Health Insurance covers Corona Virus : चीन येथील वुहानमधून पसरलेल्या करोना विषाणू प्रदुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने करोनाला महामारी असं घोषित केलं आहे. भारतामध्येही करोनानं आपला प्रदुर्भाव दाखवण्यास सुरूवात केली आहे. दररोज नवनवे करोना बाधित रूग्ण समोर येत असून करोना बाधितांची संख्या वाढतच आहे. करोनाचा वाढत्या प्रदुर्भावामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सर्दी-खोकला आणि तापासारख्या लक्षणांमुळे होणारा हा आजार आरोग्य विम्यात येतो का? करोना हा आजार आरोग्य विम्यात येतो का? जाणून घेऊयात काय म्हणातात तज्ञ्ज ?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपचाराचा वाढता खर्च आणि विम्याबद्दल वाढती जागरूकता या दोन कारणांमुळे आरोग्य विमा पॉलिसी घेण्याऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. हेल्थ इन्शुरन्स सेक्टरमधील तज्ञ्जांच्या मते, करोना विषाणूचा प्रदुर्भाव वाढण्यापूर्वीच जर तुमच्याकडे एखादी आरोग्य विमा पॉलिसी असल्यास करोना ही महामारी या विम्यात येते. पण जर तुम्ही करोनाच्या चपाट्यात आल्यानंतर आरोग्य विमा घ्यायचा विचार करत असाल तर हा आजार आरोग्य विम्यात येत नाही.

समजा तुम्ही आता आरोग्य विमा खरेदी केला आणि तुम्हाला करोना झाला तरीही तुम्ही आरोग्य विम्यात येत नाही. तुमच्यावर होणारे उपचार आरोग्य विम्याच्या आधिरिख्यखाली येत नाही. तज्ञ्जांच्या मते, आरोग्य विम्याच्या नियमांनुसार, आरोग्या विमा खरेदी केल्यानंतर ३० दिवसांनंतर आरोग्या विम्याअंतर्गत उपचार होऊ शकतात. पण, एखाद्या मोठ्या दुर्घटनेत हा नियम लागू होत नाही. पण आजारपणाला हा नियम लागू होतो.

करोना व्हायरसलाही डेंगू, मलेरिया यासारख्या इतर अचानक होणाऱ्या आजारातच आरोग्य विम्याअंतर्गत कव्हर केलं जाते. करोना हा अचानक उद्भवलेली महामारी आहे. त्यामुळे इतर अप्रत्यक्ष होणाऱ्या आजारांप्रमाणेच आरोग्य विम्यात कव्हर केलं जाणार आहे. पण तुमच्याकडे आधीच आरोग्य विमा असणं आवश्यक आहे. किंवा तुम्हाला आरोग्य विमा घेतल्यानंतर ३० दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health insurance covers corona virus treatment or not know all about it nck