अमेरिकेत गेल्या कित्येक वर्षांपासून आशियाई वंशांच्या नागरिकांशी वंशभेदामुळे भेदभाव केला जात आहे. अमेरिकेत श्वेतवर्णीय नागरिकांकडून कृष्णवर्णीय नागरीकांना वाईट वागणूक दिली जात आहे. अनेकदा त्यांच्यावर प्राणघातक हल्लेदेखील होत आहेत. अलिकडचेच उदाहरण बघितल्यास अमेरिकेत शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या एकापाठोपाठ एक मृत्युच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे अमेरिकेत आशियाई वंशाच्या नागरिकांविरुद्ध द्वेष वाढत आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न समोर येत आहे. याविषयी केलेल्या सर्वेक्षणातून अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत.

आशियाई अमेरिकन फाऊंडेशनने अलीकडेच केलेल्या सर्वसमावेशक अभ्यासात आशियाई अमेरिकन नागरिकांशी केला जाणारा भेदभाव, द्वेषपूर्ण गुन्हे आणि आशियाई अमेरिकन समुदायाने आजवर अनुभवलेल्या वागणुकीवर प्रकाश टाकला आहे. अमेरिकेतील आशियाई अमेरिकन, नेटिव्ह हवाईयन आणि पॅसिफिक आयलँडर्स (AANHPI) संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या अभ्यासात काय? यावर एक नजर टाकू या.

Strained US China Relations news in marathi
चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Meta x gets rid of fact checkers
अग्रलेख : फेकुचंदांचा फाल्गुनोत्सव!
priti karmarkar
स्त्रीप्रश्नांविषयी आग्रही आणि संवेदनशीलही!
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”

हेही वाचा : डुकराची किडनी प्रत्यारोपित केलेल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू; विज्ञानाचा चमत्कार मानले जाणारे झेनोट्रांसप्लांटेशन आहे तरी काय?

आशियाई वंशाच्या नागरिकांची परिस्थिती चिंताजनक

या सर्वेक्षणात अमेरिकेतील ६,२७२ नागरिक सहभागी झाले होते. या नागरिकांना सद्य स्थितीत आशियाई अमेरिकन नागरिकांसमोर असणार्‍या आव्हानांविषयी विचारण्यात आले. बहुसंख्य अमेरिकन नागरिकांचा असा विश्वास आहे की आशियाई अमेरिकन नागरिकांबद्दल द्वेष वाढलेला नाही. परंतु, आशियाई अमेरिकन नागरिकांच्या भावना काही वेगळेच सांगतात. केवळ एक तृतीयांश अमेरिकन लोकांनी आशियाई अमेरिकन लोकांबद्दल द्वेष वाढल्याचे मान्य केले आहे. परंतु, अनेकांचे असे सांगणे आहे की २०२१ पासून अमेरिकेत आशियाई अमेरिकन लोकांना योग्य वागणूक दिली जात आहे.

परंतु, गेल्या वर्षभरातील आकडेवारी पाहता अमेरिकेत आशियाई वंशाच्या नागरिकांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे लक्षात येते. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की ३२ टक्के आशियाई अमेरिकन नागरिकांनी वांशिक अपशब्दांचा सामना केला आहे, तर २९ टक्के नागरिकांनी शाब्दिक छळ किंवा गैरवर्तनाचा सामना केला आहे. आग्नेय आशियाई अमेरिकन नागरिकांची परिस्थिती तर अधिकच चिंताजनक आहे. ४० टक्के आग्नेय आशियाई अमेरिकन नागरिकांना वांशिक अपशब्दांचा, ३८ टक्के नागरिकांना शाब्दिक छळ किंवा शिवीगाळीचा आणि २२ टक्के नागरिकांना शारीरिक हल्ल्याचा सामना करावा लागला आहे.

वैयक्तिक सुरक्षेबाबत चिंता

आशियाई अमेरिकन नागरिकांमध्ये वैयक्तिक सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणात चिंता आणि भीती आहे. ४१ टक्के नागरिकांना शारीरिक हल्ल्यांना बळी जाण्याची भीती आहे आणि ५९ टक्के नागरिकांना त्यांच्या वंश किंवा धर्मामुळे भेदभावाला सामोरे जाण्याची चिंता आहे. वर्णद्वेष, भेदभाव, हिंसाचार आणि प्रतिनिधित्वाच्या कमतरतेमुळे आशियाई अमेरिकन लोकांना स्वीकारले जात नाही, असे ३८ टक्के नागरिकांचे मत आहे.

अमेरिकन नागरिकांमध्ये आपलेपणाचा अभाव

आशियाई अमेरिकन लोकांमध्ये आपलेपणाची आणि स्वीकृतीची भावना नसल्याचे नागरिकांचे सांगणे आहे. वर्णद्वेषामुळे आपल्याला स्वीकारले जात नसल्याची भावना ३८ टक्के नागरिकांमध्ये आहे. तर केवळ १८ टक्के नागरिक आपल्याला स्वीकारले असल्याचे मान्य करतात. ३४ टक्के नागरिकांना सामाजिक माध्यमांवर भेदभावाचा आणि अपमानाचा सामना करावा लागतो, तर ३१ टक्के नागरिकांना कामाचे ठिकाण, शैक्षणिक संस्था आणि इतर सार्वजनिक ठिकाणी याचा सामना करावा लागतो.

हे सर्वेक्षण ३० जानेवारी ते १३ मार्च २०२४ या कालावधीत केले गेले असून ६,२७२ अमेरिकेत वास्तव्यास असणार्‍या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर आधारित आहे. हे सर्वेक्षण १६ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांमध्ये करण्यात आले आहे. बहुतेक अमेरिकन एखाद्या प्रमुख आशियाई अमेरिकन व्यक्तींचे नावही सांगू शकत नाही. केवळ ५२ टक्के अमेरिकन नागरिक प्रसिद्ध आशियाई अमेरिकन व्यक्तीचे नाव सांगू शकले आहेत. यात सामान्यतः ९ टक्के नागरिकांनी जॅकी चॅन यांचे नाव सांगितले, पण ते अमेरिकन नाहीत, ५ टक्के नागरिकांनी ब्रूस ली यांचे नाव सांगितले, तर केवळ २ टक्के लोक भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे नाव सांगू शकले.

वर्णद्वेषाचा सामना कसा करावा?

सर्वेक्षणात वर्णद्वेषाचा सामना करण्यासाठी तीन प्रमुख धोरणे सुचवण्यात आली आहेत. त्यात ४१ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे की यासाठी शिक्षणामध्ये आशियाई अमेरिकन लोकांचा इतिहास समाविष्ट करावा, ४१ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे की आशियाई अमेरिकन लोकांची समाजात दृश्यमानता वाढवावी आणि ३९ टक्के नागरिकांचे सांगणे आहे की या समुदायाशी अर्थपूर्ण संवाद व्हावा यासाठी व्यासपीठ असावे. आशियाई अमेरिकन फाऊंडेशनने लिहिले की, ही स्थिती सुधारण्याचे आव्हान आमच्यापुढे आहे.

‘द एशियन अमेरिकन फाऊंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि STAATUS अहवालाचे सह-संस्थापक नॉर्मन चेन यांनी आशियाई अमेरिकन लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांची नोंद करणे आणि त्यावर उपाय करण्यावर जोर दिला. ‘ॲक्सिओस’शी बोलताना ते म्हणाले, “कोणावर सर्वाधिक हल्ला होतो ही काही स्पर्धा नाही. मला वाटतं द्वेषाच्या इतर उदाहरणांच्या तुलनेत, आशियाई अमेरिकन नागरिकांविरुद्धचा द्वेष कमी आहे. आपल्या समाजात द्वेषाचे इतर अनेक उदाहरणे आहेत.”

हेही वाचा : बुरखा परिधान केलेल्या महिलांची मतदान केंद्रांवर ओळख कशी तपासली जाते? भाजपा उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याचे कारण काय?

आजही वंशभेदाची भीती

रस्त्याने चालताना लोक आपल्याकडे तुच्छतेने बघतात. सायंकाळी किंवा रात्री रस्त्याने फिरणेही धोकादायक असते, कारण केवळ वर्णद्वेषामुळे कोणीही आपल्यावर हल्ला करू शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अमेरिकेत आशियाई अमेरिकन नागरिकांबरोबर आजही वंशभेद होत असल्याचे आणि याविषयी नागरिकांमध्ये भीती असल्याचे पाहायला मिळते.

Story img Loader