इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि देशाचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर अझरबैजानमध्ये कोसळले. खराब हवामानामुळे बेपत्ता हेलिकॉप्टर शोधण्यासाठी बचाव कार्य करणे कठीण होत आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेनेही या अपघाताला दुजोरा दिला आहे. बचाव पथकं उत्तर इराणमध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा शोध घेत आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू झाल्याचे सांगण्यात आले. डझनभर बचावकर्ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले, तर बचाव कार्यात मदत करण्यासाठी लष्करी ड्रोनचाही वापर केला जात आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांची शोधाशोध सुरू असताना इब्राहिम रईसी यांच्या जीवनावर अन् राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकू यात.

कोण आहेत इब्राहिम रईसी?

कट्टर पंथीय असलेले धर्मगुरू रायसी यांचा जन्म १९६० मध्ये पूर्वेकडील मशहद शहरात एका धार्मिक कुटुंबात झाला होता. खरं तर हा प्रदेश इराणच्या १९७९ च्या इस्लामिक क्रांतीने प्रभावित झालेला होता. या शहरात शिया मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र मानली जाणारी मशीद देखील आहे. रईसी यांचे वडील मौलवी होते. रायसी केवळ पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी कौम शहरातील शिया संस्थेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. विद्यार्थीदशेत त्यांनी मोहम्मद रझा शाह यांच्या विरोधात पाश्चात्य देशांनी पाठिंबा दिलेल्या निदर्शनांमध्ये भाग घेतला. पुढे अयातुल्ला रुहोल्लाह खोमेनी यांनी १९७९ मध्ये इस्लामिक क्रांतीद्वारे शाह यांना सत्तेवरून हटवले. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी तेहरानजवळील काराजचे अभियोजक(Prosecutor) जनरल म्हणून त्यांची नियुक्ती झाली. रईसी १९८९ ते १९९४ दरम्यान तेहरानचे अभियोजक(Prosecutor) जनरल होते आणि त्यानंतर २००४ पासून पुढील दशकासाठी न्यायिक प्राधिकरणाचे उपप्रमुख होते. २०१४ मध्ये ते इराणचे प्रॉसिक्युटर जनरल झाले. इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख असलेल्या रईसी यांचे राजकीय विचार ‘अत्यंत कट्टरपंथी’ मानले जातात. ते इराणचे कट्टरतावादी नेते आणि देशाचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या जवळचे मानले जातात. न्यायपालिकेचे प्रमुख असताना त्यांनी राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन अनेक आरोपींना फाशी आणि अन्यायकारक तुरुंगवास दिल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांनी केला होता. जून २०२१ मध्ये उदारमतवादी हसन रुहानी यांच्या जागी ते इराणच्या इस्लामिक रिपब्लिकचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये ते इराणचे अध्यक्ष होण्यापूर्वी अमेरिकेने इराणचे सर्वोच्च नेते अली होसेनी खोमेनी यांची राजकीय नियुक्ती केल्याबद्दल रायसी यांच्यावर निर्बंध लादले.

Saif Ali Khan Attack
Saif Ali Khan : “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून…”, हल्ल्याबाबत गंभीर शंका घेणार्‍या आव्हाडांना गृहराज्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Case
Dhananjay Deshmukh : “…अन्यथा टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार”, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका

हेही वाचाः श्रीनगरमध्ये विक्रमी मतदान कशामुळे? धर्मनिहाय विभागणीमुळे भाजप आणि विरोधकांना समान संधी?

देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून रायसी यांचा वादग्रस्त कार्यकाळ

रायसी २०२१ मध्ये ६३ वर्षीय इराणचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांच्या कार्यकाळात इराणने सर्वात मोठे सरकारविरोधी निषेध आणि गंभीर आर्थिक मंदी अनुभवली आहे. त्यांच्या कार्यकाळात इराण आणि इस्रायलमधील तणावही उच्चांकावर पोहोचला होता. २०२१ च्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी तुलनेने कमी ताकदवान नेते, त्यांचे पूर्ववर्ती हसन रुहानी यांचा पराभव केला. या निकालाने निर्णायक राजकीय शक्ती आणि नेतृत्व पुन्हा कट्टरपंथीयांच्या हाती गेले. रईसी यांना वेगळे बनवणारी गोष्ट म्हणजे रुहानी यांच्या सरकारने युनायटेड स्टेट्ससह जागतिक शक्तींबरोबर २०१५ च्या अणु करारावर स्वाक्षरी केली असताना रईसी यांनी पाश्चिमात्य आणि विशेषत: अमेरिकेशी केलेल्या या कराराचा निषेध केला. मोठ्या महामारी, अशांतता, आर्थिक निर्बंध आणि सरकारविरोधी निदर्शने यांचा सामना करणाऱ्या देशाचा वारसाही रायसी यांना मिळाला. जेव्हा एका २२ वर्षीय इराणी महिलेचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला, तेव्हा काही गोष्टी उघड झाल्या.

महसा अमिनी उठाव

सप्टेंबर २०२२ मध्ये महसा अमिनीच्या मृत्यूमुळे अनेक इराणी महिलांनी देशाच्या कठोर हिजाब कायद्याच्या विरोधात उभे राहून देशव्यापी निषेध नोंदवला होता. १९७९ मध्ये सरकार स्थापन झाल्यापासून इराणी राजवटीसमोरील सर्वात गंभीर आव्हान म्हणून हिजाबविरोधी निदर्शने करण्यात आली होती. महिला आणि तरुणांच्या नेतृत्वाखाली हजारो इराणी लोक दडपशाही विरोधात असंतोष व्यक्त करण्यासाठी एकत्र आले. “स्त्री, जीवन, स्वातंत्र्य”च्या घोषणांनी संपूर्ण जगाला वेठीस धरून निदर्शनांनी आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेतले. दुसरीकडे रायसी सरकारने शक्य तितक्या भीषण मार्गाने उठाव चिरडण्याचा प्रयत्न केला. इराणी सुरक्षा दलांनी शेकडो विरोधकांना केवळ निर्दयीपणे फक्त ठार केलेच नाही, तर अनेकांना अटकही केली. एवढेच नाही तर देशाची न्यायव्यवस्था अजूनही आंदोलनात सहभागी झालेल्यांना फाशीचे आदेश जारी करीत आहे. म्हणूनच हेलिकॉप्टर अपघाताच्या बातम्या जेव्हा मथळे होऊ लागल्या, तेव्हा अनेक इराणी विरोधकांनी या बातमीचा आनंद साजरा केला.

इस्रायलशी तणाव

रईसी यांच्या कार्यकाळात इराणचे इस्रायलशी आधीच असलेले संघर्षपूर्ण संबंध अत्यंत रसातळाला गेले. इस्त्रायल-हमास युद्धाने आगीत आणखी भर टाकली आणि इराणचा पाठिंबा असलेल्या अनेक दहशतवादी गटांनी हमाससह इस्रायलवर हल्ले सुरू केले. इराणने ३०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागून ज्यू राष्ट्रावर पहिला थेट लष्करी हल्ला केल्यावर एप्रिलमध्ये दोन मध्य-पूर्व राष्ट्रांमधील तणाव वाढला. इराणी अधिकाऱ्यांनी हा हल्ला दमास्कसमधील देशाच्या दूतावासावर कथित इस्रायली हवाई हल्ल्याचा बदला म्हणून केला होता, ज्यात इराणी कमांडर मारले गेले होते.

रईसींचा मृत्यू झाला तर पुढे काय होणार?

बचाव पथकं अद्याप बेपत्ता इराणच्या अध्यक्षाचा शोध घेत असताना अनेकांचा अशी भीती आहे की, या प्राणघातक अपघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा. रईसी मृत्युमुखी पडल्यानंतर इराणचे काय होणार असा प्रश्न आता विचारला जात आहे. इस्लामिक रिपब्लिकच्या घटनेच्या कलम १३१ नुसार, जर एखाद्या राष्ट्राध्यक्षाचा पदावर असताना मृत्यू झाला, तर प्रथम उपाध्यक्ष पदभार स्वीकारतात. देशाच्या सर्वोच्च नेत्याचे या प्रकरणावर अंतिम म्हणणे असते. डॉ. मोहम्मद मोख्बर हे सध्या इराणचे उपाध्यक्षपद सांभाळत आहेत. काळजीवाहू म्हणून उपाध्यक्ष राष्ट्राध्यक्षाचा पदभार सांभाळणार आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर पहिल्यांदा उपाध्यक्ष, संसदेचे स्पीकर आणि न्यायपालिकेचे प्रमुख यांचा समावेश असलेली परिषद जास्तीत जास्त ५० दिवसांच्या आत नवीन राष्ट्राध्यक्षासाठी निवडणुकीची व्यवस्था करण्यास बांधील असते. रायसी यांचा ठावठिकाणा अस्पष्ट असल्याने इराणच्या नेतृत्वाचे भवितव्य अनिश्चित आहे.

Story img Loader