इस्रायल आणि हिजबुल यांच्यातील संघर्ष पेटला आहे. हसन नसरल्लाह याला लक्ष्य करून लेबनॉनची राजधानी बेरूतवर इस्रायलने हवाई हल्ला केला होता. हसन नसरल्लाहसह त्याचे कुटुंबीय आणि संघटनेच्या इतरही नेत्यांना या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले होते. या भीषण हल्ल्यात हसन नसरल्लाह याचा मृत्यू झाला असल्याचे वारंवार इस्रायलकडून सांगण्यात येत होते. मात्र, इस्रायली लष्कर आयडीएफने हसन नसरल्लाह याच्या मृत्यूची आता पुष्टी केली आहे. कोण होता हसन नसरल्लाह? आता हिजबुल या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व कोण करणार? जाणून घेऊ.

कोण होता हसन नसरल्लाह?

हसन नसरल्लाह याचा जन्म १९६० साली लेबनॉनमधील बेरूत येथे एका गरीब शिया कुटुंबात झाला. धर्मातील स्वारस्यामुळे त्याला इराकमधील नजफ येथील शिया सेमिनरीमध्ये शिकण्यास पाठविण्यात आले. तो सेमिनरीमधील सय्यद मुसा सदर यांसारख्या प्रमुख धर्मगुरूंमुळे प्रभावित झाला होता. १९७५ मध्ये सुरू झालेल्या लेबनीज गृहयुद्धाचा नसरल्लाह याच्या जीवनावर परिणाम झाला होता. तो पूर्वी शिया मिलिशियामध्ये सामील झाला आणि त्यानंतर इस्रायल व पाश्चात्त्य प्रभावाला विरोध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिजबुल या संघटनेत सामील झाला.

syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Bashar al-Assad
Bashar al-Assad: सीरियाचा नेता की क्रूर राजवटीचा चेहरा? बशर अल-असद कोण आहे?
Prime Minister announces free elections in Syria
Syria : सीरिया बंडखोरांच्या ताब्यात! ७५ भारतीयांचं यशस्वी स्थलांतर; लवकरच मायदेशी परतणार
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
Syria, Abu Mohammad Al Jolani, dictatorship Syria,
विश्लेषण : जिहादीचा बनला प्रशासक… कोण आहे सीरियाचा नवा शासक अबू मोहम्मद अल जोलानी?
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल

हेही वाचा : आलिया भट्टला असणारा ADHD आजार काय आहे? या आजाराची लक्षणे काय?

१९९२ मध्ये हिजबुलचा तत्कालीन नेता सय्यद अब्बास मुसावी याची इस्रायली सैन्याने हत्या केली. त्यानंतर नसरल्लाह याने या संघटनेचा पदभार हाती घेतला होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली हिजबुलने आपली लष्करी क्षमता व राजकीय प्रभाव वाढवला आणि लेबनॉनमधील हा सर्वांत मोठा राजकीय पक्ष ठरला. २०१८ च्या संसदीय निवडणुकीत हिजबुलला ३,४०,००० हून अधिक मते मिळाली. लेबनॉनच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही पक्षासाठी ही मते सर्वाधिक होती. नसरल्लाहच्या नेतृत्वाखाली हिजबुलची लष्करी ताकद बरीच वाढली आहे. २०२१ च्या भाषणात नसरल्लाह याने दावा केला की, हिजबुलकडे एक लाख लढवय्ये आहेत; ज्यामुळे ‘हिजबुल’ जागतिक स्तरावर सर्वांत शक्तिशाली सशस्त्र गटांपैकी एक ठरला आहे.

इस्रायली लष्कर आयडीएफने हसन नसरल्लाह यांच्या मृत्युची आता पुष्टी केली आहे. (छायाचित्र-आयडीएफ/एक्स)

हिजबुलचे नेतृत्व कोण करणार?

सय्यद हसन नसरल्लाह याच्या मृत्यूची पुष्टी झाल्यामुळे लगेच संभाव्य उत्तराधिकार्‍याविषयी चर्चा सुरू झाली आहे. नसरल्लाह याचा चुलतभाऊ आणि ‘हिजबुल’च्या कार्यकारी परिषदेचा प्रमुख हाशेम सफीद्दीन हे नाव सध्या सर्वांत जास्त चर्चेत आहे. ‘हिजबुल’च्या राजकीय आणि आर्थिक कारवायांमध्ये सफीद्दीनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुख्य म्हणजे नसरल्लाह याचा वारसदार म्हणून त्याच्याकडे फार पूर्वीपासून पाहिले जात आहे. १९६४ मध्ये जन्मलेल्या सफीद्दीनचे हिजबुल आणि इराण या दोन्हींशी घनिष्ठ संबंध आहेत. इराणच्या सत्ताधारी मौलवींशी असलेल्या त्याच्या संबंधांसाठीही तो ओळखला जातो. त्याने कोममध्ये अनेक वर्षे शिक्षण घेतले. त्याचा मुलगा रिदा याचा विवाह इराणच्या कुड्स फोर्सचा माजी कमांडर कासिम सुलेमानी यांची मुलगी झैनाब सुलेमानीशी झाला आहे.

नसराल्लाह यांचा चुलत भाऊ आणि हिजबुलच्या कार्यकारी परिषदेचा प्रमुख हाशेम सफीद्दीन हे नाव सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

फिलिप स्मिथसारख्या विश्लेषकांनी रॉयटर्सला सांगितले की, सफीद्दीनचे कौटुंबिक संबंध आणि प्रेषित मुहम्मदचे वंशज म्हणून आपल्या धार्मिक स्थितीमुळे ते या नेतृत्वासाठी एक मजबूत दावेदार मानले जातात. ‘हिजबुल’मध्ये सफीद्दीनचा सखोल सहभाग असूनही, अलीकडील वर्षांमध्ये त्याची तुलनेने कमी चर्चा झाली आहे. अमेरिका सरकारने २०१७ पासून सफीद्दीनला दहशतवादी घोषित केले आहे. सौदी अरेबियाच्या राज्यानेही त्याच्यावर निर्बंध लादले आहेत आणि देशातील मालमत्ताही गोठवली आहे. इस्रायलविरुद्ध लष्करी आक्रमकतेचा पुरस्कार करीत हिजबुलमध्ये कट्टरपंथी म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.

नसराल्लाहच्या मृत्यूचा हिजबुलवर कसा परिणाम होईल?

नसरल्लाह याचा मृत्यू झाल्याने एकूणच प्रदेशावर परिणाम होईल, हे निश्चित. ऑक्टोबर २०२३ पासून हिजबुलने उत्तर इस्रायलवर रॉकेट हल्ले वाढवले ​​आहेत. हमासने इस्रायलवर मोठ्या प्रमाणावर हल्ला केल्यानंतर शत्रुत्व तीव्र झाले आहे. जून २०२४ मध्ये हिजबुलने २००६ नंतरच्या सर्वांत मोठ्या हल्ल्यांपैकी एक हल्ला केला आणि इस्त्रायलच्या दिशेने २१५ क्षेपणास्त्रे डागली. इस्त्रायलने वरिष्ठ हिजबुल कमांडर तालेब सामी अब्दुल्लाची हत्या केल्यानंतर हा हल्ला करण्यात आला.

हेही वाचा : पॅरासिटामॉलसह नेहमीच्या वापरातील ५० हून अधिक औषधं गुणवत्ता चाचणीत नापास; कारण काय? औषधांची गुणवत्ता कशी तपासतात?

‘हिजबुल’ने बदला म्हणून हल्ल्यांची वारंवारता वाढविणार असल्याचा इशाराही दिला. नसरल्लाह याच्या मृत्यूची पुष्टी झाल्यामुळे हे हल्ले ‘हिजबुल’ वाढविण्याची शक्यता आहे. अब्दुल्लाच्या अंत्यसंस्कारात बोलताना हाशेम सफीद्दीन याने इस्रायलला हिजबुल हल्ले वाढवणार असल्याचा इशारा दिला होता. इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये हवाई हल्ले सुरू ठेवल्याने परिस्थिती अस्थिर आहे. शनिवारपर्यंत इस्रायलने बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरे आणि बेका व्हॅलीवर हल्ले करून ‘हिजबुल’च्या कमांड सेंटरवरही हल्ला केला होता.

Story img Loader