पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र डागले. त्यानंतर इस्रायलनेही हमासच्या अड्ड्यांवर आणि गाझा पट्टीतल्या अनेक ठिकाणांवर क्षेपणास्त्र डागून हमासला जशास तसे उत्तर दिले. या हल्ल्यांनंतर हमास संघटना आणि इस्रायलयमध्ये युद्ध सुरू झाले आहे. या युद्धामुळे गाझा पट्टीत विध्वंस सुरू असून हमासने १५० हून अधिक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवलं आहे. दुसरीकडे या हल्ल्यामुळे गाझा पट्टीतील मृतांची संख्या १४०० वर पोहोचली आहे. या युद्धामध्ये इस्रायलने गाझा पट्टी प्रदेशात हल्ले करताना पांढऱ्या फॉस्फरसचा वापर केल्याचा आरोप केला जात आहे.

इस्रायलवर गंभीर आरोप

‘ह्यूमन राइट्स वॉच’ (एचआरडब्ल्यू) या न्यू यॉर्कस्थित मानवी हक्क पाहणी संस्थेने इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत. या युद्धादरम्यान इस्रायलने पाढंऱ्या फॉस्फरसचा वापर केल्याचे एचआरडब्ल्यूने म्हटले आहे. पांढऱ्या फॉस्फरच्या उपयोगामुळे गाझा पट्टी आणि लेबनॉनमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांना दीर्घकालीन आणि गंभीर आजार होण्याची शक्यता आहे, असे एचआरडब्ल्यूने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर युद्धात पांढऱ्या फॉस्फरसचा वापर करण्यावर आक्षेप का घेतला जातो? याबाबतचे युद्ध नियम काय आहेत? एचआरडब्ल्यूने केलेल्या आरोपांवर इस्रायलने काय स्पष्टीकरण दिले आहे? पांढऱ्या फॉस्फरसमुळे मानवाच्या शरीरावर काय प्रतिकूल परिणाम होतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…

Hamas-Israel armistice in Gaza after 15 months of intense war
हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Israel Hamas War reuters
इस्रायल-हमासमधील युद्ध आज थांबणार? कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न; युद्धबंदीसाठी प्रस्ताव
Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात
Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
Naxal Attack In Chhattisgarh
नक्षलवाद संपवण्याचा अगम्य आशावाद…

हेही वाचा >>>पोटातील मुलाच्या जगण्याचा अधिकार महत्त्वाचा? की महिलेच्या निर्णयाला अधिक महत्त्व? गर्भपात कायद्याची नव्याने चर्चा का होत आहे?

लेबनॉन आणि गाझा पट्टीतील व्हिडीओ आले समोर

सध्या इस्रायल हा देश हमास तसेच लेबनॉनच्या हिजबुल्लाह या अतिरेकी गटाविरोधात लढत आहे. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर इस्रालयने गाझा पट्टीत हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमुळे आतापर्यंत गाझा पट्टीत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला. अजूनही हा संघर्ष संपलेला नाही. असे असतानाच एचआरडब्ल्यूने काही व्हिडीओंचा आधार घेत इस्रायलने युद्धात पांढऱ्या फॉस्फरचा शस्त्र म्हणून वापर केला, असा आरोप केला आहे. ‘११ ऑक्टोबर रोजीचे लेबनॉन आणि गाझा पट्टीतील काही व्हिडीओंची सत्यता तपासण्यात आली आहे. इस्रायलने गाझा शहरातील बंदरावर तसेच इस्रायल-लेबनॉनच्या सीमेवरील ग्रामीण भागात दोन ठिकाणी पांढऱ्या फॉस्फरचे स्फोट घडवून आणले आहेत,’ असे एचआरडब्ल्यूने म्हटले आहे.

हमासच्या नियंत्रणात असणाऱ्या प्रदेशातून पांढरा धूर निघत असल्याचा व्हिडीओ

इस्रायलवर अशा प्रकारचा आरोप करताना एचआरडब्ल्यूने काही व्हिडीओंच्या लिंकदेखील सार्वजनिक केल्या आहेत. “१५५ मिमी पांढऱ्या फॉस्फरसचे तोफगोळे कथितरित्या स्मोकस्क्रीन्स, मार्किंग, सिग्नलिंगसाठी वापरण्यात आले आहेत,” असेही एचआरडब्ल्यूने म्हटले आहे. गाझा पट्टीत पांढऱ्या फॉस्फरसच्या वापराचा व्हिडीओ एचआरडब्ल्यूने शेअर केलेला नाही. मात्र पॅलेस्टाईनमधील एका टीव्ही चॅनेलने मात्र हा व्हिडीओ प्रदर्शित केलेला आहे. या व्हिडीओमध्ये हमासच्या नियंत्रणात असणाऱ्या प्रदेशातून पांढरा धूर निघत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : मिझोरममध्ये सत्ताधाऱ्यांपुढे नव्या पक्षाचे आव्हान; त्रिशंकू स्थिती शक्य?

पांढरा फॉस्फरस म्हणजे नेमकं काय?

पांढरा फॉस्फरस (White phosphorus) हे एक विषारी रसायन आहे. वरवर पाहता हे रसायन मेणासारखे दिसते. या रसायनाचा रंग पिवळस, रंगहीन असतो. या रसायनाचा लसणासारखा वास येतो, असे अनेकजण म्हणतात. अल-जझीरा या आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या वृत्तानुसार या रसायनाचा वापर युद्धादरम्यान बॉम्ब, ग्रेनेड्स, तोफगोळे, क्षेपणास्त्रांच्या रुपात केला जातो.

….म्हणून पांढऱ्या फॉस्फरसचा शस्त्र म्हणून होतो वापर

पांढरा फॉस्फरस आणि रबराच्या सहाय्याने दारुगोळा तया केला जातो. हे रसायन वातावरणातील ऑक्सिजनच्या संपर्कात आले की त्वरित पेट घेते. याच गुणधर्मामुळे या रसायनाचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. इस्रायल आणि अमेरिका यासारख्या देशांकडूनही या रसायनाचा शस्त्र म्हणून वापर केला जातो. हल्ल्याच्या ठिकाणी प्रकाश पडावा आणि अचूक लक्ष्यभेद व्हावा यासाठीदेखील पांढऱ्या फॉस्फरसचा प्रामुख्याने उपयोग केला जातो.

पंढऱ्या फॉस्फरसचा स्फोट झाल्यास धूर निर्माण होतो

युद्धादरम्यान पांढऱ्या फॉस्फरसचा स्मोकस्क्रीन म्हणून वापर केला जातो. पांढऱ्या फॉस्फरसचा स्फोट झाल्यास मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. त्यामुळे शत्रूंना समोरचे स्पष्टपणे दिसत नाही. या धुराचाच वापर करून दिवसाच्या प्रकाशात सैनिक नियोजित ठिकाणी चढाई करतात. याबाबत बोलताना ‘पांढऱ्या फॉस्फरसचा स्फोट झाल्यानंतर साधारण सात मिनिटांने हा धूर कायम राहतो. याच कारणामुळे धूर निर्माण करण्यासाठीचे हे एक प्रभाव अस्त्र आहे,’ असे ब्रिटनमधील रॉयल युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट या सुरक्षाविषयक सल्ला देणाऱ्या संस्थेतील पदाधिकारी डॅन कासझेट यांनी सांगितले.      

हेही वाचा >>>भारतीय संघ पाकिस्तानवरील वर्चस्व राखणार? पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील लढतीत कोणत्या तारांकितांवर लक्ष असणार?

हृदय, यकृत, मूत्रपिंड यांवर प्रतिकूल परिणाम पडतो

पांढऱ्या फॉस्फरसच्या संपर्कात आल्यास मानवाची त्वचा जळायला लागते. तसेच शरीरातील टिश्यूदेखील जळतात. ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर पांढरा फॉस्फरस लगेच पेट घेतो. विशेष म्हणजे जोपर्यंत तो पूर्णपणे नष्ट होत नाही किंवा ऑक्सिजनपासून वेगळा होत नाही, तोपर्यंत तो पेटलेलाच असतो. या रसायनाच्या संपर्कात आल्यास त्याचा हृदय, यकृत, मूत्रपिंड यांवर प्रतिकूल परिणाम पडतो.

जखम शरीरात खोलवर जाते

पांढऱ्या फॉस्फरसचा शरीरावर होणऱ्या परिणामाविषयी नेकर-एनफंट्स मालदेस हॉस्पिटलमधील मॅक्सिलोफेशियल सर्जरी हा विषय शिकवणारे प्राध्यपक रोमन होसेन खोन्सारी यांनी अल जझिराला अधिक माहिती दिली आहे. “पांढऱ्या फॉस्फरसच्या संपर्कात आल्यानंतर शरीराला हानी पोहोचते. या पांढऱ्या फॉस्फरसचा शरीराशी संबंध आल्यास त्वचा जळते. ही जखम शरीरात खोलवर जाते. त्यानंतर शरीराच्या चयापचय क्रियेवरही परिणाम होतो,” असे रोमन होसेन खोन्सारी यांनी सांगितले. 

रुग्णाचे अवयव निकामी होऊ शकतात

नागरिकांचे शरीर हे पांढऱ्या फॉस्फरसमुळे जळाले आहे, हे डॉक्टरांना वेळीच समजणे गरजेचे आहे. ते न समजल्यास संबंधित रुग्णाचे अवयव निकामी होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते पांढरा फॉस्फरस हा त्वचा, कपडे तसेच अनेक पृष्ठभागांवर बसतो. धुतल्यानंतरही हा फॉस्फरस निघून जात नाही. पांढरा फॉस्फरस असलेली हवा श्वासावाटे शरीरात गेल्यास ते धोकादायक ठरू शकते. पांढऱ्या फॉस्फरसमुळे डोळ्यांना जळजळ होऊ शकते. या फॉस्फरसच्या संपर्कात आल्यास पक्षाघातही होऊ शकतो.

पांढऱ्या फॉस्फरसवर बंदी आहे का?

युद्धात पांढऱ्या फॉस्फरसचा वापर करण्यावर बंदी नाही. आंतरराष्ट्रीय युद्ध नियमांमध्ये या फॉस्फरसला ‘आग लावणारे’ शस्त्र म्हणण्यात येते. ‘आग लावण्यासाठी, आगीमुळे धूर, उष्णता किंवा या दोन्हींमुळे लोकांना श्वसनास अडचण निर्माण व्हावी यासाठी हे शस्त्र वापरण्यात येते,’ असे जिनिव्हा येथील अधिवेशनात स्वाक्षरी केलेल्या सर्टन कन्व्हेंशनल वेपन्समधील (सीसीडब्ल्यू) प्रोटोकॉल ३ मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. सीसीडब्ल्यू १९८३ साली प्रत्यक्ष लागू करण्यात आला. आग लावण्यास सक्षम असणाऱ्या तसेच जमिनीवरून प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या शस्त्रांच्या तुलनेत आकाशातून प्रक्षेपित केलेल्या अशा प्रकारच्या शस्त्रांवर अधिक निर्बंध आहेत.

इस्रायलने गाझा पट्ट्यात पांढऱ्या फॉस्फरसचा वापर केला का?

 ह्यूमन राइट्स वॉचने केलेल्या आरोपांवर इस्रायली लष्कराने प्रतिक्रिया दिली आहे. गाझा पट्टीत हल्ला करताना शस्त्रांमध्ये पांढऱ्या फॉस्फरसचा वापर करण्यात आलेला आहे की नाही, याबाबत आम्हाला सध्यातरी काही कल्पना नाही, असे लष्कराने सांगितले. लेबनॉनमधील वापरावर मात्र लष्कराने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायल देशावर अशा प्रकारचा आरोप पहिल्यांदाच करण्यात आलेला नाही. ह्यूमन राइट्स वॉचच्या म्हणण्यानुसार  इस्रायलच्या संरक्षण दलांनी पांढऱ्या फॉस्फरसचा वापर गाझामध्ये राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन लीड कास्ट’ दरम्यान केला होता. ही मोहीम २७ डिसेंबर २००८ ते १८ जानेवारी २००९ या कालावधीत राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान इस्रायलने लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या प्रदेशात पांढऱ्या फॉस्फरसचा समावेश असलेल्या शस्त्रांचा वापर केला होता. यामध्ये शाळा, इमारती, बाजार, गोदाम, रुग्णालये यांची पडझड झाली होती. तसेच अेक लोक जखमी झाले होते, असे ह्यूमन राइट्स वॉचने २००९ च्या आपल्या अहवालात म्हटलेले आहे.

Story img Loader