एनडीएचे नेते नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर सर्व कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी होणार असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रपती भवनात होणारा शपथविधी सोहळा अतिशय भव्यदिव्य असेल, ज्यामध्ये सुमारे ८ हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या पाहुण्यांमध्ये ७ देशांचे राष्ट्रप्रमुखही असतील. नरेंद्र मोदी आज ९ जून रोजी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. भारताचे ज्या सात देशांशी जवळचे संबंध आहेत, त्या सात देशांच्या नेत्यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अलिकडच्या वर्षांत या सातही देशांची भारताचा सर्वात जवळचा भू-राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या चीनशी जवळीक वाढत आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे

भारत आणि श्रीलंकेतील जनतेमधील संबंध पूर्वापार काळापासून चालत आले आहेत. २०२३-२४ मध्ये त्यांचा द्विपक्षीय व्यापार ५५४२ दशलक्ष इतका होता, ज्यामध्ये पेट्रोलियम आणि ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भारतीय निर्यातीचा समावेश होता. श्रीलंकेतील गृहयुद्धादरम्यान भारताने १९८७-९० दरम्यान शांतता सेना पाठवली आणि विविध दहशतवादी गटांना नि:शस्त्र करण्यासाठी गुप्तपणे संघर्षात सामील झाले. भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये सखोल धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. विशेषत: अल्पसंख्याक श्रीलंकन ​​तमीळ आणि भारतीय तमीळ यांच्यात संबंध आहेत. दोन्ही देशांमधील भविष्यातील चर्चेत सागरी सुरक्षा सहकार्य वाढवणे, सागरी वाद मिटवणे आणि आर्थिक सहकार्य मजबूत करणे यावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे.

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”

हेही वाचाः दक्षिण आफ्रिकेत ‘अबकी बार, युनिटी सरकार?’; तीव्र मतभेद असूनही सर्वच राजकीय पक्ष एकत्र येतील?

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना

भारत आणि बांगलादेशचे ऐतिहासिक संबंध सर्वश्रुत आहे. बांगलादेशला आज जे काही स्वातंत्र्य मिळालंय, त्या भारताची भूमिका निर्णायक होती. आज त्यांचे मजबूत व्यापार संबंध आहेत, २०२३-२४ आर्थिक वर्षात १२,९०६ दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचले आहे. भारत यंत्रसामग्री आणि कापड निर्यात करतो, तर बांगलादेश कापड आणि मासे निर्यात करतो. बांगलादेश सातत्याने भारतासाठी पहिल्या पाच ते दहा निर्यात देशांमध्ये आहे.

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू

भारत आणि मालदीव यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते. विशेष म्हणजे १९८८ मध्ये मालदीवमधील सत्तापालट रोखण्यासाठी भारताने मदत केली होती. राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांच्या “इंडिया आऊट” मोहिमेमुळे भारतीय सशस्त्र दलांनी द्वीपसमूहातून काढता पाय घेतला. तेव्हापासून भारत आणि मालदीवचे संबंध बिघडले आहेत. परंतु मोइज्जूंची नवी दिल्लीतील उपस्थिती संबंधांमध्ये सुधारणा करण्याची शक्यता आहे. २०२३-२४ मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार ९७९ दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने सागरी उत्पादने आणि बांधकाम साहित्याचा समावेश आहे. मालदीवमधून अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी भारतात येतात. तणावग्रस्त संबंध सुधारण्याबरोबरच आगामी चर्चेत हवामान बदल आणि शाश्वत विकास यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

हेही वाचाः Harappa ‘या’ उत्खननात सापडले, ४००० वर्षे प्राचीन भारतीय मल्टिग्रेन हाय प्रोटिन डाएट लाडू! संशोधन काय सांगते?

सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ

भारत आणि सेशेल्समध्ये मजबूत धोरणात्मक संबंध आहेत, विशेषत: सागरी सुरक्षा आणि पर्यावरणीय सहकार्याच्या बाबतीत. सेशेल्स हे मादागास्करच्या उत्तरेस स्थित असलेले हिंद महासागरातील सर्वात सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण द्वीपसमूहांपैकी एक आहे. २०२३-२४ मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार ८५ दशलक्ष डॉलर इतका होता, ज्यात मत्स्यपालन आणि पर्यटनावर लक्ष केंद्रित केले गेले. दोन्ही देशांनी भूतकाळात संयुक्त वारसा संवर्धन प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला आहे. भविष्यातील वाटाघाटींचे उद्दिष्ट पर्यावरण संरक्षण करारांना बळकटी देण्याचे असेल, जे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, ज्याचे परिणाम बेट राष्ट्रासाठी विनाशकारी असतील.

भूतानचा राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक

भारत आणि भूतान हे सदोदित मित्र राहिले आहेत, ज्यात महत्त्वपूर्ण आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. भूतानच्या जलविद्युत क्षेत्रात भारत हा प्रमुख भागीदार असलेला द्विपक्षीय व्यापार २०२३-२४ मध्ये १.३ अब्ज डॉलरचा होता. शैक्षणिक देवाणघेवाण आणि भूतानचा वारसा जतन करण्यासाठी सहयोगी प्रयत्नांद्वारे सांस्कृतिक संबंध दृढ केले आहेत. भविष्यातील चर्चेत नवीन व्यापार कराराद्वारे आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर असेल.

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल उर्फ ​​’प्रचंड’

भारत आणि नेपाळमध्ये सीमारेषेवरूही खुले संबंध आहेत, जे त्यांचे खोल ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध प्रतिबिंबित करतात. २०२३-२४ मध्ये द्विपक्षीय व्यापार ७८७१ दशलक्ष डॉलर इतका होता, ज्यामध्ये पेट्रोलियम उत्पादने आणि यंत्रसामग्रीच्या भारतीय निर्यातीचे वर्चस्व होते. दोन्ही देशांमध्ये सखोल सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध आहेत, दोन देशांमध्ये भरभराट होत असलेला पर्यटन उद्योग आहे. ऊर्जा आणि पाणीवाटपाचा वाद हा पूर्वीचा मुद्दा राहिला आहे.

मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराज सिंह रुपन

भारत आणि मॉरिशस यांच्यात मजबूत सांस्कृतिक आणि आर्थिक घनिष्ठ संबंध आहेत. २०२३-२४मध्ये द्विपक्षीय व्यापार ८५२ दशलक्ष डॉलर एवढा होता. मॉरिशसमधून कापड आणि साखरेसह मोठ्या प्रमाणात भारतात निर्यात केली जाते. सांस्कृतिकदृष्ट्या दोन्ही देश मॉरिशसमधील लक्षणीय अनिवासी भारतीयांद्वारे जोडलेले आहेत, जे नियमित सांस्कृतिक कार्यक्रम आणि देवाणघेवाण यांच्याद्वारे सण साजरे करतात.