.

रुग्णालये शवागृहात बदलण्याची भीती

इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसचे (आयसीआरसी) पदाधिकारी फॅब्रिझिओ कार्बोनी यांनी गाझा पट्टीतील सद्यस्थितीविषयी अधिक माहिती दिली आहे. “सध्या गाझामध्ये वीज नाही. रुग्णालयांतही वीज नाही. अशा स्थितीत नव्याने जन्मलेल्या मुलांना इनक्यूबेटर तसेच वृद्ध रुग्णांना ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर ठेवणे धोकायक आहे. मूत्रपिंडावर उपचार करण्यासाठी डायलायसिसची सुविधा बंद आहे. रुग्णांचा एक्स-रेदेखील काढता येत नाहीये. वीज नसल्यामुळे सर्वाकाही ठप्प आहे. सध्या रुग्णालये शवागृहात बदलतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे,” असे फॅब्रिझिओ कार्बोनी यांनी सांगितले.

वीजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक अडचणी

गाझा पट्ट्यात सध्या एक वीजनिर्मिती केंद्र आहे. या वीजनिर्मिती केंद्रातून साधारण ७० मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते. मात्र या वीजनिर्मिती केंद्रातून निर्माण होणाऱ्या विजेतून गाझा पट्टीतील खूप कमी भागाला वीजपुरवठा होतो. म्हणजेच या वीजनिर्मिती केंद्रातून निर्माण होणारी वीज ही गाझा पट्टीतील प्रदेशाला अपुरी पडते. गाझा पट्टीला साधारण ४०० मेगावॅट विजेची गरज आहे. त्यामुळे साधारण १२० मेगावॅट विजेचा पुरवठा हा इस्रायलकडून केला जातो. या वर्षी गाझा पट्टीतील नागरिकांना रोज सरासरी १३ तास वीज पुरवठा झालेला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीतील आपला वीजपुरवठा बंद केला आहे. गाझा पट्टीतील एकमेव वीजनिर्मिती केंद्राला इंधन नसल्यामुळे तेदेखील बंद पडले आहे. त्यामुळे सध्यातरी या प्रदेशातील नागरिक पॉवर जनरेटवर अवलंबून आहेत.

गाझा पट्टीत रोजगाराची स्थिती काय?

गाझा पट्टीत रोजगाराची स्थितीदेखील भीषण आहे. OCHAच्या म्हणण्यानूसार गाझा पट्टीत बेरोजगारीचा दर हा ४५ टक्के आहे. १५ ते २९ वर्षे वयोगटातील साधारण ६० टक्के तरुण हे बेरोजगार आहत. गाझा पट्टीतील साधारण ८० टक्के नागरिक हे खासगी क्षेत्रात नोकरी करतात. त्यांना दरमहा किमान वेतनापेक्षाही कमी वेतन (४४२ डॉलर) दिले जाते. UNICEF चे प्रवक्ते स्टेफन ड्यूजारिक यांनी दिलेल्या माहितीनुसार गाझातील ८० टक्के लोक हे इतर देशाने दिलेल्या मदतीवर अवलंबून आहेत.

गाझा पट्टीची नाकेबंदी कधी सुरू झाली?

हमासने गाझा पट्टीवर नियंत्रण मिळवल्यानंतर इस्रायलने २००७ साली समुद्र, जमीन तसेच हवाई अशा सर्वच मार्गाने गाझा पट्टीची नाकेबंदी केली होती. तेव्हापासून गाझा पट्टीतील लोकांना इतर देशात जाण्यासाठी इस्रायलच्या चेकपॉईंट किंवा इजिप्तच्या नियंत्रणात असलेल्या रफाह क्रॉसिंगमधून जावे लागते.

गाझा पट्टीची चारही बाजूंनी नाकेबंदी

गाझा पट्टीच्या उत्तरेपासून ते इस्रायलच्या पूर्व दिशेपर्यंत इस्रायलने भिंत बांधली आहे. तर गाझाच्या दक्षिणेला इजिप्तने अमेरिकेची मदत घेऊन १४ किलोमीटरची सीमा भिंत बांधून बंद केली आहे. इस्रायलच्या पश्चिमेला असलेल्या भूमध्य समुद्रावर इस्रायलचे नियंत्रण आहे. गाझामधून लोक किंवा सामानाची ने-आण करण्यासाठी इस्रायलने बंदी घातली आहे. त्यामुळे गाझातील लोकांना सागरी मार्गाचाही वापर करता येत नाही. सध्या गाझामधून बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यासाठी तीन सीमामार्ग उपलब्ध आहेत. करीम अबू सालेम क्रॉसिंग आणि एरेज क्रॉसिंग हे दोन मार्ग इस्रायलकडून नियंत्रित केले जातात. तर रफाह क्रॉसिंग इजिप्तकडून नियंत्रित केली जाते. शनिवारी (७ ऑक्टोबर) हमासचा हल्ला झाल्यानंतर सर्व तीन सीमामार्ग बंद करण्यात आले होते. यातील रफाह क्रॉसिंग मार्ग आता मदतकार्यासाठी खुला करण्यात आला आहे.

Story img Loader