गौरव मुठे

देशाच्या वित्तीय क्षेत्रातील आजवरचे सर्वात मोठे विलीनीकरण येत्या १ जुलैपासून प्रत्यक्षात लागू होईल. देशातील गृह वित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी लिमिटेडचे खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक असलेल्या एचडीएफसी बँकेमध्ये विलीनीकरणाच्या अंमलबजावणीच्या तारखेची घोषणा मंगळवारी करण्यात आली. या महाविलीनीकरणातून जागतिक आघाडीच्या अव्वल १०० कंपन्यांच्या पंक्तीत, भारतीय वित्तीय संस्थेला जागा मिळविता येणार आहेच. मात्र हे विलीनीकरण भागधारक आणि बँकेच्या ग्राहकांच्या देखील हिताचे ठरणार आहे.

milind kale appointed as chairman of the board of management of cosmos bank
कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद काळे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Transport Minister Pratap Sarnaik said private passenger transport providers like Ola Uber Rapido brought under one regulation
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार, परिवहन मंत्री
JSW Share News
JSW Cement IPO ला सेबीचा हिरवा कंदील; ११ गोष्टी या ‘आयपीओ’बद्दल…
Tax revenue is vital for civic services and property tax ensures
करभरणा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न गरजेचे, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची सूचना
Is ESOP or RSU better for employee welfare
कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी ‘ईसॉप’ की ‘आरएसयू’ चांगले?
Company DCX Systems Limited Overview in marathi
माझा पोर्टफोलिओ : देशाच्या संरक्षण सिद्धतेतील सच्चा भागीदार – डीसीएक्स सिस्टीम्स  
massive dividend shareholders TCS IT company
मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी

महाविलीनीकरण कधी होणार?

एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण येत्या १ जुलैपासून प्रभावी होईल. एचडीएफसी लिमिटेड ही गृह वित्त कंपनी यातून एचडीएफसी बँकेमध्ये विलीन होणार आहे. दोन्ही संस्थांची ३० जून रोजी संचालक मंडळाची अंतिम बैठक पार पडणार असून कार्यालयीन वेळेनंतर विलीनीकरणाच्या ठरावाला मंजुरीची औपचारिकता पार पाडली जाईल. तत्पश्चात, भांडवली बाजारात एचडीएफसी लिमिटेडच्या समभागांचे व्यवहार थांबविले जाऊन तिच्या समभागांची सूचिबद्धता १३ जुलैपासून संपुष्टात (डिलिस्ट) येईल. गेल्या वर्षी ४ एप्रिल रोजी या विलीनीकरणाची योजना जाहीर करण्यात आली होती. या विलीनीकरणापश्चात एचडीएफसी बँक ही १०० टक्के सार्वजनिक भागधारकांची मालकी असणारी कंपनी बनेल, तर एचडीएफसी लिमिटेडच्या विद्यमान भागधारकांची एकत्रित एचडीएफसी बँकेत ४१ टक्के मालकी राहील.

विलीनीकरणातून काय साधले जाणार?

या विलिनीकरणातून खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक उदयास येईल. जिचे आकारमान हे खासगी क्षेत्रातील दुसरी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या दुप्पट असेल आणि अग्रस्थानी असलेल्या स्टेट बँकेकनंतर १८ लाख कोटी रुपयांची मालमत्ता असलेली ती देशातील दुसरी मोठी बँक ठरणार आहे. सुमारे ९० लाख ग्राहकांचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या एचडीएफसी समूहातील गृह वित्तसंस्थेचे अस्तित्व या विलीनीकरणातून संपुष्टात येईल. मात्र नव्याने पुढे येणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या एकूण कर्ज पुस्तकातील गृहकर्जाचा हिस्सा आता ११ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांवर जाईल.

अर्थक्षेत्राला कोणता फायदा होईल?

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे हे एकत्रीकरण हे संपूर्णपणे परस्परांसाठी पूरक आहे आणि एचडीएफसी बँकेच्या मूल्यवर्धनाला ते उपकारक ठरेल. एचडीएफसी बँकेला उभयतांच्या एकत्रित मोठ्या ताळेबंदाचा आणि नक्त मत्तेचा फायदा होईल, ज्यामुळे मोठ्या रकमेचे कर्जाचे व्यवहार तिच्याद्वारे शक्य होऊ शकतील. भारतीय अर्थव्यवस्थेत कर्जाचा प्रवाह सक्षम होण्यासह,पतवाढीचा वेगही सुधारेल. गृहकर्ज क्षेत्रात एचडीएफसी बँकेला व्यवसाय विस्तारता येऊन, ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ साधता येणार आहे. आकारमानांत होणाऱ्या वाढीसरशी, दीर्घावधीत आस्थापना चालवण्याच्या खर्चापासून ते व्यवसायातील आवर्ती खर्चापर्यंत सर्वच खर्च कमी होणार आहेत. मात्र हा समन्वय साधायला थोडा वेळ लागू शकतो. आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

निवडणूक आयोगाच्या मसुद्यामुळे आसाममध्ये तणाव; मुस्लिमबहुल मतदारसंघाचे विभाजन करण्यात भाजपाचा सहभाग?

भागधारक, ग्राहकांना काय लाभ आहेत?

या एकत्रीकरणामुळे संबंधित कंपन्यांचे भागधारक, ग्राहक, कर्मचारी यासह विविध सहभागी घटकांसाठी लक्षणीय स्वरूपात मूल्य निर्माण होईल. कारण एकत्रित व्यवसायाचे वाढीव प्रमाण, सर्वसमावेशक उत्पादने, ताळेबंदाची लवचिकता आणि महसूल संधींमध्ये समन्वय साधण्याची क्षमता यांचा फायदा या सर्वच घटकांना होईल. समभागांचे मूल्य कमालीचे वाढू शकेल. विलीनीकरण प्रभावी ठरल्यासरशी, एचडीएफसी लिमिटेडच्या भागधारकांना त्यांच्याकडील २५ समभागांमागे, एचडीएफसी बँकेचे ४२ समभाग (१ : १.६८ या प्रमाणात) मिळणार आहेत.

दोहोंच्या विलीनीकरणातील आर्थिक गणित कसे?

सध्या एचडीएफसी बँकेच्या ६ कोटी ८० लाख ग्राहकांपैकी, ३० टक्के ग्राहकच केवळ एचडीएफसीचे प्रत्यक्ष कर्जधारक असल्याचे चित्र पाहता, गृह कर्ज क्षेत्रातील बँकेच्या क्षमता विलिनीकरणानंतर लक्षणीय विस्तारणार आहेत. ‘एस अँड पी’च्या मते, विलीनीकरणामुळे एचडीएफसी बँकेचा कर्ज व्यवसाय ४२ टक्क्यांनी वाढून १८ लाख कोटी रुपयांवर जाईल आणि बँकेचा बाजार हिस्सा सध्याच्या ११ टक्क्यांवरून सुमारे १५ टक्क्यांपर्यंत वाढेल.

महत्त्वाचे म्हणजे एचडीएफसी बँकेत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना प्रवेशास अधिक वाव निर्माण होईल, जे सध्या ७४ टक्के या अत्युच्च स्वीकारार्ह मर्यादेच्या पातळीवर आहे. यामुळे समभागांच्या किंमत पातळीत देखील भविष्यात चांगली वाढ होईल, असा बाजार विश्लेषकांचा कयास आहे. ‘मॅक्वायरी रिसर्च’च्या अहवालानुसार, विलीनीकरणाने सत्तरीच्या घरात पोहोचलेले एचडीएफसी लिमिटेडमधील वरिष्ठ व्यवस्थापनातील – दीपक पारेख, केकी मिस्त्री, रेणू सूद कर्नाड या मंडळींनंतर कोण या प्रश्नाचे आणि त्यांचे उत्तराधिकारी शोधण्याच्या समस्येचे आपोआपच निवारण होईल.

समभागांवरील ताबडतोब दिसून आलेला परिणाम काय?

दीपक पारेख आणि केकी मिस्त्री यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत विलीनीकरणाचा तपशील जाहीर केल्यांनतर एचडीएफसी बँकेचा समभाग २.३ टक्क्यांनी वधारला होता. मंगळवारच्या सत्रात दिवसअखेर तो १.४१ टक्क्यांनी वधारून १६५८.६० पातळीवर बंद झाला. तर एचडीएफसीचा समभाग १.५३ टक्क्यांनी वधारून २७६१.८५ रुपयांवर स्थिरावला. मंगळवारच्या दोन्ही कंपन्यांच्या समभागांच्या किमतीनुसार, कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल १४.३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मात्र १६.९ लाख कोटी रुपयांच्या बाजारभांडवलासह अग्रस्थानी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा ते कमी असले तरी, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मौल्यवान कंपनी म्हणून एकीकृत एचडीएफसी बँकेने लवकरच स्थान मिळविलेले दिसू शकेल.

gaurav.muthe@expressindia.com

Story img Loader